रम्य ते शालेय जीवन
बारावीचे वर्ष संपत आले होते फक्त परीक्षा शिल्लक राहिल्या होत्या. तेव्हा जाणीव झाली की, आपल्या जीवनातील बाहेर संपत आली. आता सर्वांच्या वाट
वेगवेगळ्या होणार. काहीजण आपले चालू ठेवतील, तर काही जणांना आपापल्या कौटुंबिक
जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. त्यासाठी नोकरी-व्यवसाय
शोधावे लागतील. एकूणच काय तर,
आत्ता बालपण संपले.
'रम्य
ते बालपण' म्हणून सर्वानीच आपल्या बालपणातील
जीवनाला गौरविले आहे. पण जेव्हा बालपणाला शालेय जीवनाची साथ लाभते, तेव्हा त्याची गोडी अधिकच वाढते. आत्ता त्या शालेय जीवनाच्या मंतरलेल्या दिवसांच्या नुसत्या आठवणीच उरल्या
आहेत.
रम्य ते शालेय जीवन (वर्णनात्मक निबंध) | Ramya te shaley jivan nibandh.
जुनिअर कॉलेजला असताना कधी-कधी तासांचा
कंटाळा यायचा. पण शालेय जीवनातील इतक्या वर्षांमध्ये कधीही एकाही तासाचा कंटाळा
आलेला मला आठवत नाही. कारण त्या काळात शिकण्याचा कधी कंटाळा आलाच नाही. शिकण्यात
मन इतके मग्न होऊन जात असे की शाळेची मधली सुट्टी कधी व्हायची काही समजायचे सुद्धा
नाही.
आमच्या शाळेची वेळ सकाळी १० वाजता ची असायची.
पण आम्ही वेळेच्या आधीच हजर असायचो.
शाळेत पोहचल्यावर आम्ही सर्वजण शाळेच्या पटांगणाचा साफ-सफाई करायचो आणि नंतर दिवसाची सुरवात परिपाठाने होत असे.
प्रत्येक दिवसाचे विशेष महत्व, सुविचार
आणि एक छान बोधकथा यावेळी ऐकायला मिळायची. यावेळी शिस्तीचे पालन देखील होत असे.
शिकण्यात कधी वेळ जायचा काही कळायचे सुद्धा नाही दुपारी जेवणाची बेल व्हायची
तेव्हा आम्ही सर्व मित्र-मैत्रिणी शाळेत मिळणारा पोषण आहार घ्यायचो आणि सर्वजण
एकत्र बसून जेवण करायचो. त्यावेळी सर्वानी मिळून 'वदनी कवळ घेता' हा भोजन मंत्र
म्हणण्याची मज्जाच काही वेगळी होती. सायंकाळच्या वेळेला आम्ही खेळायला बाहेर जायचो.
कबड्डी, खो-खो, लपाछपी यांसारखे खेळ सर्वमिळून खेळायचो आजही आठवतात ते सोनेरी क्षण !
मला आठवतंय आम्ही चौथीत असताना पहिल्यांदा
सहलीला गेलो होतो. तेव्हा आम्हाला केवढा आनंद झाला होता. सहलीच्या आधी आम्ही काही
दिवस सहलीला जाण्याची तयारी करायला लागायचो. सहलीला गेल्यावर एकत्र फिरणे, मौज-मजा करणे सर्वजण एकत्र मिळून जेवण करणे आणि विविध प्रेक्षणीय
स्थळांना भेटी देताना गर्दीतून मार्ग काढताना एकमेकांना सांभाळून घेऊन जाणे कायम
लक्षात राहते.
शालेय जीवनात अजून एक महत्वाचा कार्यक्रम
असायचा तो म्हणजे शाळेचा कलामहोत्सव. यामध्ये प्रत्येक विद्यार्थी आपली कला सादर
करीत असे. कार्यक्रमाच्या आधी आम्ही काही दिवस कलेच्या तासाला कालमोहत्सवाच्या
कार्यक्रमांची तयारी करत असू. सर्वांसमोर रंगमंचावर जाऊन आपली कला सादर करण्याचा
आनंद वेगळाच असायचा. तसेच शाळेचा क्रीडामोहत्सव अविस्मरणीय क्षण असायचा आमच्या
शाळेने तर खूप पारितोषिके जिंकली होती.
