BUY PROJECT PDF Click Here!

शेतकऱ्याची आत्मकथा. (आत्मकथनात्मक निबंध.) | Shetkaryachi aatmakatha.

Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

शेतकऱ्याची आत्मकथा 




       या साहेब, या बसा बसा. आज शहरातून अचानक गावाकडे कस काय येणं केलंत. हे थंड पाणी प्या. मी एक शेतकरी आहे. या छोट्याश्या गावामध्ये राहतो. पण आपल्या संस्कृतीला विसरलेलो नाही. आज तुम्हाला मी माझ्या जीवनाची गोष्ट सांगतो.

 

        मी एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझ्या गावातल्या मित्रांसोबत विटी-दांडूलपाछपीकबड्डी यांसारखे खेळ खेळण्यातच माझे बालपण निघून गेले. गावातल्या शाळेत मी फक्त चौथीपर्यंत शिक्षण घेतले. नंतर मी माझ्या वडीलांसोबत शेतामध्ये काम करू लागलो. काही वर्षांनी माझं लग्न झाले.


 

शेतकऱ्याची आत्मकथा. (आत्मकथनात्मक निबंध.) | Shetkaryachi aatmakatha.

शेतकऱ्याची आत्मकथा | Shetkaryachi aatmakatha.


        आता सगळ्या शेती-वाडीची जबाबदारी माझ्यावर होती. मी नांगर आणि माझ्याबरोबर दिवसभर मेहनत करणारे आमचे दोन बैल घेऊन सकाळी-सकाळी शेतामध्ये जात असे. ऋतुमानानुसार नांगरणीपेरणीशेतीला पाणी देणे यांसारखी कामे करीत असे. शेती तयार झाल्यानंतर कापणी-झोडपणी च्या कामामध्ये व्यस्त व्हायचो. सकाळी  घरातील पुजा-अर्चा झाल्यांनतर बाबा शेतावर येत असत. दुपारच्या वेळी माझी पत्नी आमच्या दोघांसाठी जेवण घेऊन शेतावर यायची. जेवल्यावर आम्ही काही वेळ आराम करायचो आणि नंतर पुन्हा काम करायला लागायचो. कधी-कधी पत्नीसुद्धा आमची कामात मदत करायची. अथक परिश्रमानंतर सोनेरी पिक पाहून आमचा आनंद गगनात मावेनासा व्हायचा.

 

        अचानक सर्व काही बदलून गेले. 'काय करणार?' आभाळच फाटले तिथे कुठे कुठे आपण ठिगळ लावणार. नशीबच फिरलय म्हणा ना आमचं ! किती सुखात  जगत होतो आम्ही. फार नाहीपण आमची पोटापुरती शेती होती. शेतामध्ये कष्ट करायचे आणि आपल्याला हवं ते पिकवायचं आणि देवाचं नाव घेऊन सुखामध्ये जीवन जगायचं. वर्षामधून एकदा पंढरीच्या वारीला जायचं आणि आपला सगळा क्षीण देवाच्या पायी वाहून मोकळं व्हायचं.

 

        परंतु दिवसच फिरले गेले दोन-चार वर्षे धड पाऊस-पाणी झाला नाही. शेतामध्ये केलेली पेरणी फुकट गेली. दुबार पेरणी केली तर ती बियाणेच खराब निघाली. गेल्यावर्षी पाऊस शेतीला पूरक पडला. कापसाचे पीकसुद्धा चांगले आलेपरंतु त्याची विक्री मोठया प्रमाणावर झाली नाही. पैशाची कमतरता निर्माण झाली. त्यात पोरीचे वय झाल्याने. गेल्या वर्षी तिचंसुद्धा लग्न लावून द्यावं लागलं. कोणतही काम करायचं म्हटलं तर त्याला पैशाशिवाय पर्याय नाही. गावात असणाऱ्या सरकारी बँकांचा तर कधी उपयोगाचं झाला नाही. मग गावामधल्या सावकाराकडून कर्ज घेतले. परतफेड करायची तर ते शक्यच झालं नाही. दामदुप्पट व्याजामुळे कर्जाचे ओझे वाढतच जात होते. दिवसेंदिवस अडचणी वाढतच जात होत्या. वडील सारखे अस्वस्थ असायचे. सारखा कर्जाचाच विचार करत बसायचे.

