आईची माया
![]() |
आईची माया.| Aaichi maya |
आई शब्दाचा उच्चार करताच आपल्या डोळ्यांसमोर एका
दिव्य मूर्तीची प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. तिच्या ममत्वाचा शेवट
कुठेही नसतो. आईच्या कुशीत बसण्यात जे ते
सुख त्रैलोक्याच्या राज सिंहासनावर बसण्याच्या सुखापेक्षा मोठे सुख असते. आईच्या
प्रेमाची तुलना इतर कोणाच्याही प्रेमाशी होऊ शकत नाही.
आईचे
प्रेम अनमोल असते. जर आपण पशु-पक्षांमध्ये बघितले तर अगणित मातृप्रेमाची अनेक
उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील. झाडांवर राहणारे माकड आपल्या मुलांना सतत पोटाशी
धरून ठेवतात. मांजर आपल्या पिल्लांना तोंडामध्ये धरून सुरक्षित ठिकाणी घेऊन जाते, पण ती तिच्या पिल्लांच्या शरीरावर
आपल्या दाताचा एक ओरखडासुद्धा येऊ देत नाही. कांगारू
मादी आपल्या पिल्लाला पोटाच्या पिशवीमध्येच ठेवते. गौमाता स्वतःच उपाशी राहून
आपल्या पिल्लाला चार खाऊ घालते. इतकेच
नाही तर काही वेळा तर पशु-पक्षी आपल्या पिल्लांच्या रक्षणासाठी आपल्या
प्राणाची पर्वा सुद्धा करत नाहीत.
आई
आपल्या मुलांचा आनंद बघून स्वर्गसुखाचा अनुभव करते. जेव्हा तिचे बाळ रडते किंवा
अस्वस्थ होते, तसेच एखाद्य वेळेस पडल्यानंतर त्याला
दुखापत होते तेव्हा आई बाळाला प्रेमाने उचलते त्याचा गालगुच्छा घेते आणि उराशी
कवटाळते, त्या बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करते. तिचे बाळ कुरूप, मंदबुद्धी, अंध असो वा बहिरे असो, तरीही त्याच्यासाठी असणारे तिचे प्रेम
काही कमी होत नाहो. आई ज्याप्रकारे एक हुशार, सुंदर
बाळाचे लाड करते; त्याच प्रकारे ती साधारण असणाऱ्या बाळाचे करते. जेव्हा मुलं आजारी
पडतात तेव्हा ती त्याची काळजी घेण्यासाठी दिवस रात्र एक करते.
एक
वडील आपल्या मुलाचे पालन-पोषण करतात, त्याच्या
शिक्षणावर खर्च करतात कारण तो मुलगा शिकून त्यांच्या म्हातारपणी घरातील सर्व
जबाबदाऱ्या आणि व्यवहार सांभाळेल आणि त्यांची सेवा कारे या आशेने. स्वतःचा मुलगा
बेजबाबदा निघाला तर होऊ शकते की, त्याचे वडील त्याला घरातून बाहेर काढू शकतात किंवा
त्याच्या शिक्षणावर तसेच इतर गोष्टींवर होणार खर्च करण्यासाठी नकार देतील. परंतु
एक आई असं विचार काहीच करू शकत नाही. ती ममतेची मूर्ती जी आहे.
मातेच्या निस्वार्थ आणि निर्मळ प्रेमामुळे मुलांमध्ये अनेक सद्गुणांचा विकास होतो. मातेच्या
सद्भाव आणि सत्प्रवृत्तीची छाप मुलानांच्या मनावर पडते. एका आईचे प्रेमचं एका
बाळाला आदर्श माणूस बनवते. मातेच्या एका प्रोत्सहानमुळेच तर ध्रुव ला ध्रुवपदाची
प्राप्ती झाली होती. जर माता जिजाबाईंनी शिवबा राजे लहान असताना चांगल्याप्रकारे
त्यांना घडवले नसते तर ते छत्रपती झाले नसते. मोहनदास ला महात्मागांधी बनवणारी
त्यांची आई पुतळाबाईच होती. खरंच! मतांनी अनेक नररत्नांना जन्म दिला आणि त्यांना
घडवले.
खरोखरच
! आईचे प्रेम हे अनमोल असते.
मित्रांनो निबंध लिहिताना या मुद्द्यांचा अवश्य वापर करा.👇
मुद्दे:
- आईचे प्रेम
- पशु-पक्षांमधले मातृप्रेम
- सर्वश्रेष्ठ मातृप्रेम
- इतरांच्या प्रेमाशी तुलना
- आईच्या प्रेमाची कमी
- प्रेमळ आई
निबंध pdf file :
निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
आईची प्रेम अनमोल असते तुम्हाला काय वाटते?आम्हाला नक्की COMMENT द्वारे कळवा.
धन्यवाद.