माझा आवडता सण : होळी
![]() |
Maza aavtdata saan : Holi | माझा आवडता सण : होळी |
दिवाळी आपल्याला प्रकाशाचा संदेश देते, रक्षाबंधनाचा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. दसरा हा सण वाईट प्रवृतींवर विजयाचा सण आहे. तर होळीचा सण आपल्या जीवनाला आनंद आणि उत्साहाने भरतो.
होळी चा सण ऋतूंचा राजा असणाऱ्या वसंत ऋतूच्या मोहकतेचा संदेश घेऊन येतो. या वेळी पाना-पानांत , फांद्यांमध्ये , वृक्षांमध्ये नवजीवनाचा संचार होतो. शेतकरी आपल्या शेतातले पीक पाहून सुखावतो . आनंदित होतो. याच वेळी मोठ्या उत्साहाने फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्ष पौर्णिमेला होळीचा हा आनंददायी सण साजरा केला जातो.
होळी सणाच्या संदर्भामध्ये पौराणिक कथा प्रचलित
आहेत.
या प्रचलित गोष्टींमध्ये भक्त प्रल्हादाची गोष्ट
सांगितली जाते. नारायण भक्त प्रल्हादाला शिक्षा देण्याच्या हेतूने त्याचे वडील
हिरण्यकशिपू यांनी अनेक प्रयत्न केले, परंतु भक्त प्रल्हाद या सर्व दंडांपासून वाचत
होता. हिरण्यकशिपू ची बहीण होलिका हिला वरदान प्राप्त होते की अग्नी तिला जळू शकत
नाही. यामुळेच हिरण्यकशिपूच्या आदेशावरून होलिका भाक प्रहद ला आपापल्या मांडीवर
घेऊन अग्नी मध्ये जाऊन बसली. परंतु या सर्व प्रकारामध्ये होलिका जाळून भस्म झाली
आणि नारायणभक्त प्रल्हाद त्याच्या नारायण भक्तीमुळे सुखरूप राहिला.
याचप्रकारे एका असुरी शक्तीवर दैवी शक्तीचा विजय झाला लोकांनी याच आंनदामध्ये रंग
उधळून आनंदोत्सव साजरा केला. याच प्रकारे होळी च्या पावन सणाचा प्रारंभ झाला. अजून
एक कथा हणजे याच दिवशी बाळकृष्णाने पुतना राक्षसी ला मारून याच दिवशी गोपींसोबत
रासलीला केली होती आणि रंग उधळून उत्सव साजरा केला होता.
होळीच्या आगमनाच्या आधीच घराघरांमध्ये या उत्सवाचे वातावरण
तयात होते. लोक आपल्या घरांची साफ-सफाई करतात.
घरातील गृहिणी गोड-धोड पक्वान्न तयार करतात. बाजारात रंगांची दुकाने उघडली जातात.
मोठा प्रमाणावर लाकडांची जमवाजमव केली जाते. फाल्गुन पौर्णिमेच्या
संध्याकाळी होळी जाळली जाते. महिला नारळ,
कुंकू, आणि तांदूळ अर्पण करून होळीची पूजा करतात. लहान
मुले आनंदाने नाचतात, टाळ्या
वाजवतात. नवीन धान्याला होळीच्या आगीमध्ये शेकवून त्याचा प्रसाद सर्वांमध्ये वाटलं
जातो.
दुसरा दिवस म्हणजे धुलीवंदनाचा दिवस या दिवशी सर्वजण
एकत्र
मिळून होळी खेळतात. लोक रंगाने भरलेली पिचकारी
घेऊन बाहेर पडतात. या प्रकारे सगळे भेदभाव विसरून एकमेकांवर रंगांची उधळण करतात.
आणि आनंद लुटतात. सर्व ठिकाणींच गाणी चालू असलेली दृश्य आपल्याला बघायला मिळतात.
होळीचे वातावरण उत्साहपूर्ण असते. एका बाजूला रंग आणि दुसऱ्या
बाजूला गुलाल. मुले, मुली स्त्रिया तसेच वयस्कर माणसे या होळीच्या
रांगांमध्ये न्हाऊन निघतात.
एक दुःखाची गोष्ट आहे , ती म्हणजे काही लोक या दिवशी भांग तसेच नशा येणाऱ्या पेयांचे सेवन करतात. त्वचेसाठी हानिकारक असणाऱ्या
रंगांचा वापर करतात. एकमेकांवर चिखल फेकतात. काही
लोक तर गायी - गुरांसाठी असणारा या होळीमध्ये जाळतात. या वाईट कृत्यांपासून आपण दूर राहिले
पाहिजे. आणि आनंदात होळी साजरी केली पाहिले.
आपण हा होळीचा हा सुंदर सण शुद्ध
रंग आणि निर्मळ मनाने साजरा
केला पाहिजे.
मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा 👇
[मुद्दे : भारत आणि सण समारंभ - होळीच्या दिवसांतील नैसर्गिक सुंदरता - होळीच्या संदर्भातील प्रचलित पौराणिक कथा - होळी सणाचे वर्ण - नृत्य , संगीत - वाईट कृत्य करणे टाळावे - आनंदाने होळी चा सण साजरा करावा. ]
हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता
- माझा आवडता सण निबंध
- होळी निबंध
- Maza aavdta saan holi in marathi
- Maza aavdata san holi nibandh in marathi
- 10 points on holi marathi
- Holi purnima in marathi
- Holi nibandh
- Nibandh pdf file downlod free
- Nibadh Pdf file:
या निबंधाची Pdf file downlod करण्यासाठी खालील link वर click करा.
माझा आवडता सण : होळी निबंध pdf file .
- निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
- तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
- तुमचा आवडता सण कोणता आम्हाला नक्की COMMENT द्वारे कळवा.
धन्यवाद.