औपचारिक पत्रलेखन नमुना
![]() |
औपचारिक पत्रलेखन नमुना | Aupacharik patralekhan namuna |
मित्रांनो तुमचे Educationalमराठी या
आमच्या वेबसाईट वर स्वागत आहे. या आधी आपण औपचारिक पत्रलेखन म्हणजे काय ? आणि
परीक्षेमध्ये औपचारिक पत्रलेखन कसे करावे याबाबत माहिती आपण या आधीच्या लेखा मध्ये
घेतली आहे. जर ती post पहिली नसेल तर त्याची link खाली दिली आहे. आज आपण या post मध्ये औपचारिक
पत्रलेखनाचा नमुना पाहणार आहोत; ज्याच्या आधाराने तुम्हाला कल्पना येईल की औपचारिक
पत्रलेखन कसे करावे .याचा उपयोग परीक्षांमध्ये होईल. चला तर मग सुरु करूयात आजच्या
विषयाला .......
(सूचना : सदर post पाहताना जर तुम्ही MOBILE वापरत असाल तर MOBILE TILT (आडवा)करून पहावी.)
➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰
प्रश्न : तुमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आकाशवाणी केंद्रास भेट देऊन तेथील कामाची माहिती घ्यायची आहे. त्यासाठी आकाशवाणी केंद्राच्या अधिकाऱ्यास परवानगी मागणारे पत्र लिहा.
उत्तर:
अ.ब.क.
विद्यार्थी प्रतिनिधी,
एज्यूकेशनल मराठी
कनिष्ठ महाविद्यालय,
रत्नागिरी-४१५६१२
प्रति,
केंद्रसंचालक,
रत्नागिरी आकाशवाणी केंद्र,
रत्नागिरी – ४१५६१२
विषय :
आकाशवाणी केंद्राला भेट देण्याची परवानगी मिळण्याबाबत.
महोदय,
आकाशवाणी केंद्राच्या कार्यपध्तीची प्रत्यक्ष
ओळख करून घेता यावी म्हणून आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे काही विद्यार्थी आकाशवाणी
केंद्राला भेद देऊ इच्छित आहेत. ही शैक्षणिक स्थळभेट आहे. टर्म या भेटीचे शैक्षणिक
मूल्य लक्षात घेऊन कृपया आम्हाला भेटीची परवानगी शक्य तितक्या लवकर द्यावी, ही विनंती.
आपल्या माहितीसाठी काही तपशील खाली देत आहोत:
विद्यार्थांचा वर्ग :
इयत्ता ११वी आणि १२वी
विद्यार्थी संख्या :
२०+२०
शिक्षकांची संख्या : २+२
शिपाई संख्या : २
एकूण व्यक्ती : ५०
भेटीचा दिवस : ११
डिसेंबर ते १६ डिसेंबर या दरम्यान कोणताही.
आम्ही आतुरतेने आपल्या परवानगीची वाट
पाहत आहोत.
कळावे.
आपला विश्वासू,
-सही-
(अ.ब.क.)
विद्यार्थी प्रतिनिधी.
पाकिटाचा नमुना :
![]() |
औपचारिक पत्रलेखन तिकीट |
हे सुद्धा वाचा:
- तुम्हाला औपचारिक पत्रलेखन म्हणजे काय ? आणि कसे करावे ? या बाबत माहिती घ्यायची असल्यास खालील link वर click करा
- मित्रांनो या आज आपण औपचारिक पत्रलेखनाचा एक नमुना पाहिला . तुम्हाला आजची माहिती आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
- तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध किवा कोणत्या विषयावर पत्रलेखन हवे असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू.