सौरशक्ती - एक वरदान
![]() |
सौरशक्ती - एक वरदान (वैचारिक निबंध) | Sourshakti- Ek vardan. |
🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
सौरशक्ती - एक वरदान: मित्रांनो
Educationalमराठी वर
तुमचे स्वागत आहे. आपल्या भारत देशाला मोठ्या प्रमाणावर सौरशक्तीची देणगी लाभलेली
आहे. ही सौरऊर्जा म्हणजे कधीही न संपणारा ऊर्जेचा स्रोत आहे. आज आपण सौरशक्ती - एक
वरदान हा निबंध पाहणार आहोत.
- निबंधाची Pdf file download लिंक खाली दिली आहे
तेथून तुम्ही हा निबंध free मध्ये Downlod करू शकता.
सौरशक्ती म्हणजे सूर्यापासून निघालेल्या किरणांच्या उष्णतेपासून निर्माण केलेली ऊर्जा. सृष्टीच्या उगमापासून सौरशक्ती ही अस्तित्वात आहे; पण जगातील शास्त्रज्ञांचे लक्ष अलीकडेच सौरशक्तीकडे वळले आहे. आजपर्यंत आपण ऊर्जेसाठी ज्या साधनांचा उपयोग करीत होतो. त्या साधनांचे स्रोत हे मर्यादित आहेत हे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. दगडी कोळसा तसेच इतर खनिज संपत्ती हे आत्ता संपण्याच्या मार्गावर आहेत. अणुशक्ती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असली आणि खूप काळ पुरण्यासारखी असली, तरी ती तयार करण्यासाठी बराच खर्च येतो आणि त्यापासून किरणोत्सर्गाचा धोकाही असतो. म्हणून कधीही न संपणारी ऊर्जा शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी संशोधने केली.
गुरु एक कल्पतरू.
प्रयोगाअंती असा निष्कर्ष निघाला की, सौरशक्ती ही कधीही न संपणारा ऊर्जेचा स्रोत आहे. मानवाला लाभलेले एक
प्रकारचे वरदानच आहे. सौरशक्तीचा भारताला सर्वाधिक प्रमाणात लाभ होत आहे. सूर्य आपल्या सहस्त्रकारांनी भारताला तेजाचे
ऊर्जेचे दान देत आहे. भारतामध्ये बऱ्याच मोठ्या प्रदेशामध्ये वर्षांतून जवळपास दहा
महिने प्रखर सूर्यप्रकाश मिळतो. त्यामुळे ही सौरशक्ती सातत्याने वापरता येऊ शकते.
भारतीयांना सौरशक्तीचे माहात्म्य पूर्वीच्या काळात देखील समजले होते; असे आपल्या निदर्शनास येते. घरातील खाद्यपदार्थ वाळवणे, उन्हे देऊन धान्य टिकवणे, घरामधील वस्तू उन्हामध्ये ठेऊन त्यांचे निर्जंतुकीकरण करणे. या प्रकारच्या अनेक कामांसाठी सौरशक्तीचा वापर केला जात आहे. काही ठिकाणी स्नान करण्यापूर्वी लहान मुलंबाळं तेलाने मालिश करून कोवळ्या उन्हामध्ये बसवतात. त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे. 'डी' जीवनसत्व लहान मुलांना मिळते. समुद्राच्या पाण्यापासून जीवनावश्यक मीठ तयार करणे, मासे वाळवणे यांसाठी सौरशक्तीचा उपयोग होतो.
प्रयत्न हाच परमेश्वर.
अनेक उद्योगधंदयांसाठी सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर केला जाऊ शकतो, यावर संशोधन अलीकडेच झाले. आहे आजच्या या या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये हल्ली अन्न शिजवण्यासाठी सौरचुली तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर इंधनाची बचत होते. गणकयंत्रेही सूर्यापासून मिळणाऱ्या उर्जेवर चालवली जातात. पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये संशोधन करून तेथील शास्त्रज्ञांनी सौरपट्टिकांचा उपयोग(सोलार पॅनल) सूर्यकिरणांपासून दोन हजार सेल्सिअस उष्णतामान मिळवण्यात यश प्राप्त केले आहे. यांपासून मिळणाऱ्या उष्णतेपासून पोलादासारखे अत्यंत कठीण धातूही वितळवता येतील. सूर्याच्या प्रकाशामुळे तापलेल्या समुद्राच्या पाण्याचा वापर करू त्यापासून विद्युत निर्मिती करत येईल का ? यावर सध्या प्रयोग चालू आहेत. त्याचप्रमाणे सूर्यकिरणांचा उपयोग करून बाष्पकाच्या (बॉयलर) च्या साहाय्याने विद्युतनिर्मिती होऊ शकते. उपग्रहांसाठी लागणारी ऊर्जा ही सौरशक्तीपासूनच मिळते.
वेळेचे महत्व
सूर्यापासून मिळालेल्या या वरदानामुळेच भारतीय समाजाने
सूर्याला देवतांमध्ये स्थान दिले आहे सूर्य आहे; म्हणून
आपले अस्तित्व आहे. सूर्योपासना, सूर्यनमस्कार
इत्यादींद्वारे सूर्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. आपल्या सहस्त्रावधी हातानी
ऊर्जा दान करणाऱ्या या उपकारकर्त्याचे ऋण मानण्याइतका भारतीय समाज नक्कीच कृतज्ञ
आहे.
वैचारिक निबंध म्हणजे काय? निबंधांचे लेखन कसे करावे ?
मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा
अवश्य वापर करा👇
[मुद्दे:
सूर्यापासून मिळणारी ऊर्जा - पृथ्वी च्या पोटातील
खनिजांचे साठे संपत चालले आहेत - सौरऊर्जा ही सर्वात सुरक्षित ऊर्जा -
भारताला सूर्यप्रकाशाचे वरदान लाभले आहे. - सूर्यप्रकाच्या ऊर्जेचा भारतात
पूर्वीपासून वापर - अनेक कामांमध्ये
सूर्यप्रकाशाचा वापर - अन्न शिजवण्यासाठी, पाणी तापवण्यासाठी, रस्त्यावर दिवे लावण्यासाठी सौरशक्तीचा उपयोग केला जात आहेच - उद्योग
धंद्यांमध्ये सौरशक्तीचा वापर - सूर्य आपल्याला अमूल्य ऊर्जेचे दान देत आहे. ]
- Nibandh pdf file downlod free
या
निबंधाची Pdf file
downlod करण्यासाठी खालील link वर click करा.
सौरशक्ती - एक वरदान निबंध
Pdf file.
- निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
- तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
- लहरी पाऊस आणि शेतकरी याबाबद्दल तुम्हाला काय वाटते , आम्हाला नक्की COMMENT द्वारे कळवा.
🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
धन्यवाद