BUY PROJECT PDF Click Here!

Sainikachi aatmakatha | सैनिकाची आत्मकथा (आत्मकथनात्मक निबंध)

Nibandh Pdf file free download करा फक्त आमच्या येथे. sainikachi aatmakatha
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

सैनिकाची आत्मकथा 

 

 

Sainikachi aatmakatha | सैनिकाची आत्मकथा (आत्मकथनात्मक निबंध)


Sainikachi aatmakatha | सैनिकाची आत्मकथा


        मित्रांनो  Educationalमराठी वर तुमचे स्वागत आहे. आज आपण आपल्या देशामध्ये बिनधास्तपणे राहू शकत आहोत ते फक्त आपल्या सैनिकांमुळे. भारतमातेचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतात वेळ पडल्यास स्वतःचा मृत्यू  समोर दिसत असताना, स्वतःच्या जीवाची पर्वा ना करता भारतमातेसाठी लढतात. मित्रांनो आज आपण अशाच एक सैनिकाचे मनोगत पहाणार आहोत. जे तुम्हाला परीक्षेमध्ये निबंध लिहिताना उपयोगी पडेल.

  • या निबंधाची Pdf file downlod LInk  दिली आहे; तिथून तुम्ही निबंध downlod करू शकता. चला तर मग निबंधाकडे वळूया...



        मी भारतीय सैन्यातील एक सेवानिवृत्त सैनिक आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी खूप वेळा दुष्मनांशी दोन हात करून लढलो. स्वतःच्याच पराक्रमाच्या घटना आठवतो, तेव्हा माझाच मला अभिमान वाटतो. आज तुम्हाला सांगतोच माझी कथा.


            " मी अगदी लहान होतो. तेव्हापासून मी एक आकांक्षा जपली होती. मला देशाचे सैनिक व्हायचे होते. सैन्यामध्ये मोठे अधिकारी होऊन मला परमवीरचक्र मिळवायचे होते. ते स्वप्न माझ्या नेह्मीच ध्यानीमनी असे. त्यामुळे मी बारावी उत्तीर्ण झाल्यांनतर एन.डी.ए. त  जाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा मला कोणीही विरोध केला नाही. माझ्या मनासारखे शिक्षण घेण्याची संधी मिळाल्याने मी अत्यंत खुश होतो. त्यामुळे शिक्षण घेता-घेता कधी वर्षे सरून गेली काही कळलेच नाही. अखेर मी सैन्यामध्ये भरती झालो. सैन्यामध्ये सतत शिक्षण चालूच होते. त्यामध्ये मी एक एक टप्पा पार करत पुढे चालतो होतो. वरच्या पदावर जाता जाता मी अधिकारी पदावर गेलो. पण,  वीरश्री दाखवण्याची माझी हौस काही भागली नव्हती.

शेतकऱ्याची आत्मकथा. (आत्मकथनात्मक निबंध.)

        ती संधीही माझ्यासाठी लवकरच चालून आली. भारत-पाकिस्थान युद्ध सुरु झाले आणि मला आपली वीरश्री दाखवण्याची संधी मिळाली. जोरदार युद्ध झाले. या युद्धामध्ये मी रणगाड्यावर होतो. आम्ही शत्रूवर दणदणीत विजय मिळवला. पण माघारी येत असताना घात झाला,  शत्रूने पेरलेल्या भूसुरुंगावर माझा पाय पडला आणि मी दूरवर फेकला गेलो. काय घडतंय हे समजण्याच्या आधीच माझी शुद्ध हरपली.


            "शुद्धीवर आलो तेव्हा मी एका रुग्णालयात होतो. जवळ-जवळ महिन्याभराचा काळ उलटून गेला होता पण जाणीव आल्यावर कळले की आपण आपले दोन्ही पाय गमावले आहेत. मला तो धक्काच बसलं. आता सर्व संपले ! आता आपण परत रणभूमीवर जाऊ शकणार नाही, हीच गोष्ट माझ्यासाठी फार वेदनादायक होती.


