भ्रष्टाचार-समाजाला लागलेली कीड
![]() |
भ्रष्टाचार - समाजाला लागलेली कीड | Bhrashtachar samajala lagleli keed. |
💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰
एक सुभाषित आहे.
‘ स्थानभ्रष्टा न शोभन्ते दन्ता :
केशा नखा नरा: |’
या सुभाषिताचा अर्थ असा आहे की, आपल्या मूळ स्थानापासून ढळलेले दात, केस, नखे आणि माणसे शोभत नाहीत. पण आज आपण आपल्या आजूबाजुला
पहिले तर... तर काय आढळते? भ्रष्टाचाराच्या चिखलाने माखलेली कित्येक माणसे आज उच्च
स्थानावर विराजमान झाली आहेत.
काही वर्षांपूर्वी आपल्या देशात भ्रष्ट आचरणाला वाव
नव्हता. भ्रष्टाचार करणाऱ्या माणसाला अतिशय कमी लेखले जाई पण आज आपल्याला सर्च नैतिक मुल्यांचा ऱ्हास झालेला
दिसतो. आज असे एकही क्षेत्र नाही की, जेथे भ्रष्टाचार होत नाही. उलट आज भ्रष्टाचार
हाच शिष्टाचार झालेला आपल्याला पहावयास मिळतो.
आज केवळ मोठ-मोठ्या शहरांतुनाच नव्हे, तर अगदी खेडा-पाड्यांत सुद्धा कामांच्या कागदावर ‘वजन’ ठेवले नाही तर कामे होत नाहीत.
भ्रष्टाचार या रोगाची लागण सर्वप्रथम सरकारी कचेऱ्यांत झाली. कोणतेही काम तेथील
कर्मचाऱ्यांकडून करून घ्यायचे असेल, तर आधी त्यांचे खिसे भरावे लागतात.
ज्याप्रमाणे आंब्याच्या टोपलीतील एक आंबा नासका झाला की त्याच्या आजूबाजूला असणारे
आंबे खराब होऊ लागतात. त्याचप्रमाणे भ्रष्टाचाराची ही कीड सर्वत्र पसरू लागली. आजकाल
विमा कंपनी, बँका , आयकर कचेऱ्या सर्वत्र हा भ्रष्टाचार एवढा वाढला आहे की, यात
आपण काही गैर करत आहोत, असे कोणालाही वाटत नाही.
भ्रष्टाचाराची वाळवी आज समाजाला पोखरू लागली आहे. आज
आपल्या देशामध्ये भ्रष्टाचार हा मोठा चिंतेचा विषय झाला आहे; कारण या
भ्रष्टाचाराने आपले हातपाय शिक्षण, वैद्यक अशा मानवी जीवनातील महत्वाच्या
क्षेतांमध्ये पसरवले आहेत. कधी–कधी तर शाळा- महाविद्यालयांमध्ये प्रवेश
मिळवण्यासाठी पैसे चारावे लागतात. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका गोडुन भागात नाही,
म्हणून गुणांची अदलाबदल केली जाते. केवळ काही रुपयांसाठी हुशार विद्यार्थी आपल्या
गुंवात्त्तेचे श्रेय कोणालाही विकायला तयार होतात.
वैद्यकशास्त्र हे केवढे पवित्र क्षेत्र ! दुसऱ्याला
जीवदान देणारा डॉक्टर , वैद्य हा एकेकाळी परमेश्वराचे प्रतिक होता. पं आज अनेक ठिकाणी
हा परमेश्वर असुरासारखे वागताना आढळतो. कशासाठी ? त्याला तर दानाच म्हटले पाहिजे आज
शिक्षणक्षेत्रामध्येही भ्रष्टाचाराने आपले हातपाय खूप खोलवर रोवले आहेत.
