माझा आवडता ऋतू : पावसाळा
मला
कोणीही विचारले की, तुझा आवडता ऋतू कोणता ? तर
मी चटकन सांगेन की पावसाळा. पावसाळा
धरतीला एक अद्वितीय रूप प्रदान करतो. पावसाच्या रिमझिम पडणाऱ्या धारा या
सृष्टीला नवीन जीवन देतात. भारतासारख्या कृषिप्रधान देशासाठी पावसाळा ऋतू हा सुख
आणि समाधान सोबत घेऊन येतो.
पावसाळ्याच्या
आधी काही महिने कडक उन्हाळा असतो. सूर्याच्या प्रखर उन्हामुळे तर साऱ्यांच्या शरीराची
लाही लाही होत असते.सगळीकडे पाण्याची कमतरता भासू लागते. शेतकरी राजा तर आभाळाच्या
दिशेला डोळे लावून पावसाची वाट बघत असतो. पाऊस चांगल्याला पडावा आणि पीक
उत्तमप्रकारे यावे यासाठी देवाकडे हात जोडून प्रार्थना करतो.
आषाढ
महिना चालू होताच पावसाचे संकेत साऱ्या सृष्टीला मिळू लागतात. आभाळात काळे ढग पाहून
लोक आनंदित होतात. सारी सृष्टी सुखावते. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट
लोकांमध्ये जगण्याचा एक नवीन उत्साह भरतो. काही दिवसातच पावसाच्या सरी रिमझिम बरसू
लागतात. सगळा दाह हळूहळू शांत होतो. सारी सृष्टी आनंदित
होऊन पावसाचे स्वागत करते.
पावसाच्या
आगमनाने साऱ्या वातावरणात शीतलता पसरते. ही शीतलता मनाला सुखद अनुभव देते. पहिल्या
पावसाने मातीला एक अल्लादायक सुगंध येतो. झाडे-झुडपे हिरवीगार होऊन जातात. नदी-नाले, तलाव, झरे भरून वाहू लागतात. जमिनीवर
सर्वत्र हिरव्या गवताचा जणू गालिचाच पसरून जातो. प्राणी
हिरवे कोवळे गवत आनंदाने खातात. आंब्याच्या फांद्यांवर बसून कोकिळा कुहू कुहू करायला लागते. रानामध्ये मोर आपला पिसारा फुलवून नृत्य करायला लागतात. कधी तरी अचानक इंद्रधनुष्याचे
दर्शन होते. सारे वातावरण प्रसन्न होऊन जाते. सर्वांची पाण्याची चिंता मिटते.
शेतकरी सुखावतो. झाडे-वेली हिरव्यागार होऊन जातात आणि या धरतीला जणू हिरव्या
शालूने सजवतात. सारा निसर्ग मनमोहक होऊन जातो.
पावसाळा
आनंद आणि उल्हासाचा ऋतू आहे. गावातील लहान-लहान मुलं पावसात भिजून खेळ खेळतात. मुली
एकत्र जमून झाडाच्या फांदीला झोका बांधुन झोक्याचा आनंद घेतात. शेतकरी खुश होऊन
शेतीच्या कामाला सुरुवात करतो. नांगरणी, पेरणी ची कामे वेग घेऊ लागतात. याच ऋतूमध्ये
येणारे १५ ऑगस्ट, रक्षाबंधन, जन्माष्टमी तसेच गणेशोत्सवासारखे सण पावसाळ्याच्या आनंदामध्ये नवा उत्साह भरतात.
पावसाळा
हा कवींचा तसाच कलाकारांचा आवडता ऋतू आहे ! चित्रकार पावसाळ्यामध्ये दिसणारी
विहंगम दृश्यांच्या रेखाटनामध्ये मग्न होतात. कवी तर पावसावर विविध कविता करतात.
कधी-कधी अतिवृष्टीमुळे या ऋतूमध्ये नद्यांना भयानक पूर येतो. पुरामुळे शेतकऱ्यांची पिके नष्ट होतात. झोपडी, कच्ची घरे जमीनदोस्त होतात यामुळे अनेक लोक बेघर होऊन जातात. मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होते. या ऋतूमध्ये मलेरिया सारख्या रोगांचा प्रसार होतो.
तरीही, पावसाळ्याचे महत्व काही कमी होऊ शकत
नाही. अमृतासारखे जल देणाऱ्या या ऋतूच्या उपकार आपण कसे विसरू !
मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा 👇
[मुद्दे : प्रस्तावना - पावसाच्या आधीचे वातावरण - पावसाचे आगमन - पावसातील निसर्गाचे सौन्दर्य - लोकांचा आनंद - पाण्याची अनमोल देणगी देणारा ऋतू. ]
हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता
- पाऊस निबंध मराठी लेखन
- पावसावर
निबंध
- पावसाळा
या ऋतूंविषयी माहिती
- पाऊस
मराठी निबंध
- पावसाळा
निबंध in marathi
- Pavsala nibandh in marathi in short
- Pavsala nibandh in marathi language
- Rain season essay in marathi
- Pavsala var nibandh
- Essay on rainy season in marathi foar class 4 to 10
- Pavasala nibandh in marathi 10 lines
Nibandh pdf file downlod free
Nibadh Pdf file:
या निबंधाची Pdf file downlod करण्यासाठी खालील link वर click करा.
- निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
- तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
- तुमचा आवडता ऋतू कोणता आम्हाला तुमचे मत नक्की COMMENT द्वारे कळवा.
धन्यवाद.