बातमीलेखन / वृत्तलेखनबातमीलेखन / वृत्तलेखन
📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃
आजचे युग हे माहितीचे युग आहे. तंत्रज्ञान तसेच
प्रसारमाध्यमांमुळे सारे जग जवळ आले आहे. जगात कुठेही घडलेल्या घटना , त्यांची अचूक माहिती आपल्याला घरामध्ये बसून वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन या प्रसारमाध्यमांद्वारे मिळत
असते. उद्या वादळाची शक्यता असल्याने कोणीही घराबाहेर पडू नये' यांसारख्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या बातम्यांपासून ते 'भारताकडून क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
यांसारख्या राष्ट्रीय स्तरावर घटनांबत सर्व बातम्या आपल्याला कळतात.
- वृत्त किंवा बातमी कशाला म्हणतात ?
आपल्या सभोवताली घडणाऱ्या विविध घटनांमधून जनतेला जिव्हाळ्याच्या वाटणाऱ्या घटनांची माहिती देणाऱ्या नियतकालिकाला आणि त्या माहितीला 'बातमी' किंवा 'वृत्त' असे म्हणतात.
- वृत्तलेखनाचे प्रमुख प्रकार :
१. बातमी
२. अग्रलेख
३. वृत्तलेख
- अन्य प्रकार :
१. स्तंभ
२. सदरे
३. वाचकांची पत्रे
चला तर सविस्तर पाहुयात वृत्तलेखन / बातमीलेखन
📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃
बातमी
- आपल्या आजूबाजूला घडणारी कोणतीही घटना बातमी होऊ शकते.
- कोणतीही घटना बातमी होण्यासाठी पुढील मुद्द्यांची पूर्तता होणेआवश्यक असते.
१. घटनेची तीव्रता :
एखाद्या घडलेल्या घटनेचा जर समाजातील
सर्वच घटकांवर सामान तीव्रतेने परिणामहोत
असेल तर , ती घडलेली घटना बातमी होऊ शकते.
२. घटनेची परिणामकता :
वाचकांना काही तरी नवे करण्याची
प्रेरणा देणारी, घटना, वाचकांच्या जीवनात काही महत्वाचे योग्य बदल घडवू शकणारी घटना बातमी बनू शकते.
मानवी जीवनाविषयी वाटणाऱ्या आस्थेमुळे काही घटनांना
बातमीचे स्वरूप प्राप्त होते. ( उदा: सयामी मुले, कूपनलिकेच्या
खड्ड्यात बराच काळ अडकलेले बालक )
३. समीपता :
वाचकांना त्यांच्या आजूबाजूला , जवळपास घडणाऱ्या घटनानांमध्ये जास्त रस असतो.
४. ताजेपणा :
एखादी घटना घडून गेल्यांनर खूप काळ लोटला असेल,तर ती घटना बातमी होऊ शकत नाही. उदा: वर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालात आणि त्याचे पेढे १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर देता का ? परंतु काही घटना या सामाजिकदृष्टया महत्वाच्या असतात. त्या घडल्यानंतर कालांतराने त्यांच्यावर प्रकाश टाकणारे धागेदोरे हाती लागतात. अशा वेळी ती मूळ घटना महत्वाची ठरते. म्हणून ती बातमी होऊ शकते. वेगळेपण किंवा
५. नावीन्य:
एखादा कुत्रा माणसाला चावला तर ती घटना बातमी होत नाही. पण जर माणूस कुत्र्याला चावला तर ती घटना बातमी होऊ शकते. वरील दोन्ही घटनांमधील वेगेळेपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करा.
📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃
वृत्तलेखनाची रचना कशी असावी ?
- बातमीचा मथळा :
कमी शब्दांमध्ये, आकर्षक आणि बातमीच्या गाभ्याचे दर्शन घडवणारा तसेच बातमी वाचायची उत्सुकता
वाढवणारा असावा.'कोण', 'केव्हा', 'कोठे', 'कसे', 'काय', आणि 'का', या सहा प्रकारच्या 'का' ची उत्तरे बातमीच्या
शिरोभागामध्ये लिहिणे
आवश्यक असते.
