पत्र लेखन
![]() |
पत्र लेखन | Letter writing marathi. |
बोर्डाच्या परीक्षेमध्ये पत्रलेखन या प्रश्नाला ४ गुण आहेत. तसेच आपल्याला दैनंदिन पत्र
व्यवहार करावा लागतो. त्यासाठी पत्रलेखन
कसे करावे हे समजून घेणे आवश्यक आहे. आज आपण पत्रलेखनाविषयी माहिती घेणार आहोत. जी तुम्हाला परीक्षांमध्ये चांगले
गुण मिळवून देण्यास उपयुक्त ठरेल. चला तर मग सुरु करूयात.
कोणत्याही व्यक्तीने अन्य व्यक्तींशी साधलेला लेखी
स्वरूपातील संवाद म्हणजे 'पत्र' होय.
➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰
📌पत्रांचे प्रकार:
पत्रांचे दोन प्रकार पडतात
1. अनौपचारिक पत्रे आणि 2. औपचारिक पत्रे.
1. अनौपचारिक पत्रे:
आपण आपल्या आईवडील , आणि अन्य
कुटूंबीय नातलग किंवा मित्र-मैत्रिणी यांनी एकमेकांना पात्र लिहून त्यामधून
एकमेकांची खुशाली, अडचणी , सुख-दुःखे
इत्यादी जाणून घेण्यासाठी व पत्रे लिहिली जातात त्यांना अनौपचारिक पत्रे म्हणतात.
अनौपचारिक या प्रकारातील पात्रांचे स्वरूप पूर्णपणे
खाजगी आणि जिव्हाळ्याचे असते. या प्रकारातील पात्रांची भाषा व मजकुराचे स्वरूप या
गोष्टी पत्राशी संबंधित दोन्ही व्यक्तींवर पूर्णपणे अवलंबून असतात.
2.औपचारिक पत्रे:
कार्यालयीन तसेच व्यवसायिक कामांसाठी ज्या पात्रांचा
उपयोग केला जातो. औपचारिक पत्रे म्हणतात. अनौपचारिक नसलेली पत्रे म्हणजे औपचारिक
पत्रे होत. कर्तव्याच्या संबंधात म्हणजे पार पाडायच्या औपचारिक कामांच्या
संबंधामध्ये लिहिलेली पत्रे म्हणजे औपचारिक पत्रे होत. या प्रकारे पत्रांची
व्याख्या करता येईल.
औपचारिक पत्रांमंध्ये व्यक्तिगत संबंधांना तसेच
व्यक्तिगत भावभावनांना स्थान नसते.
➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰
📌पत्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या संक्षेपांचे अर्थ :
शि.सा.न.वि.वि. - शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष .
सा.न.वि.वि. - साष्टांग नमस्कार विनंती विशेष
स.न.वि.वि. - सप्रेम नमस्कार विनंती विशेष.
चि. - चिरंजीव
श्री. - श्रीयुत ; सौ. - सौभाग्यवती ;
श्रीम. - श्रीमती
ती. - तीर्थरूप
ती.स्व. - तीर्थस्वरूप
अ. आ. - अनेक आशीर्वाद
ता.क. - ताजा कलम
दि. - दिनांक ; ता. - तारीख
मा. / मान. - माननीय
➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰
📌आपल्याला पत्राची आवश्यकता का भासते ?
जेव्हा दोन व्यक्ती समोरासमोर असतात, तेव्हा त्या हावभावांनी किंवा हातवाऱ्यांनी संवाद साधतात. व्यक्ती दूर असल्यास दूरध्वनीच्या माध्यमातून संवाद साधला जातो.
परंतु काही वेळेला प्रत्यक्ष समोरासमोर बोलून किंवा दूरध्वनीवरून बोलून संवाद साधने पुरेसे नसते.
उदा: काही वेळा मनातले, खूप खोलवरचे भाव एखाद्या व्यक्तीच्या समोर व्यक्त करताना अवघडल्यासारखे होते. कधी कधी आ पण आपल्या भवन व्यक्त करत असताना समोरील व्यक्ती मध्येच बोलून भावनांचा ओघ अडवते. बोलत असताना आपल्या मनात जर उसळली तर मनातले भाव व्यक्त करता येत नाहीत. त्यामुळे आपण मनातल्या बोलून व्यक्त करू त्यामुळे अशा वेळी आपल्याला पत्र लेखनाचा आधार घ्यावा लागतो.
आपण जेव्हा समोरील व्यक्तीशी बोलतो तेव्हा आपण
उच्चारलेले शब्द क्षणार्धात पुसले जातात. ते पुन्हा पुन्हा ऐकता येत नाहीत. पण आपण
लिहिलेल्या पत्रातील शब्द पुन्हा पुन्हा
वाचता येतात , त्यामुळे आपल्या भावना समोरील व्यक्तीपर्यंत पोहचवणे सहजपणे शक्य होते.
काही वेळा याच पत्रांना काही ठिकाणी महत्वाचा पुरावा
म्हणून उपयोग होतो.
तोंडी संवादाची दखल बहुधा त्याच क्षणी घेणे आवश्यक
असते. अन्यथा कालांतराने बोलण्याचा काही भाग विसरण्याचा धोका असतो. पण असे
पात्राच्या बाबतीत नसते, तेथे विसरण्याचा धोका नसतो.
कार्यालयीन कामांमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये लेखी
स्वरूपात नोंद करणे अनिवार्य असते. कोण्यात्या कामासंबंधी कोणती कार्यवाही केली गेली, हे नोंदवण्यासाठी पत्राची गरज भासते.
वरील काही कारणांसाठी पत्र आवश्यक असते. पूर्वीच्या काळामध्ये पत्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असे. दळणवळणाची साधने अपूर्ण
असल्याकारणाने त्या काळामध्ये पत्र हे महत्वाचे संपर्क साधन होते.
हे सुद्धा वाचा:
Patra lekhan marathi 2020
Patra lekhan marathi 2020 10th class
patra lekhn marathimadhe
- मित्रांनो पुढील Post मध्ये आपण औपचारिक आणि अनौपचारिक पात्रांबाबत सविस्तर माहिती बघणार आहोत.
- माहिती आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
- तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू.