फुलाची आत्मकथा
![]() |
फुलाची आत्मकथा | Fulalchi aatmakatha. |
तुम्ही कोणते स्वप्न पहिले असेल आणि ते जर का पूर्ण झाले
नाही तर त्याचे दु:ख किती होते हे माहित आहे का तुम्हाला? या जगातल्या स्वार्थाशी तुमचा
कधी संबंध आला आहे का ? संबंध आला नसेल, तर आज माझी गोष्ट ऐका-
माझा जन्म एका सुंदर बागेमध्ये झाला होता. जेव्हा मी
पहिल्यांदा डोळे उधडले तेव्हा मी पहिले की मी माझ्या आईच्या कुशीत म्हणजेच
फांदीच्या कुशीत बसलो होतो. खूप प्रेमाने माझी आई मला झोके देत होती. त्या दिवसांमध्ये
माझ्या पाकळ्यांमध्ये बालपणाची मस्ती होती आणि माझ्या ओठांवर कायम हास्य असायचे.
वसंत ऋतूमधील वाऱ्याच्या आणि सूर्याच्या कोमल किरणांच्या
स्पर्शाने मी दिवसा दुपट्टीने आणि रात्री त्यापेक्षा जास्त वेगाने वाढू लागलो. हळू-हळू
माझा सुगंध चारही दिशांना पसरू लागला. भुंगे त्यांच्या आवाजाने मला मोहून टाकत
असत. विविधरंगी फुलपाखरे माझ्या मधले मध घेण्यासाठी माझ्या आजूबाजूला फिरू लागली.
वाऱ्याची झुळूक मला आनंद देत असे. माझ्या सौंदर्यामुळे सगळा बगीचाच खुलून गेला
होता.
मी रस्ता बोलतोय
आता मी पूर्णपणे फुललो होतो. बागेचा माळी एक दिवस
माझ्याकडे येताना मला दिसला. माझ्यावर त्याचे लक्ष जाताच त्याने त्याचा कठोर हात
माझ्या दिशेने सरसावला आणि मला माझ्या आईच्या कुशीतून वेगळे केले. त्याचबरोबर, सुखी
जीवनची माझी सगळी स्वप्ने मातीमोल झाली. एका टोपलीमध्ये माझ्या सारख्या असंख्य
फुलांच्या मध्ये मला ठेऊन माळी मला त्याच्या घरी घेऊन गेला. माझे काही मित्र आधीच
तेथे उपस्थित होते.
माळ्याच्या टोपलीमध्ये भुंगे नव्हते, मधमाश्या नव्हत्या
आणि नव्हती ती फुलपाखरे. तिथे मी एक मोठी सुई आणि दोरा पहिला. थोड्या वेळाने तेथे
माळीण आली आणि ती टोपलीमधील एक एक फुल उचलून हार बनवायला लागली. निर्दयतेने तिने
मलाही त्या हारामध्ये गुंफले. माझे सौभाग्य म्हणजे संध्याकाळी माळ्याने तो हार
देवाच्या मंदिरात घेऊन गेला. मंदिराच्या पवित्र वातावरणात माझी सगळी निराशा दूर
झाली. पुजाऱ्याने जेव्हा तो हार देवाच्या
गळ्यात घातला तेव्हा मी धन्य झालो. पण दुसऱ्या दिवशी पुजाऱ्याने मला गळ्यातून
काढून एका बाजूला ठेवले. हळू-हळू मी पूर्णपणे सुकून गेलो.
पृथ्वीचे मनोगत (आत्मकथनात्मक निबंध)
आत्ता मी त्या हरापासून वेगळा होऊन रस्त्यावर लोकांची
धक्के खात आहे. कुठे बागेतील ते आनंदाचे दिवस, कुठे मंदिरातील देवाचे सानिध्य आणि
कुठे हे दुर्भाग्य! मी माझे सारे जीवन या जगाला अर्पण केले, पण साऱ्या जगाने मला
मला काय दिले?
आत्मकथनात्मक/आत्मवृत्तात्मक निबंध म्हणजे काय? निबंधांचे लेखन कसे करावे ?
मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा
अवश्य वापर करा👇
[मुद्दे:
प्रस्तावना
लहानपणीचे सुखी आणि आनंदी जीवन
तरुणपणातील दिवस
बागेचा निरोप
हाराच्या रुपामध्ये
बाहेरून सुखी पण मनातून खूप दु:खी
शेवट ]
हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता
- Fulachi aatmakatha
in Marathi
- Aatmakatha
of flower in Marathi
- Fulache manogat
nibandh Marathi
- Gulabachya
fulachi aatmakatha in Marathi.
- Fulachi aatmakatha
essay
- Fulachi aatmakatha
Marathi nibandh
- Fulache manogat
Marathi nibandh
- फुलाचे मनोगत निबंध
- फुलाचे मनोगत निबंध मराठी
- एका फुलाचे मनोगतसुकलेल्या फुलाचे मनोगत
- फुलाची आत्मकथा इन मराठी
- फुलाची आत्मकथा
- निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
- तुम्हाला कोणत्या विषयावरचा
निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
- फुलाचे मनोगत / आत्मकथा यावर विचार
आम्हाला COMMENT
द्वारे
कळवा.
धन्यवाद