![]() |
Lahari paus aani shetakari | लहरी पाऊस आणि शेतकरी (वैचारिक निबंध) |
⛈⛈⛈⛈⛈⛈⛈⛈⛈⛈⛈⛈⛈⛈⛈⛈⛈⛈
मे महिना संपून जून महिना सुरु की, पावसाचे वेध लागतात. शेतकरी पेरणीची पूर्वतयारी करून आभाळाला डोळे लावून
पावसाची वाट बघू लागतो. शहरांना तसेच गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या धारणांबाबत
प्रसार माध्यमांमध्ये चर्चा होऊ लागते. पण पाऊस पडला लहरी ! तो माणसाच्या अपेक्षांना
दाद देत नाही. गेली काही वर्षे ७ जूनला सुरु होणाऱ्या मृगनक्षत्राचा मुहूर्त
पावसाने कधीही गाठला नाही.गेल्या वर्षी तर
त्याने कहरच केला. एकतर इतक्या उशिरा आगमन झाले की, शेतकऱ्यांच्या
तोंडाचे पाणी पळाले ! शेतकऱ्याचे पीक कसेबसे उभे राहिले तोच मुसळधार पाऊस पडून
सारे पीक जमीन दोस्त केले. मग अतिवृष्टी झाली, ढगफुटी झाली
आणि गावेच्या गवे पुरामध्ये वाहून गेली . मग तो अवकाळी कोसळला, वादळविजांसह आला. काही ठिकणी तर गारांच्या वर्षावाने गफळबागा उध्वस्त
झाल्या. शेतकरी आजचे कंबरडेच मोडले ! पाऊस लहरी असतो असे म्हटले जाते. पण लहरी
म्हणजे किती लहरी ? गेल्या वर्षी तर पहिले नक्षत्र संपत आले
तरी पाऊस काही पडेना !
वेळेचे महत्व
नोकरी करणाऱ्या माणसांना महिनाभर काम करताना महिना
अखेरीला पगार मिळणार याची खात्री असते. व्यापाऱ्यांना त्यांची वस्तू
विकल्यागेल्याक्षणीच नफा मिळतो. ते आपल्या उत्पादनाचा प्रचार व प्रसार करून शकतात.
शेतकऱ्याकडे यापैकी कोणताही मार्ग उपलब्ध नसतो. शेतकऱयाने कितीही कष्ट केले तरीही
सर्व अवलंबुन असते ते पावसावर.
पूर्वीची माणसे सांगतात की पूर्र्वी ऋतुचक्र नियमित
होते. मग आता असे काय घडले? आत्ता माणसांची संख्या बेसुमार
वाढली आहे. त्यांच्या निसर्गावरील आक्रमणाने निसर्गाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत
चालला आहे. त्यामुळे जागतिक तापमानवाढ होत आहे. या तापमानवाढीला ' ग्लोबल वॉर्मिंग ' असेही म्हणतात. या तापमान वाढीचा
ऋतुचक्रावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे . पावसाचा हा लहरीपणा हा त्यातूनच निर्माण
झाला. दुष्काळ , पूर , चक्रीवादळ,
अतिवृष्टी, ढगफुटी, उन्हाळा,
उष्म्याची लाट, अवकाळी पाऊस गारपीट इत्यादी. आस्मानी संकटे
हवामानाच्या बदलामुळे वारंवार येत आहेत.
प्रयत्न हाच परमेश्वर.
या येणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी मानवाला
युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागतील. नाहीतर फक्त शेतकरीच नाही आर संपूर्ण मानवी
जीवन नसत होऊन जाईल. तेव्हा हा विनाश टाळण्यासाठी आपण काय करायला हवे ? सर्वात प्रथम गोष्ट करावी लागेल ती म्हणजे धरतीवर पडणारा पावसाचा
प्रत्येक थेंब साठवून ठेवणे.
सध्याची पाण्याची परिस्थिती फार भयानक आहे. गेल्या काही वर्षांपासून तर नद-नाले ऑक्टोबर महिन्यातच कोरडे पडतात. विहिरी, तलाव हळूहळू तळ गाठू लागतात. पूर्वी आठ ते दहा फुटांवर खोदल्यावर पाणी मिळायचे तेथे आज दोनशे-तीनशे फुटांपर्यंत खोदावे लागते. याचे कारण जमिनी खालील पाण्याची पातळी खूप खोल गेली आहे. ही खालावलेली भूजलपातळी प्रथम वाढवायला हवी. म्हणून पावसाचे पाणी मिळेल त्या मार्गाने अडवायला हवे. पाझर तलाव बंधणे, तसेच डोंगर रांगांमध्ये , काडे-कपारीमध्ये शक्य तितके डोह खोदणे,इत्यादी कामे केली पाहिजेत. पावसाचे पाणी डोंगरउतारावरून झरझर वाहून जाते. ते जमिनीवर थांबतच नाही. म्हणणं मुरात ही नाही. उतारावरील पाणी अडवण्यासाठी आडवे चार खोदायला हवेत. विहिरी तलाव यांतील गाळ पावसाळ्याआधीच उपसला पाहिजे. तसेच मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली पाहिजे.
गुरु एक कल्पतरू.
दुसरी गोष्ट करणे गरजेची आहे ती म्हणजे पाण्याचे योग्य
प्रकारे नियोजन करणे. हे काम मात्र शासनाला करावे लागेल. राज्यानुसार विचार करावा
लागेल. तर महाराष्ट्राचा जिल्हानिहाय पाण्याचा नकाशा तयार करावा लागेल. जास्त पाऊस
पडणाऱ्या भागांतून कमी पाऊस पडणाऱ्या भागांकडेपाणी वाहून नेण्याच्या योजना आखाव्या
लागतील पण पाणी वाहून नेताना पाण्याचा कमीत कमी अपव्यय होईल आणि कमीत कमी बाष्पीभवन होईल. असे पहिले पाहिजे.
या सर्वांबरोबरच आपण आपल्या सवयी, आवडीनिवडी, परंपरा, याना पूर्णपणे बाजूला करून शास्त्रशुद्ध रीतीने पीक घेतले पाहिजे. ज्या भागामध्ये जे पीक शास्त्रीय दृष्टीने योग्य व शक्य आहे . त्याचेच उत्पादन घ्यावे लागेल. उदा : कमी पाणी असलेल्या ठिकाणी उसासारखे राक्षसी तहान असलेले पीक घेणे योग्य ठरणार नाही .
वैचारिक निबंध म्हणजे काय? निबंधांचे लेखन कसे करावे ?
मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या
मुद्द्यांचा अवश्य वापर करा👇
[मुद्दे :
पावसाचा लहरीपणा - काही अनुभव - शेतकरी व
अन्य लोक यांच्या उदरनिर्वाहाचे -
पावसाच्या लहरीपणामागील कारण - उपाय पाणी अडवणे पाणी जिरवणे - अत्यावश्यक
उपाययोजना करणे - पिकांचे नियोजन करणे. ]
- Nibandh pdf file downlod free
या निबंधाची Pdf file downlod करण्यासाठी खालील link वर click करा.
लहरी पाऊस आणि शेतकरी निबंध Pdf file downlod
- निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
- तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध
हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो
देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
- लहरी पाऊस आणि शेतकरी याबाबद्दल तुम्हाला काय वाटते , आम्हाला नक्की COMMENT द्वारे कळवा.