 

        या वर्षी वडीलांनी खूप धावपळ केली. अगदी मदत मिळवण्यासाठी दिल्लीपर्यंत जाऊन आले. पण आम्हाला कुठूनही मदत मिळाली नाही. सावकार एकसारखा पैशाचा तगादा लावूनच बसला होता. कुठूनही मदतीचा हात मिळत नव्हता. वडील दुःखात बुडालेले असायचेकाय करावे हा आमच्यासमोर मोठा प्रश्न उभा होता. एक दिवस बाबा शेतावर गेले आणि घरी परतलेच नाहीत. स्वतःच लावलेल्या झाडाला गळफास लावून जीवन संपवले.

 

        ते सुटलेपण आम्ही काय करायचेआमच्या शेतावर अधिकार मिळवण्यासाठी गावातील सावकार उत्सुक आहे. सरकारतर्फे किंवा कोणाकडूनही पाऊस कमी झाल्याने नुकसान झालेल्या शेतीची भरपाईसुद्धा मिळाली नाही. आमच्यागावातील इतर शेतकऱ्यांचीसुद्धा अशीच अवस्था आहे. सरकारकडून एक लाख रुपये मिळाले ते पण गावातल्या तहसीलदाराने तीस हजार काढून घेतले आणि उरलेले पैसे सावकाराला देणे भाग पडले . आम्हा शेतकऱ्यांचं जीवन अनेक प्रकारच्या समस्यांनी भरले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यांनतरही इतकी वर्षे झाली तरी आमच्या गावामध्येवीजपाणी,आरोग्य सुविधाशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नाहीत. फक्त सण आणि उत्सवच आमच्या जीवनात नवे रंग भारतात. होळीदीपावलीरक्षाबंधन सारख्या दिवसांमधून आणि जत्रांतून आम्हाला जगण्याचा नवीन उत्साह मिळतो.

 

        आता माझे वय झाले आहे. शेतीवाडीचे काम माझा मुलगा सांभाळतो. मी फक्त दरवाजात बसून देवाचे नाव घेण्यात दंग राहतो. कोणी साधू-संन्यासी आला तर त्याला शक्तीनुसार काही दान देतो. दरवाजावर आलेय कोणत्याही अतिथीला मी रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत.

 

        या वर्षी माझी या गावाचा सरपंच म्हणून निवड झाली आहे. या पदावर राहून मी गावाला अशिक्षणव्यसनाधीनता यांसारख्या समस्यांपासून मुक्त करण्यात यश आले तर मी माझ्या जीवनाला धन्य समजेन.





मित्रांनो निबंध लिहिताना या मुद्द्यांचा अवश्य वापर करा.👇

[मुद्दे- 

  • प्रस्तावना
  • जन्म आणि बालपण 
  • शेतीची जबाबदारी
  • ष्काळाची परिस्थिती आणि मुलीचे लग्न
  • सुखी कुटुंब
  • निसर्गाचा लहरीपणा 
  • रात येणाऱ्या अडचणी  
  • कोणाकडूनही मदतीचा हात नाही  
  • बँका सावकार यांचे कर्ज  
  • वडिलांची आत्महत्या 
  • सण समारंभातून जगण्याचा उत्साह  
  • वर्तमानातले जीवन 
  • शेवटची इच्छा]


हा निबंध खालील प्रकारे शोधू शकता. 

  • शेतकऱ्याची आत्मकथन निबंध मराठी 

  • शेतकऱ्याची आत्मकथा निबंध लेखन 

  • शेतकऱ्याची आत्मकथा याविषयी निबंध

  • Shetkaryche atmavrutta

  • Shetkaryche mabogat marahi nibandh

  • Shetkaryche atmavrutta nibandh

  • Eka shetkarychi atmakatha in marath

  • Shetkaryachi vyatha marahi nibandh 




 निबंध pdf file :

मित्रांनो या निबंधाची  Pdf  फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील link वर क्लिक करा



  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • आपल्या शेतकरी राजा च्या समस्यांबाबत आपले मत आम्हाला नक्की COMMENT द्वारे कळवा.



धन्यवा


Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.