गुरु एक कल्पतरू.
गुरु एक कल्पतरू. | Guru ek kalpataru. |
गुरु एक कल्पतरू : मित्रांनो Educationalमराठी वर तुमचे स्वागत आहे. भारतीय संकृतीमध्ये गुरूला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनात त्याचे मार्गदर्शन करणारा कोणीतरी गुरु असतोच . आज आपण गुरु एक कल्पतरू हा निबंध पाहणार आहोत.
- निबंधाची Pdf file download लिंक खाली दिली आहे तेथून तुम्ही हा निबंध free मध्ये Downlod करू शकता.
गुरु:
साक्षात परब्रह्म । असा गुरूचा गौरव भारतीय संस्कृतीमध्ये केला जातो. गुरुबीन कौन बतावे बाट ? हा प्रश्न तर प्रत्येकाला पडलेला असतो.
ज्ञानाचे क्षेत्र कोणतेही असले तरी ते साध्या करण्यासाठी गुरु हा असावाच लागतो.
आपण जर माणसाच्या बाळाची इतर प्राणी-पक्षी यांच्याशी तुलना केली तर माणसाचे बाळ हे जास्तच परावलंबी असल्याचे दिसते. त्याला बोलायला, चालायला, खाण्यास प्रत्येक कृती करण्यास इतर कोणीतरी शिकवत असते सामान्यतः आई हीच आपल्या बालकाची पहिली गुरु असते. म्हणूनच म्हणतात-
आई माझा गुरु । आई माझा कल्पतरू ।
भारतात
गुरु-शिष्य परंपरा हि प्राचीन काळापासून पाहावयास मिळते. कच देवांना संजीवनी
विद्या प्राप्त करण्यासही शुक्राचार्यांचे शिष्यत्व पत्करावे लागले होते.
पुराणकाळात आचार्यमहिमा फार मोठा मानला आहे. द्रोणाचार्य हे कौरव-पांडवांचे गुरु.
अर्जुनाला शस्त्रविद्या ही त्यांच्या गुरूकडूनच मिळाली. एकलव्याला ती नाकारली
गेली. तरिसुद्द्धा एकलव्याने गुरूंचा पुतळा करून त्याला मनोभावे वंदन करून आपल्या
विद्येचे साधना केली आणि धनुर्विद्येत असामान्यत्व प्राप्त केले.
ज्ञानदेवादी संतांनी तर गुरुमहिमा फार मोठा मानला आहे. आपण
केलेल्या सर्व ग्रंथरचनेचे श्रेय ते आपल्या गुरूंना देतात. भावार्थदीपिकेत ते असे
म्हणतात "मी जी ही काही 'चावळी'- बडबड करत आहे, व
माझ्या गुरुंचाच कृपाप्रसाद आहे". भागवत धर्मियांत गुरूंना असामान्य
महत्व आहे. गुरुविण ज्ञानप्राप्ती नाही असे ते मानतात. आणि आपल्याला जे काही हवे
आहे, जे प्राप्त करायचे आहे ते सर्व देणारा गुरु हा कल्पतरू आहे, अशी त्यांची धारणा होती. म्हणूनच तर
प्रकांडपंडित असलेल्या चांगदेव महाराजांनी 'मुक्ताई' ला आपला गुरु मानले. तर
भक्तिपुरात बुडालेल्या नामदेवांनी विसोबा खेचर याना आपले गुरु म्हणून स्वीकारले. कारण 'देवाविण 'वाव नाही ठाव नाही' असा साक्षात्कार त्यांनी नामदेवांना घडवला होता व भगवंताविषयी
असणारे त्यांचे अज्ञान दूर केले होते.
संत
एकनाथ हे गुरु जनार्दनस्वामी यांचे नाव आपल्या नावाशी जोडतात आणि 'एक जनार्दनी' म्हणून सर्वात उल्लेख करतात. याशिवाय नाथांचे अनेक गुरु होते. जेथे जेथे त्यांना काही ना काही शिकायला मिळाले, तेथे त्यांना आपला गुरु
गवसला.
साहित्य
क्षेत्रातही अश्या गुरु-शिष्यांच्या जोड्या आपल्याला भेटतात. आचार्य अत्रे - राम गणेश गडकरी - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर ही , विनोदी साहित्यातील गुरु-शिष्य परंपरा आहे. श्रीपाद कृष्णांवर कोणी टीका
केली तर ती गडकऱ्यांना रुचत नसे. कवी मंगेश पाडगावकर हे कवी बा.भ.बोरकर याना
आपले गुरु मानतात; तर कवी बोरकरांनी कवी भा.रा.तांबे. यांना आपले गुरु मानले होते.
गुरु हा व्यक्तीच्या जीवनातील फार मोठा ठेवा
असतो. ती त्याची निष्ठा असते. श्रद्धा असते आणि स्फुर्तीही असते. ती सन्मार्गाला
नेणारी असते.
मुद्दे:
- गुरुचे स्थान उच्च ज्ञानमार्गावर नेणारा गुरु
- आई हा पहिला गुरु
- प्राचीन भारतातील गुरु-शिष्य परंपरा
- ज्ञानदेव, नामदेव, भागवत धर्मियांच्या गुरुपरंपरेला महत्व
- नाथानी अनेक गुरु केले
- शिष्य गुरुची विद्या पुढे नेतो
- आधुनिक वैज्ञानिक युगातही गुरु-शिष्य परंपरा आवश्यक
- मात्र स्वरूप वेगळे
हा निबंध खालील प्रकारे शोधू शकता.
- गुरु आणि शिष्य निबंध मराठी
- गुरु आणि शिष्य माहिती.
- गुरुची माहिती
- गुरुविण अनुभव कैसा कळे
निबंध pdf file :
निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
गुरुचे तुमच्या जीवनातील महत्व, आम्हाला नक्की COMMENT द्वारे कळवा.
धन्यवाद.