माणूस भ्रष्टाचारी का होतो? त्याच्या सार्या श्रद्धा
निष्ठा का हरवतात? मंदिराचा सुवर्णकळस घडवणाराच सोने चोरतो, तेच त्याच्या त्या
आचरणाला आपण काय म्हणावे ? या सार्या वृत्तीला एकाच कारण आहे आणि ते म्हणजे – ‘माणसाची
उपभोगवादी वृत्ती’ भ्रष्टाचार हा गरीब – श्रीमंत सगळेच करताना आपल्याला पहावयास
मिळतात. सुशिक्षित आणि सुविद्य माणसे आपली विद्वत्ता वापरून भ्रष्टाचार करतात.
येथे स्त्री-पुरुष असा कोणताच भेदभाव नाही. प्रत्येकाला फक्त चैन हवी सत्ता हवी .
आणी ते मिळविण्यासाठी फार मौल्यवान अशी नितीमुल्ये आपण हरवून बसलो आहोत. प्रसिद्ध
नाटककार वसंत कानेटक यांच्या नाटकातील नायक भ्रष्टाचाराच्या विकृतीला ‘मनाचा
महारोग’ म्हणतो. क्रिकेट खेळातील मैच फिक्सिंग प्रकरणाने सर जग हादरले. क्रिकेट हा
भारतीयांचा आवडता खेळ आणि त्या खेळातील खेळाडू ही त्यांची आवडती दैवते. आपली तहानभूक विसरून, आपली महत्वाची कामे बाजूला ठेऊन ते त्यांचा खेळ पाहण्यासाठी
आटापिटा करतात. असे हे आपले आवडते खेळाडू काही रुपयांसाठी मुद्दाम बाद होतात, हे
कळल्यावर लोकांना कमालीचा धक्काच बसला.
वैचारिक निबंध म्हणजे काय? निबंधांचे लेखन कसे करावे ?
भ्रष्टाचाराचा हा भस्मासुर सर्वत्र फोफावला आहे. खावालाणाऱ्या , उफाळणाऱ्या पाण्यात एखादा भोवरा निर्माण होतो आणि मग पट्टीचा
पोह्नारही या भोवऱ्यामध्ये गुरफटला जातो, आणि एकदा भोवऱ्यात गुरफटला की त्याची
सुटका नसते. आज असेच आपण सगळे या भ्रष्टाचाराच्या भोव्र्य्त अडकलो आहोत. त्यातून
आपली सुटका होणार तरी कधी> समाजाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड नष्ट करणे आज
आपल्याच हातात आहे. त्यासाठी भ्रष्टाचार विरोधात आपण पाऊले टाकली पाहिजेत. आणि
आपल्या समाजाला ह्या भ्रष्टाचारातून मुक्त केले पाहिजे.
💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰
मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा
अवश्य वापर करा👇
[मुद्दे:
विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे माणसाच्या सुखाच्या साधनांत वाढ झाली- माणूस या सुखांच्या मागे धाऊ लागला - त्यातून पैशाची गरज - तो कोणत्याही मार्गाने मिळवण्याची वृत्ती - भ्रष्टाचाराची निर्मिती व वाढ - अंगवळणी पडलेली एक सवय - पैसे न घेणारा माणूस मूर्ख - भ्रष्टाचार सभ्यपणाचे लक्षण - सर्वसामान्य माणसाना नडणारे व्यापारी, सरकारी नोकर - त्यांच्या बंदोबस्ताची गरज - समाजात सदाचारी प्रवृत्तीची वाढ करण्याची गरज. ]
💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰
हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता
भ्रष्टाचार निबंध मराठी
भ्रष्टाचार एक कलंक निबंध मराठी
भ्रष्टाचार एक समस्या मराठी निबंध
भ्रष्टाचार वर निबंध
वाढता भ्रष्टाचार निबंध मराठी
Bhrashtachar nibandh marathi download
Bhrashtachar essay in marathi pdf
Bhrashtachar nibandh in mrathi language
💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰
- Nibandh pdf file downlod free
या निबंधाची Pdf file downlod करण्यासाठी खालील link वर click करा.
भ्रष्टाचार-समाजाला लागलेली कीड निबंध pdf file
💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰
- निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
- तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा
आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
- माझा महाराष्ट्र या विषयावर
तुमचे विचार आम्हाला नक्की COMMENT द्वारे कळवा.