परीक्षा नसत्या तर..
आजच्या
स्पर्धेच्या जगामध्ये विद्यार्थ्यांना पदोपदी परीक्षांना सामोरे जावे लागते.
विद्यार्थ्यांना या परीक्षांच्या वेढ्यातून सुटकेचा निःश्वास घेताच येत नाही.
परीक्षा आणि विद्यार्थी यांचे एकदम घट्ट नाते असते. त्यामुळे एखाद्याला वाटले की
आपण विद्यार्थी होऊन शिक्षण घ्यावे, तरीही
त्याला परीक्षांना सामोरे जाणे नको वाटते. विद्यार्थी या शब्दाचा अर्थ काय तर - 'विद्या + अर्थी' विद्या संपादन करणारा. विविध प्रकारचे ज्ञान ग्रहण करणे, आत्मसात करणे. माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे विविध गोष्टींबाबत अधिक माहिती जाणून
घेण्यासाठी तो आतुर झालेला असतो. लहान-लहान मुले सुद्धा अनेक उपस्थित करत असतात. तेव्हा त्यांना उत्तरे देणे
भाग पडते. ज्ञानअर्जित करण्यासाठी शाळेत जाणे कोणाला नको असते. पण ज्या वेळी त्या
अर्जित केलेल्या ज्ञानाची परीक्षा घेतली जाते. तेव्हा ती विद्यार्थाला नकोशी
वाटत असते. कधी कधी मनात असा विचार येतो की याच परीक्षा नसत्या तर... तर काय झाले
असते?
परीक्षा
नसत्या तर... मुलं परीक्षा नाहीत या विचाराने खुश होऊन गेली असती . परीक्षेचे मोठे
ओझेच डोक्यावरून दूर झाल्याने ते पार्टी, सहली आणि सिनेमा यांची मजा घेत त्यांनी
आपला अनमोल वेळ वाया घालवला असता.
आजकाल
घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये विद्यार्थांनी अर्जित केलेल्या ज्ञानाची परीक्षा
न घेता त्यांच्या स्मरणशक्तीची परीक्षा घेत असल्याचे जाणवते. परीक्षा घेतल्या जात
असल्याकारणाने आजकाल विद्यार्थी फक्त मार्गदर्शनावर अवलंबून आहेत. ते शिकत
असलेल्या विषयाबाबत खोलवर जाऊन अभ्यास करण्याचा ते विचारसुद्धा करत नाहीत.
परीक्षेचा अभ्यास करताना विद्यार्थी अपेक्षित प्रश्नसंच आणि अतिमहत्वाच्या
प्रश्नांच्या मागे वेड्यासारखे लागतात. कशाही प्रकारे
येणाऱ्या परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होणे आणि पास झालेल्याचे
प्रमाणपत्र मिळवणे एवढेच ध्येय आज विद्यार्थ्यांचे बनले आहे. परीक्षा नसत्या तर
पदवी प्राप्त करण्यासाठी विद्यार्थाना मेहनत घ्यावी लागली नसती.
स्वप्ने नसती तर... निबंध.
आज
मध्यमवर्गातील लोक आपल्या पोटाची खळगी न भरता कमावलेला पैसा हा मुलांच्या जादा तासांसाठी (ट्युशन) साठी खर्च करतात. परीक्षा नसत्या तर त्यांना पैसे खर्च करावे लागलेच नसते. परीक्षा नसत्या तर मुलांना
महागड्या मार्गदर्शिका, अपेक्षित प्रश्नसंच यांच्यावर खर्च
करावा लागला नसता. आई-बाबा अभ्यासाला बस म्हणून ओरडले नसते. परीक्षेच्या वेळेला
परीक्षकांना लाच देण्याची किंवा अवैध मार्ग स्वीकारण्याची
गरजच पडली नसती. परीक्षकांच्या बेजबाबदारपणामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भावी
जीवन अंधारात जाण्यापासून वाचले
असते. परीक्षा नसल्यामुळे मुलांना
परीक्षा-कक्षात कॉपी घेऊन जायची वेळच आली नसती. आज आपल्याला परीक्षेमध्ये अपयश
आल्यामुळे आत्महत्येसारखे प्रकार वर्तमानपत्र तसेच टी.व्ही. वर पाहायला मिळतात. परीक्षा नसत्या तर या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली असती. परीक्षांचे ओझे
नसल्याने प्रत्येक विद्यार्थाने आनंदाने क्रीडास्पर्धा तसेच संगीत, नृत्यकला, नाट्यकला यांमध्ये भाग
घेऊन आपल्या गुणांना चालना दिली असती. यातून त्यांच्या सर्वांगीण विकास घडून आला
असता.

परीक्षा नसत्या तर ... (कल्पनात्मक निबंध) | Parisha nastya tar

परीक्षा
विद्यार्थ्यांना नको का असतात ? या
मागचे कारण, परीक्षा झाल्यानंतर दिल्या जाणाऱ्या निकालाचा ताण; त्या विद्यार्थ्यांचा आनंद, सुख
घेतो. जे ज्ञान अर्जित करण्यास काही महिन्यांचा कालावधी लागला त्या
ज्ञानाची परीक्षा काही तासांमध्ये घेतली जाते. याच तासांमध्ये एख्याद्या वेळी माही
चालत सुद्धा नाही. कधी तर सोपी असणारी गणिते सुद्धा परीक्षेमध्ये सोडवता येत
नाहीत. वर्गामध्ये रोज शिकलेल्या गोष्टी आठवेनाश्या होतात. रोज भराभर चालणारी लेखणी परीक्षेच्या काळात जणू रुसून बसते. आणि ते
परीक्षेसाठी असलेले मर्यादित तास संपून जातात. आणि जाता जाता विद्यार्थ्यांच्या
स्वप्नांचं चक्काचूर करून जातात. काही वेळेला तर विद्यार्थ्यांवर नापासाचा शिक्का लागतो, आणि तो विद्यार्थी साऱ्या समाजासमोर नालायक ठरतो. परीक्षांमध्ये अपयश प्राप्त होऊनही अनेक लोकांनी
गौरवास्पद कामे केलेली आपल्याला दिसून येतात. पण त्या वेळेला हे कोणीच लक्षात घेत
नाही. म्हणूनच असे वाटते की, परीक्षा
झाल्याचं नसत्या तर खूप बार झालं असतं.
परीक्षा
होऊन जोपर्यंत निकाल हाती येत नाही तोपर्यंत सगळे विद्यार्थी समपातळीवरच असतात. पण
निकालांनंतर काही पास तर काही नापास होतात. याप्रकारे भेदभाव निर्माण करणाऱ्या परीक्षा नसलेल्याच बऱ्या. परीक्षेतील यशावरच आपल्या जीवनाची वाटचाल अवलंबून आहे हे
लक्षात आल्यावर यशासाठी अवैध मार्गांचा अवलंब केला जातो. परीक्षेमधेल यश कधी कधी
इतके महत्वपूर्ण असते की यामध्ये परीक्षा घेणारे उच्च अधिकारीच विद्यार्थ्यांच्या
उत्तरपत्रिकेत गोलमाल करतात हे मागच्या काही परीक्षां बाबत झालेल्या खटल्यांमधून साऱ्या जगासमोर आले. खरंच परीक्षा नसत्या तर... विद्यार्थ्यांच्या आत्महत्या
थांबल्या असत्या.
नाण्याला
दोन बाजू असतात. आतापर्यंत एक बाजू पहिली. परीक्षा नसत्या तर प्रत्येक
विद्यार्थ्याला पुढच्या वर्गात प्रवेश देणे बंधनकारक झाले असते. विद्यार्थाने किती ज्ञान अर्जित केले हे कसे
कळणार? परीक्षा नसत्या तर विध्यार्थ्यांना
आपल्या जबाबदारीचे भानच राहिले नसते. विद्यार्थांनी ज्ञान अर्जित करण्याचा कधी
प्रयत्नच केला नास्ता. परीक्षांमुळे विद्यार्थाना
प्रगतीचे मोजमाप करू शकतात. यामुळे
परीक्षा असणे आवश्यक आहे.
आज
आपल्या देशामधली परीक्षापद्धती, ही काही प्रमाणावर दोषपूर्ण असली तरीही
व्यवहारिक दृष्टिकोनातून जर आपण विचार
केले तर परीक्षा होणे आपल्यासाठी खूप गरजेचे आहे. परीक्षे नसत्या तर.. ही कल्पना
आनंददायी असेल; पण परीक्षा नसाव्यात असा विचार करणे बरोबर नाही. परीक्षा आपल्या
आयुष्यात महत्वाच्या आहेत कारण त्यातून माणूस घडत जातो. म्हणून त्यांची आवश्यकता
आहे.
मित्रांनो निबंध लिहिताना या मुद्द्यांचा अवश्य वापर करा.👇
[मुद्दे:
- परीक्षा आणि विद्यार्थी यांचे घट्ट नाते
- विद्यार्थांनी अनमोल वेळ वाया घालवला असता
- आजकाल विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीची परीक्षा होते.
- परीक्षा नसत्या तर अनेक समस्यांपासून सुटका
- परीक्षेचे वाईट परिणाम
- विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास
- परीक्षांनंतर येणार निकाल
- भेदभाव
- वेळेची मर्यादा
- यशासाठी गैर मार्गाचा अवलंब
- परीक्षांचे महत्व परीक्षा होणे आवश्यक ]
हा निबंध खालील प्रकारे शोधू शकता.
- Nako tya pariksha
- Essay on if exams are not there in Marathi.
- Pariksha nastya tar essay in marathi
- Pariksha nastya tar nibandh lekhan in marathi
- Pariksha nastya tar nibandh
- Nako tya pariksha
- Essay on if exams are not there in Marathi.
- Pariksha nastya tar essay in marathi
- Pariksha nastya tar nibandh lekhan in marathi
- Pariksha nastya tar nibandh
निबंध pdf file :
- निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
- तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
- माझा भारत महान ! आपला भारत देश कसा महान आहे , तुम्ही केलेल्या वर्णनातून तुमचे तुमचे मत आम्हाला नक्की COMMENT द्वारे कळवा.
धन्यवाद.