वैचारिक निबंध
मित्रांनो Educationalमराठी मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण वैचारिक निबंध म्हणजे काय? त्याचा परिचय करून घेणार आहोत.या प्रकारच्या निबंधांचे परीक्षेमध्ये लेखन कसे करावे ? तसेच या निबंध प्रकारामध्ये कोणते-कोणते निबंध येतात याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत.
(सदर माहिती हि १०वी, ११वी, १२वी, यांच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित आहे.)
👉वैचारिक निबंध म्हणजे काय ?
परिचय:
वैचारिक किंवा चिंतनात्मक प्रकारच्या निबंधांमध्ये
दिलेल्या विषयावर आपले विचार मांडायचे असतात. दिलेले विषय हे नेहमी अवतीभोवतीच्या परिथिती संदर्भातले असतात.
आपल्या आजू-बाजूच्या परिस्थितीमध्ये कोणत्या उणीवा अथवा त्रुटी आहेत, त्या उणिवा निर्माण होण्याची कारणे
कोणती आहेत. या त्रुटी कशाप्रकारे कशाप्रकारे दूर करता येतील. या उणीवा दूर करत
असताना कोण -कोणत्या अडचणी येऊ शकतात येणाऱ्या अडचणींना कसे
सामोरे जाता येईल इत्यादी प्रकारच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण या प्रकारच्या निबंधामध्ये
द्यायचे असते. अशा प्रकारचे स्पष्टीकरण देत असताना, आपण
मांडलेला मुद्दा पटवून देण्यासाठी आवश्यक ती उदाहरणे द्यावीत. दिलेल्या विषयाच्या
संदर्भामध्ये आपल्याला माहिती असतलेल्या उदाहरणांचा अवश्य समावेश करावा. त्यामुळे
निबंध अधिक चांगला बनतो.
वैचारिक निबंध या प्रकारच्या निबंधासाठी जे विषय
परीक्षेमध्ये दिले जातात, त्यांना कधी कधी दोन बाजू असतात. त्या
विषयांमधील जी बाजू आपल्याला योग्य वाटत
असेल त्या बाजूबद्दलचे मत मांडत असताना, म्हणजे त्या
बाजूचे समर्थन करताना त्या विषयाची दुसरी बाजू लक्षात घ्यावी. आपली मते मांडण्यापूर्वी
विरुद्ध बाजूची मते मांडावीत. विरुद्ध बाजू कशी चुकीची आहे हे काही उदाहरणे देऊन
वाचकांना पटवून द्यावे. त्यानंतर आपल्याला जी बाजू योग्य वाटते त्या बाजूचे मुद्दे
मांडावेत आणि ते मुद्दे कसे योग्य आहेत. हे पटवून देण्यासाठीसुद्धा आपण उदाहरणे
द्यावीत 'सुविचार' आणि 'अवतरणे' यांचा समावेश करावा यांच्या वापराने आपले विचार
प्रखरपणे स्पष्ट होण्यास मदत होते. या निबंधांना चर्चात्मक निबंध असेही म्हणतात.
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
👉विद्यार्थ्यांपुढे असणारा एक महत्वाचा प्रश्न : -
निबंधाची सुरुवात कशी करावी ?
निबंधाची सुरुवात कशी करावी या बाबत कोणतेही निश्चित असे नियम नाहीत. प्रत्येक लेखक हा निबंध लिहीत असताना स्वतःच्या प्रकृतीनुसार किंवा त्या वेळेच्या गरजेनुसार निबंधाची सुरुवात करतो. दिलेल्या विषयांमधील समस्या उत्पन्न करणारा प्रसंग सुरुवातीला सांगून निबंधाची सुरुवात करता येते. आणि मग ते मत खोडत खोडत आपले मत मांडता येते. किंवा थेट आपले मत मांडून सुरुवात करत येते. निबंधाची सुरुवात कधी कधी, सुविचार, म्हण, किंवा थोर व्यक्तींचे उद्गार, किंवा लक्षणीय कल्पना अशा प्रकारे करता येते.
निबंधाचे मुद्दे तयार करून त्यांच्या योग्य क्रम लावावा. आणि त्या मुद्द्यांनुसार निबंधाचे लेखन करावे.
लक्षात ठेवा:
- वैचारिक निबंधाची भाषा सोपी असावी.
- या निबंधाचा समारोप एखाद्या मौलिक विचाराने करावा.
- या प्रकारचे निबंध हे गंभीर स्वरूपाचे असतात हे लक्षात त्याप्रमाणे निबंधाचे लेखन करावे.
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
अधिक वैचारिक निबंध पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👉या निबंध प्रकारामध्ये येणारे निबंध .
3. वेळेचे महत्व
4. बोलीभाषांचे वैभव
5. भारतीय शेतीपुढील आव्हाने
6. नद्यांची घुसमट
7. भारताची वैज्ञानिक प्रगती
8. व्यायामाचे जीवनातील महत्व
9. गर्लफ्रेंड - बॉयफ्रेंड - करियरमधील मोठ्ठी धोंड!
10. दूरदर्शन- शाप की वरदान ?
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
- वैचारिक निबंध म्हणजे काय? निबंधांचे लेखन कसे करावे ?याबाबत आम्ही दिलेली
माहिती तुम्हाला आवडल्यास आम्हाला comment करून जरूर कळवा.
- subscribe करा जेणेकरून तुम्हाला या page वरील माहिती लगेच उपलब्ध होईल.
- आपल्या काही आमच्यासाठी सुचना असतील तर contact form च्या मदतीने आम्हाला जरूर कळवा.