- बातमीचा शिरोभाग :
बातमीमध्ये असणारा सारांशाचा
महत्वाचा भाग
- बातमीचा तपशील :
घडलेल्या घटनेचे, वस्तुनिष्ठ वर्णन असावे.
- बातमी विस्तार :
बातमीचा कमी महत्वाचा तपशील.बातमीची भाषा
१. बातमीची भाषा साधी, सोपी असावी, वाक्य सुटसुटीत आणि लहान असावीत
२. बातमीतील वाक्यरचना अर्थहीन, पाल्हाळीक असू नये.
३. बातमी लेखनामध्ये अलंकारिक शब्द किंवा वाक्य रचना
टाळावी.
४. वाचकांनी एकदा वाचल्यानंतर सहज समजेल अशी लेखनाची भाषा असावी.
📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃
वृत्त लेखन करताना लक्षात ठेवायचे निकष
- वृत्तातील घटना विश्वासार्ह असावी.
- घटनेचा अतिमहत्त्वाचा भाग प्रथम लिहावा.. नन्तर त्याचे तपशीलवार स्पष्टीकरण द्यावे.
- बातमीला आकर्षक शीर्षक द्यावे ( जे लोकांचे बातमीकडे वेधून घेईल. )
- मथळा लिहून झाल्यावर, घटनेचे सविस्तर स्पष्टीकरण द्यावे घडलेली घटना क्रमाने सांगावी.
- वृत्तलेखनामध्ये ठिकाण, काळ, व्यक्ती यांचा उल्लेख असावा.
लेखन तटस्थपणे करावे.
- बातमी वाचल्यानन्तर ती घटना डोळ्यांसमोर उभी राहील असे लेखन करावे.
- भाषा, साधी , सोपी, वाचकांना पटकन समजेल अशी हवी.
- वृत्तलेखनात वाक्य छोटी असावीत तसेच परिच्छेद असावेत.
- वृत्तलेखन साकारात्त्मक असावे .
- घटना जशी घडली , तशीच सांगणे गरजेचे असते, अलंकारिक भाषा वापरू नये.
- लेखनविषयक नियम वृत्तलेखन करताना पाळावेत.
- तणावाचे वातावरण निर्माण होईल अशी बातमी असावी.
- बातमी सामाजिक ताणतणाव निर्माण करणारी नसावी.
- बातमी हे कोणाचीही बदनामी करणारी नसावी. मात्र अशा प्रकारची बातमी समाजाच्या हिताची असेल तर अवश्य द्यावी.
- वृत्तामध्ये अन्याय , हिंसा,
महिलांवरील अत्याचार यांचे भडक वर्णन
नसावे.
- वृत्तलेखन स्वच्छ सुंदर असावे. त्यामध्ये खाडाखोड करणे टाळावे.
बातमीची क्षेत्रे
सांस्कृतिक, क्रीडा, राजकीय, शालेय / शैक्षणिक, सामाजिक,वाङमयीन
, वैद्यकीय, वैज्ञानिक, दैनंदिन घटना, या घटकांच्या संदर्भामध्ये घडलेल्या घटनांच्या
बातम्या तयार होतात.
📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃
वृत्तांत लेखन कसे कराव
Vrutant lekhan format in marathi.
How to wright vrutant in marathi.
वृत्तांत लेखन mean
वृत्तांत लेखन meaning in marathi
📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃📃
- वृत्तांत लेखन म्हणजे काय ? वृत्तांत लेखन कसे करावे ? याबाबत आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास आम्हाला comment करून जरूर कळवा.
- subscribe करा जेणेकरून तुम्हाला या page वरील माहिती लगेच उपलब्ध होईल.
- आपल्या काही आमच्यासाठी सुचना असतील तर contact form च्या मदतीने आम्हाला जरूर कळवा.