मी आमदार झालो तर...
![]() |
Mi aamdar zalo tar | मी आमदार झालो तर... |
➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰
आमची एकूण दीडशे - दोनशे घरांची वस्ती. सर्वकाही ठीक होते पण पाणी आणण्यासाठी. दोन ते तीन मैल पायपीट करावी लागत असे. शासनाच्या एका योजनेखाली आमच्या वस्तीसाठी नळपाणी योजना मंजूर झाली; आणि आमच्या वस्तीचे वातावरण एकदम ढवळून निघाले. आमच्या वस्तीच्या समितीचे अनेक गट पडले. पडले. भांडणे, कुरबुरी सुरु झाल्या एकमेकांवरचा विश्वास उडाला . काही गुंड येऊन नळपाणी योजनेसाठी आणलेल्या साहित्याची मोड-तोड करू लागले. इंजिनिअर रोज नवनवीन कल्पना लोकांसमोर ठेऊन भांडणे लावत होता. आमच्या समितीच्या चार पदाधिकाऱ्यांना गुंडानी घरात घुसून मारले. पोलीस तक्रार लिहून घेत नव्हते. आमदारांकडे गेलो तर ते लक्षच घालेनात. सगळेजण म्हणू, लागले ठेकेदाराने सर्वाना खिशात घातले आहे. तेच आमदार- खासदारांना लाच देऊन गप्प बसवतात. काही दिवसांनी तर आम्हाला पैसे द्या नाहीतर ही योजना होऊ देणार नाही अशा धमक्या येऊ लागल्या आणि सगळ्यांच्या तोंडाचे पाणीच पळाले!
मी फक्त सारे काही निमूटपणे पाहत होतो. कसली
लोकशाही ही ? लोकप्रतिनिधीच गुंडाना सामील झाले आहेत ? की गुंडच
राजकारणात आले आहेत ? सज्जन लोक राजकारणापासून लांब राहतात.
म्हणूनच दुर्जनांनी राजकारण आपल्या ताब्यात घेतले आहे. बाकी काहीही असो पण आता
आपणच आमदार व्हायला हवे . हा विचार माझ्या मनात सारखा घोळू लागला.
मला आमदारपदासाठी पात्र होण्यासाठी अजून काही वर्षे
आहेत. हे तर माझ्यासाठी खूपच चांगले झाले. मला आमदारपदासाठी भरपूर तयारी करता
येईल. माझी योजना तयारच आहे.
सर्वात आधी ग्रामपंचायत , पंचायतसमिती , जिल्हा परिषद नगरपालिका, महानगरपालिका, राज्य शासनाची असणारी कार्यालये या सर्वांच्या कार्यपद्धतीचा मी सविस्तर अभ्यास करेन. नागरिकांना या सर्व कार्यालयांमध्ये कोणकोणत्या कामांसाठी यावे लागते याची यादी करेन आणि प्रत्येक काम कशाप्रकारे केले जाते हे समजावून घेईन. सर्व कार्यालयांतील व्यवहार ऑनलाईन करण्याचा आग्रह धरीन. यामुळे नागरिकांची कोणत्या कामासाठी, कोणत्या ठिकाणी अडवणूक होते. हे येईल. भ्रस्टाचार आणि कामचुकारपणा यांवर थोड्या प्रमाणावर जरब बसेल.
याच सर्व कार्यपद्धतीची माहिती घेऊन झाल्यांनतर माझे
काम थांबवणार नाही. गावागावांमध्ये या माहितीचा प्रसार करेन . लोकांना याबाबत जागरूक
करेन. लोकांचे याबाबत प्रबोधन करेन. यांमुळे लोकांना कामकाजाच्या पद्धती समजतील आणि लोकांमध्ये जनजागृती होईल.
रास्त दाराची धान्य वाटप करणारी कार्यालये, पोलीस स्टेशन व हॉस्पिटल यांमधील
कार्यपद्धतींमध्येही मी काटेकोरपणा आणण्यास भाग पाडेन . लोकांनी शिस्तीचे पालन केले पाहिजे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनी लोकांना
सौजन्याची वागणूक दिली पाहिजे . लोकांना कामाशिवाय थोडा वेळ सुद्धा थांबावे लागू नये. तसेच निर्धारित शुल्कापेक्षा
एकही पैसा जास्त घेतला जाता कामा नये. यासाठी मी योग्य तो प्रयत्न करेन.
आज शासनाच्या कल्याणकारी परंतु त्या सर्वांची माहिती जनतेपर्यंत पोहचत
नाही. त्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवून त्यांची मदत करेन. योजनांसाठी पात्र
लाभार्थ्यांना त्याचा फायदा मिळवून देईन. शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना समाजकंटक लोक सामान्य जनतेला योजनांपासून दूर ठेवतात. अशा अडथळे आणणाऱ्या लोकांना चाप लावण्याचे काम विविध समित्यांच्या मार्फत करेन. जर आज समाजकंटकांवर चाप असता तर आज
आमच्या नळपाणी योजनेमध्ये घोटाळा झालाच नसता.
अजून बऱ्याच काही गोष्टी बदलता येतील, पण मी ठरवलेय तेवढे तरी झाले, तरी ते क्रांतिकारक
काम ठरेल. मी तर मनातल्या मनात निश्चित केले आहे की पूर्ण तयारीनिशी मी एक आदर्श आमदार होईन.
कल्पनात्मक निबंध म्हणजे काय? निबंधांचे लेखन कसे करावे ?
➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰
मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या
मुद्द्यांचा अवश्य वापर करा👇
[मुद्दे:
आमदार
होण्याच्या कल्पनेने माझ्या मनामध्ये प्रवेश केला - जनतेशी संबंधित असलेल्या
शासकीय कार्यालयांच्या कामकाजाची माहिती घेणे - लोकांनाही शिस्त लावणारे -
भ्रस्टाचाराला रोखणे - जनतेशी संबंधित असलेल्या कार्यालयांची जनतेला ओळख करून देणे
- पूर्ण तयारीनिशी आमदार होणे. ]
➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰
- मी आमदार झालो तर ...
- मी आमदार झालो तर निबंध.
- मी आमदार झाले तर मी आमदार झालो असतो तर
- Nibandh pdf file downlod free
या निबंधाची Pdf file downlod करण्यासाठी खालील link वर click करा.
➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰
- निबंध
आवडल्यास आम्हाला COMMENT करून
नक्की सांगा.
- तुम्हाला
कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये
किंवा CONTACT FORM द्वारे
संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
- तुम्ही
आमदार झालात तर काय नवीन बदल घडवून आणाल
तुमच्या कल्पना आमच्या पर्यंत यन्त नक्की COMMENT द्वारे
कळवा.