        "पण मी सैनिक होतो. निराशा झटकून टाकली. स्वतःला या धक्क्यातून लवकरच सावरले. मी कोणताही गुन्हा केला नव्हता. मी माझ्या देशासाठी लढताना माझे दोन्ही पाय गमावले होते, हे खरे. पण माझ्या मातृभूमीला विजय मिळून दिला होता ! मग मी माझ्या मनाशी निश्चय केला. माझ्यासारखेच अनेक अपंग मला आजूबाजूला दिसत होते. कोणी देशासाठी लढताना, कोणी समाजकार्य करताना अपंग बनला होता. तर कोणी तीव्र अपघातामुळे, तर कोणी जन्मताच अपंग झाला होता."


            " मग माझ्या मनाने उभारी घेतली, मी अपंगांसाठी एक संस्था सुरु केली; आणि त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला. त्यांना स्वावलंबी कारण्याचा प्रयत्न केला. अपंग करू शकतील असे व्यवसाय शोधले. माझ्या कामात यश मिळायायला लागले, तसे माझे काम वाढतच गेले, पुढे अपंगांसाठी विविध कार्यक्रम आयोजित ठीकठिकाणाचे अपंग एकत्र आले. हळू हळू या कामाचा गाजावाजा झाला व आज राष्ट्रपतींनी माझा सत्कार केला. अनेक अपंग लोकांना मी खऱ्या अर्थाने त्यांच्या पायावर उभे केले.


            "आज राष्ट्रपतींनी माझा सत्कार केला. तेव्हा त्या क्षणी  आनंद व दुःख अशा संमिश्र भावना माझ्या मनामध्ये दाटून आल्या. तुमच्या मनामध्ये विचार आला असेल  की , एवढामोठा सन्मान झाल्यावर दुःखाची भावना का ? त्याला कारण आहे. माझी महत्वाकांक्षा काय होती आणि आज माझा सत्कार कशासाठी होत आहे."

 

        सैनिक म्हणून सन्मान व्हावा असे वाटत असतानाच आज सत्कार होत आहे तो समाजसेवेसाठी ! निराळ्याच लढाईतील सैनिक म्हणून आज माझा सत्कार होत  होता!


        आता तर मी वृद्ध झालॊ आहे. गेल्यावर्षी कारगिल युद्धामध्ये  वीरता  दाखवल्यामुळे माझ्या मुलाला 'वीरचक्र' दिले गेले. माझ्या मुलाच्या विजयामध्ये मला माझा विजय दिसत होता.





मित्रांनो निबंध लिहिताना या मुद्द्यांचा अवश्य वापर करा.👇

 

[मुद्दे:

जुन्या आठवणी - सैनिक होण्याची लहानपानापासूनची इच्छा - एन.डी.ए चे शिक्षण पूर्ण - सैन्यात भरती - युद्धामध्ये सहभाग - देशासाठी लढताना अपघात - पाय गमावले निराशा - त्यातून बाहेर पडल्यानंतर अपंगांसाठी कार्य - अपंगांना पायावर उभे केले - त्यांच्यासाठी कार्यक्रम केले म्हणून राष्ट्रपतींकडून सत्कार - आनंद व दुःख संमिश्र भावना - मुलाच्या विजयातच माझा विजय ]




हा निबंध खालील प्रकारे शोधू शकता. 

  • सैनिकाची आत्मकथा मराठी निबंध 

  • सैनिकाची आत्मकथा निबंध 

  • सैनिकांची आत्मकथा मराठी 

  • सैनिकांची आत्मकथा इन मराठी 

  • सैनिकाची आत्मकथा मराठी निबंध लेखन 

  • सीमेवरील सैनिकाचे मनोगत 

  • मी सैनिक बोलतोय 

  • Sainikachi aatmakatha nibandh

  • Sainikachi aatmakatha essay in marathi language

  • Sainikachi aatmakatha in marathi nibandh

  • Sainikachi aatmakatha marathi mahiti

  • javanachi aatmakatha 








Nibandh pdf file downlod free. 

निबंध pdf file :

मित्रांनो या निबंधाची  Pdf  फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील link वर क्लिक करा


सैनिकाची आत्मकथा निबंध Pdf file.




  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • आपल्या भारतीय सैनिकांच्या शौर्याच्या गोष्टी तुम्हाला माहित असल्यास आम्हाला नक्की  COMMENT द्वारे कळवा.


धन्यवाद. 


 




Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.