भारत
माझी मातृभूमी आहे. याच मातृभूमीने माझे पालन-पोषण केले आहे. यामुळे माझा भारत देश
माझ्यासाठी माझ्या प्राणांपेक्षाही प्रिय आहे.
माझा
भारत देश जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आहे. भारताचा
इतिहास मोठा स्फुर्तिदायक असल्याचा आपल्याला पाहावयास मिळतो. भारतीय प्राचीन संस्कृती हि आमच्या गौरवशाली भारताची वर्षानुवर्षे जपलेली अनमोल ठेव आहे. या भारताच्या प्राचीन
संस्कृतीला हजारो वर्षांची तेजस्वी परंपरा लाभली आहे. भारतात बोलल्या जाणाऱ्या विविध
भाषा हे भारताचे वैशिट्य आहे. या सर्व भाषा आपापल्या साहित्याने समृद्ध असल्याचे
आपल्याला पहावयास मिळते. हिंदी हि भारताची राष्ट्रभाषा आहे तर 'सत्यमेव जायते'! हे
भारताचे ब्रीदवाक्य आहे. 'विश्वविजयी तिरंगा' हा आमच्या वैभवशाली भारताचा राष्ट्रधवज
आहे. 'जन-गण-मन' हे आमचे प्रियतम राष्ट्रगीत आहे. आमची अस्मिता असणारे 'अशोकचक्र' हे साऱ्या जगाला शांतीचा संदेश देते. विविध धर्मांचे, पंथाचे आणि जातींचे कोट्यवधी लोक या
देशामध्ये गुण्यागोविंदाने राहतात. विविध, प्रांत, धर्म, जाती यांच्या रितीरिवाजांतही भिन्नता आहे; पण
या विविधतेतही एकता असल्याची दिसून येते कारण आम्ही सर्वजण भारतीय आहोत.
विविधतेने
नटलेल्या भारताचा भूगोल देखील वैविध्यपूर्ण आहे. मोसमी वाऱ्यांचे वरदान, पर्वताचा राजा हिमालय उत्तर दिशेला मुकुटाप्रमाणे देशाची शोभा वाढवतो. याच हिमालयाची मायेची
पाखर आणि गंगा यमुना कृष्ण आणि गोदावरी यांसारख्या अनेक नद्यांची माया ममता यांवर
माझी मातृभूमी पोसलेली आहे. या नद्या जणू काही माझ्या मातृभूमीच्या गळ्यातल्या हाराप्रमाणे माझ्या देशाचे सौदर्य वाढवतात. आणि आमचे सुंदर काश्मीर आमच्या देशाचा
स्वर्गच आहे. भारत देशावर निसर्गाचा तर वरदहस्तच आहे. नैसर्गिक सौदर्यांची एवढी
विविधता जगात अन्य कोणत्याही ठिकाणी पाहायला मिळत नाही. जगाला आचार, विचार, व्यापार-व्यवहार आणि ज्ञान विज्ञानाची शिकवण भारताकडूनच मिळाली आहे.
संयम, त्याग, अहिंसा आणि विश्वबंधुत्व हे भारतीय जीवनाचे आदर्श आहेत. सभ्यतेचा
सूर्योदय सर्वात आधी याच देशामध्ये झाला होता. विविध कला याच देशामध्ये उदयास
आल्या आणि विकसित झाल्या कृषि-विज्ञान, औषधींविज्ञान यांचा देशामध्ये चांगल्याप्रकारे विकास झाला. अजिंठा, एलोरा च्या गुहा
दक्षिण भारतामध्ये स्थित असलेली मंदिरे, आग्र्याला असणारा ताजमहाल असो व दिल्ली चा
कुतुबमीनार यांसारखे कलेचे उत्तम नमुने या माझ्या प्राणप्रिय देशामध्ये आपल्यलाला
पाहावयास मिळतात. हजारो-लाखो पर्यटक याना भेटी देसण्यासाठी दरवर्षी भारतामध्ये येत
असतात.
माझ्या
भारतमातेने अनेक नररत्नांना जन्म दिला आहे. सम्राट अशोकाचे शांतिपर्व, गौतम बद्धांचा त्याग, शिवाजी महाराजांची स्वराज्याची प्रेरणा
ही सर्व आमची स्फुर्तिस्थाने आहेत. दया, क्षमा, शांती यांची शिकवण देणाऱ्या संतांचा
आमच्या देशाला वारसा लाभला आहे. स्वातंत्रवीर सावरकर असोत व या भगतसिंग यांसारख्या
क्रांतिवीरांची तेजस्वी परंपरा माझ्या देशाला लाभली आहे. महात्मा फुले आणि डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकर यांसारखे दलितांचे कैवारी. लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस यांसारखे नेते गुरुवर्य
रवींद्रनाथ टागोर, सरोजिनी नायडू यांसारखे प्रतिभावान; स्वामी विवेकानंद, गाडगेबाबा यांसारखे
विचारवंत संत या सर्व महान विभूतींनी गौरवस्पद ठरलेला माझा भारत हा महानच आहे.
माझ्या
या भारत देशावर अनेक परकीय आक्रमणे झाली. अनेक संकटे आली मग ती मानवनिर्मित असूदेत
किंवा नैसर्गिक संकटे असोत. प्रत्येक संकटांचा सामना आम्ही भारतीयांनी एकत्र मिळून
केला आहे. आधुनिक जमध्ये सुद्धा भारताने आपले वर्चस्व कायम राखले आहे. शेती उद्योगधंदे व्यापार विविध सेवाक्षेत्र
तसेच शिक्षण असो वा संशोधन अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रामध्ये उच्च स्थान मिळून
भारत हा स्वयंपूर्ण बनला आहेच; शिवाय
जगातील जे कमजोर देश आहात त्यांना आधार देण्याची क्षमताही आज भारताने प्राप्त केली आहे. एक उगवती महासत्ता
म्हणून जग आज भारताकडे पाहत आहे. म्हणूनच तर सर्व जागतिक प्रश्नांच्या वेळी जगाला
भारताचे मत लक्षात घ्यावे लागतेच त्यामुळे जगाच्या पाठीवर कोठेही वावरणाऱ्या
भारतीयांच्या मनात एकाच मंत्र गुंजत असतो, तो
म्हणजे भारत माझा जगी महान !
मित्रांनो निबंध लिहिताना या मुद्द्यांचा अवश्य वापर करा.👇
[मुद्दे -
प्रस्तावना
जगातले सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र
भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधता
अनेक थोर पुरुषांचा, संतांचा येथे जन्म झाला.
संकटाच्या वेळी भारतीय एकजुटीने सामना करतात.
आधुनिक जगात भारताची प्रगती
तंत्रज्ञान, व्यापार विविध क्षेत्रामध्ये भारताचे स्थान अव्व्ल
भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर ]
हा निबंध खालील प्रकारे शोधू शकता.
- My country essay in Marathi
- Bharat maza desh aahe yavar nibandh
- Bhrat desh nibandh
- Bharat desh mahan nibandh
- Essay in mrathi maza desh
- Nivandh in Marathi maza desh
- माझा देश निबंध मराठी
- माझा देश निबंध
निबंध pdf file :
- निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
- तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
- माझा भारत महान ! आपला भारत देश कसा महान आहे , तुम्ही केलेल्या वर्णनातून तुमचे तुमचे मत आम्हाला नक्की COMMENT द्वारे कळवा.
धन्यवाद.