प्रयत्न
हाच परमेश्वर
'यत्न तोचि देव जाणावा' हे वचन समर्थ रामदासांचे आहे. समर्थ रामदासांच्या या वचनाचा अर्थ आसा आहे की, यातील 'देव' या शब्दाचा अर्थ ध्येय असा आहे. जीवन जगणे म्हणजे मनात जे ध्येय आहे ते प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करणे होय. आपले ध्येय जेव्हा प्रत्यक्षात उतरते तेव्हा माणसाला परम आनंद मिळतो. म्हणूनच ध्येय प्राप्ती म्हणजेच ईश्वर प्राप्ती होय, असे समर्थ रामदासांना या संदेश वचनातून सांगायचे आहे.
जीवनामध्ये
यशस्वी होण्यासाठी समर्थांनी अनेक गुरुमंत्र दिले आहेत, त्यामध्ये प्रयत्नांवर फार मोठा भर
दिला आहे. आपल्या ध्येयाला देव माना असे सांगण्यात आले आहे, सतत प्रयत्न करत रहा हेच समर्थ रामदासांना सांगायचे होते. 'केल्याने होत
आहे रे' यामध्ये कोणतीही गोष्ट तुम्ही मनापासून करायची ठरवलीत की, ती होणारच असे यांतून सांगायचे आहे.
प्रयत्न हाच परमेश्वर. | Prayatna hach parmeshwar.
नेपोलियन
सारखे महत्वाकांक्षी सम्राट म्हणायचे की, 'अशक्य
हा शब्द केवळ मुर्खांच्या शब्दकोशातच आढळतो'. समुद्रावर सेतू बांधणारा श्रीराम, आपल्या कठोर परिश्रमांनी ज्यांनी गंगा
पृथ्वीतलावर आणली ते भगीरथ,
तपश्चर्या करून अढळ स्थान मिळवणारा
ध्रुव किंवा शून्यातून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती
शिवाजी महाराज असोत अशी ही इतिहासात तसेच पुराणात आढळणारी कितीतरी माणसांची
उदाहरणे आपल्याला देता येतील. की ज्यांनी आपल्या प्रयत्नांच्या जोरावर अशक्य
गोष्टी ही शक्य करून दाखवल्या. आणि साऱ्या जगासमोर आपला आदर्श ठेवला.
आपण
आजच्या वेगवान जगात जगत असताना विविध साधनांचा
दैनंदिन जीवनात वापर करत असतो. जलप्रवास, विमानप्रवास,
रेल्वे प्रवास या गोष्टी आपल्याला
रोजच्या जीवनातल्या नित्यपरिचयाच्या झाल्या आहेत. तसेच सर्वांच्या परिचयाची असणारी
आकाशवाणी व दूरदर्शन या गोष्टीही दैनंदिन जीवनातल्या झालेल्या आहेत. परंतु हे सर्व
शक्य झाले ते फक्त भूतकाळातील प्रयत्नांमुळेच. त्यावेळी संशोधनात घेतलेल्या
प्रयत्नांमुळेच, आज आपल्यासमोर सोइ-सुविधा उपलब्ध आहेत. माणसाने आज चंद्रावर पाऊल ठेवले आहे; तरीही त्याचा इतर ग्रहांचा शोध घेणे अजून काही थांबले नाही. आज आपण पाहत
आहोत की माणसाने अनेक रोगांवर रामबाण औषधोपचार शोधून काढले आहेत. माणसाच्या रक्तातील अतिसूक्ष्म पेशींचा वेध
घेतला. रक्तदान, नेत्रदान, हृदयाचे रोपण या अश्यक्यप्राय वाटणारी
गोष्टी त्याने शक्य करून दाखवल्या. कृत्रिम अवयवांनी कितीतरी अपंग लोकांना नवे
जीवन दिले; टेस्ट ट्यूब बेबीच्या रूपाने नवा मानव
घडवला. हे सर्व शक्य झाले ते केवळ प्रयत्नांमुळेच .
संशोधनाच्या
क्षेत्रामध्येच नाही,
तर इतर अनेक क्षेत्रांतही मानव एक एक
टप्पा जिंकत चालला आहे. आपल्याला माहीतच आहे की, शेरपा तेनसिंगने जगातील अति उंचावर
असणारे शिखर सर केले. ऑलिम्पिक मधील विविध विक्रम थक्क करून टाकणारे आहेत. वेगवेगळ्या कलांचा अभ्यास करणारे अनेक कलावंत देखील आपल्या प्रयत्नांच्या जोरावरच यशस्वी झाले आहेत. छपाई यंत्रासारखे शोध
लागल्याने ज्ञानाची गंगा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सातत्याने वाहते आहे. नव्याने आलेला संगणक म्हणजे एक प्रकारचा
चमत्कारच आहे. हे सर्व शक्य झाले कारण माणसांनी पाहिलेल्या स्वप्नांमुळे आणि ती
पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या अथक मेहनतीमुळे. माणसाच्या त्या अथक प्रयत्नांमुळेच
माणसाचे आयुष्य समृद्ध झाले आहे.
मित्रांनो निबंध लिहिताना या मुद्द्यांचा अवश्य वापर करा.👇
[मुद्दे -
- प्रयत्न हाच परमेश्वर
- रामदासांचा प्रयत्नांवर मोठा भर
- कित्येक लोकांच्या प्रयत्नांनीच आज मानवी जीवन घडले
- मानवी कर्तृत्वाची शिखरे प्रयत्नांनीच पादाक्रांत
- माणसाच्या अथक प्रयत्नांनीच आज मानवी जीवनची समृद्धी.]
हा निबंध खालील प्रकारे शोधू शकता.
- Prayatna hach parmeshwar nibandh in marathi
- Yatn tochi dev janava
- Prayatnanti parmeshwar
- prayatnanti parmeshwar essay in marathi
- प्रयत्न हाच परमेश्वर भाषण
निबंध pdf file :
प्रयत्न हाच परमेश्वर.Pdf file.
- निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
- तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
- जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत राहणे गरजेचे असते , याबाबत तुमचे मत आम्हाला नक्की COMMENT द्वारे कळवा.
धन्यवाद.