![]() |
दळणवळण व्यवस्था बंद झाली तर... |
सध्याचे युग हे विज्ञान तंत्रज्ञाचे
युग आहे. हे गतीचे युग आहे. या युगामध्ये कोणीही एका जागी थांबायला तयार नसतो.
सगळ्यांना पुढे पुढे जाण्याची घाई लागलेली असते. मानवाने आपल्या कामाची गती
वाढवण्यासाठी अनेक नव नव्या वाहनांचा शोध
लावला. माणसाने चाकाचा शोध लागला आणि त्याचबरोबर बैलगाडी, घोडागाडी आली. मग सायकल,
मोटार, ट्रक याचबरोबर रुळांवरून धडधड करत धावणारी आगगाडी, पाण्यावरून चालणारी
आगबोट आई आकाशातून उडणारे विमान माणसाने शोधून काढले. अंतराळात जाण्यासाठी माणसाने
आत्ता अंतराळयानही उपयोगात आणले. अशी ही दळणवळण व्यवस्था. आज अस्तित्वात असणाऱ्या
या दळणवळण व्यवस्थेमुळेच सारे जग वेगाने पुढे जात आहे. या दळणवळण साधनांशिवाय
माणसाचे एक पाऊल सुद्धा हलत नाही. याच साधनांनी त्याला पांगळे केले आहे. काही
वर्षांपूर्वीपर्यंत माणसे या साधनांशिवाय कामासाठी निमुटपणे अर्धा-एक तास चालत
जात. आज, दहा मिनिटे चालत जाण्याच्या अंतरासाठीही तो बसची वाट पाहत बसलेला
आपल्याला आढळतो. तो त्या गर्दीत अगदी अर्धा-पाऊण तास सुद्धा थांबतो. पण चालत काही
जात नाही.कधी कधी मनात असा विचार येतो की ही दळणवळ व्यवस्थाच बंद झली तर?
दळणवळण व्यवस्था बंद झाली तर किती
कठीण परिथिती ओढवेल याची कल्पनाच करता येत नाही. कधी कधी नैसर्गिक आपत्ती ओढवतात
आणि त्यातूनच आपण याचा थोडा अनुभव घेतो. एखादय नदीला पूर आला की, काही काळ तर
पाच-सहा गावांचा इतर गावांशी असलेला संपर्कच तुटतो आणि मग त्या काळात त्या संकटात
सापडलेल्या गावांना स्वावलंबी व्हावे लागते.
समाजसेवक बाबा आमटे यांचे चिरंजीव
डॉ. प्रकाश बाबा आमटे हे हेमलकसा हे आदिवासी गाव भामरागड या चंद्रपूर जिल्ह्याच्या
ठिकाणी घनदाट जंगलामध्ये आहे. त्यांनी काम सुरु केले तेव्हा त्या ठिकाणी
रस्त्यांची व्यवस्था सुद्धा नव्हती. आणि पावसाळ्यात या भागाचा बाहेरच्या जगाशी
काहीच संबंध राहत नसे. तेव्हा त्यांना त्या दिवसांसाठी आपली आणि तेथे राहत
असलेल्या आदिवासी लोकांच्या दैनंदिन गरजांच्या वस्तूंची सर्व व्यवस्था
पावसाळ्याआधीच करावी लागत असे.
एखाद्या भागातील दळणवळ व्यवस्था जर
बाद पडली तर एवढ्या मोठ्या प्रमाणवर गैरसोय होत असेल; मग जगातील सर्वच दळणवळण
व्यवस्था बंद पडली, तर काय अनर्थ होईल? सार्या जगाचे व्यवहार ठप्प होतील. प्रगतीच
खुंटेल. आज प्रत्येक व्यवहार जागतिक पातळीवर चालतात. इंटरनेट सारख्या सोयींमुळे जग
अगदी जवळ आहे आहे आणि अशा वेळी दळणवळण व्यवस्था बंद पडून कसे चालेल?
मुंबईसारख्या मोठ्या शहरांत काही
कारणांनी आगगाड्या धावायच्या थांबल्या, तरी मोठा गोंधळ उडतो. मग सगळीच वाहने
धावायची थांबली तर या शहरांच्या नाड्या आख्द्तील. आपली मुले-माणसे गावाकडे ठेऊन
पोटाची खळगी भरण्यासाठी माणसे शहरात येतात. पं त्यांचे मन गावाकडे, त्यांच्या
घराकडेच असते. घरी कोणतीही अडचण उद्भवली तर मिळेल ते वाहन पकडून ते घराकडे धावतात.
हुशार विद्यार्थी उच्च शिखान घेण्यासाठी व काही वेळेला नोकरीसाठी परदेशामध्ये
जातात. पण दळणवळणाची साधने बंद पडली तर त्यांचे सारे मार्गच बंद होतील. आज जगात
कोठेही एकही आपत्ती आली, तर जगाच्या कानाकोपऱ्यांतून मदत येते. दळणवळणाची साधने
बंद झाली तर ही मदत कशी येणार?
स्वप्ने नसती तर...
आज जगात केवळ माणसेच इकडून तिकडे जात
नाहीत तर मालाची, वस्तूंची सुद्धा प्रचंड देवाणघेवाण होते. दल्वाल्नाच्या
साधनांमुळेच पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसापर्यंत त्याला आवश्यक असलेल्या वस्तू
पोहचतात. त्यामुळे माणसाचे जगणे सुलभ व सुखाचे बनते. दल्वाल्न व्यवस्थेमुळे
व्यापार वाढतो, उत्पादन वाढते. नोकऱ्या वाढतात. माणसाना उदरनिर्वाहाचे साधन मिळते.
अर्थव्यवस्था विक्षित होते. मोठ्या प्रमाणात सुधारणा होतात. समाजाला नवनवीन सुविधा
मिळतात. म्हणजेच देशाची प्रगती होते.
दळवळण व्यवस्था बंद पडली तर
माणसाच्या सुखसोयी लयाला जातील. माणसाचे जीवना जंगली पातळीवर जाऊन पोहोचेल!
त्यामुळे दळणवळण व्यवस्था बंद पडून चालणार नाही. किंबहुना माणूस दळणवळण व्यवस्था
बंदच पडू देणार नाही.
कल्पनात्मक निबंध म्हणजे काय? निबंधांचे लेखन कसे करावे ?
मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा
अवश्य वापर करा👇
[मुद्दे:
- सध्याचे युग हे विज्ञान तंत्रज्ञाचे युग
- दळणवळणाच्या साधनांमुळे गतिमानता
- विविध प्रकारच्या दळणवळणाच्या साधनामुळे जग जवळ
- नैसर्गिक आपत्तींमुळे काही वेळा असा अनुभव
- एखादे साधन बंद पडले, तर दुसऱ्या साधनाचा उपयोग
- पण सगळीच दळणवळण व्यवस्था बंद पडली तर
- गोंधळ उडेल. ]
हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता
दळणवळण व्यवस्था बंद झाली तर
दळणवळण व्यवस्था बंद झाली तर निबंध मराठी
दळणवळण व्यवस्थाबंद झाली तर
- निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
- तुम्हाला कोणत्या विषयावरचा
निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
- दळणवळण व्यवस्था बंद पडली तर
काय होईल? तुमच्या कल्पना आम्हाला COMMENT
द्वारे
कळवा.
धन्यवाद