खरंच ! बालपण किती निरागस आणि निर्मळ असत ना.
त्या वेळी आमच्या मित्रांमध्ये कोणी चॉकलेट्स आणली तर आम्ही ती सर्वजण वाटून खात
असू वर्गातल्या प्रत्येक मित्र-मैत्रिणीची काळजी घेत असू. कोणाला बरं नसेल तर
त्याला शाळेतून घरी जाताना आम्ही सर्वजण त्याला घरी पोहचून त्यांनंतरच आम्ही
आपापल्या घरी जायचो. कधी-कधी आमच्यात छोटी-छोटी भांडणे देखील होत असत. मग आम्ही रुसून बसायचो. तुझ्याशी कधीच बोलणार नाही असे
एकमेकांना सांगायचो. पण हा रुसवा काही
जास्त काळ टिकायचा नाही काही क्षणांत परतपूर्वीसारखे व्हायचं. पुन्हा हसत खेळत एक
होऊन जायचो. किती सुखद अनुभव असायचा ना तो जेव्हा आपण पडलो कि सारा वर्गच आपल्याला
उचलायला धावायचा. कसे विसरणार ते दिवस.
आजही आठवते ते आमचे सर्वांचे निस्वार्थ, निर्मळ आणि जिवाभावाच नातं. जे आम्हाला
शाळेमुळं मिळाले होते. कोणाकडूनही कसल्या अपेक्षा नसायच्या. येणार प्रत्येक दिवस
आनंदातच जगायचं हे जणू काही आमचं ठरलेलंच असायचं कोणाला काही अडचण असली तर ती आम्ही सर्वमिळून सोडवत असू.
अशीच बालपणातील वर्ष कधी सरुन गेली काही समजलेच
नाही. आम्ही दहावीत गेलो. शालेय जीवनात अनेक उपक्रम पार पाडले
वृक्षारोपण, बाळ
आनंद मेळावा, थोर
पुरुषांच्या जयंत्या इत्यादी. दहावीचे वर्ष आमच्यासाठी महत्वाचे वर्ष होते कारण
याच परीक्षेवरून आमची पुढची वाटचाल ठरणार होती. दहावीच्या वर्षाच्या सुरवातीपासूनच
आम्ही अभ्यासाला खूप सुरवात केली. शिकताना अनेक गमती-जमती केल्या पण अभ्यासही
तितक्याच एकजुटीने केला. त्यामुळे आमच्या वर्गाचा निकाल १०० टक्के लागला. शालेय
निरोप समारंभाच्या कार्यक्रमात या शाळेला सोडून जायच्या कल्पनेनेच आम्ही रडू
लागलो. पण सत्य स्वीकारावंच लागणार होत. आता या ननंतरच्या काळात सर्वांच्या वाटा वेगळ्या झाल्या
आहेत. शाळेला भेट दिली कि बालपण
डोळ्यांसमोर उभं राहतं. शालेय जीवनातील गमती जमती, त्या रम्य आठवणी आजही माझ्या जवळ आहेत.
मित्रांनो निबंध लिहिताना या मुद्द्यांचा अवश्य
वापर करा.👇
[ मुद्दे -
- शालेय जीवन संपत आले
- ही जाणीवच दुःखद
- लहान-लहान गोष्टीतही आनंद
- सहल, क्रीडामोहत्सव, कलामोहत्सव आणि अभ्यासही
- निरागस, निर्मळ बालपण
- शेवटची परीक्षा
- मंतरलेले दिवस संपले
- राहिल्या त्या फक्त आठवणी.]
हा निबंध खालील प्रकारे शोधू शकता.
- माझे विद्यार्थी जीवन in marathi .
- शालेय जीवनातील आठवणी निबंध.
- शालेय जीवनातील गमती जमती.
- Ramya te shaley jivan nibadh.
निबंध pdf file :
निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
शालेय जीवनाविषयी तुम्हाला काय वाटते ? तुमच्या शालेय जीवनातील आठवणी आम्हाला नक्की COMMENT द्वारे कळवा.
धन्यवाद.