माणूस हसणे विसरला तर....
![]() |
माणूस हसणे विसरला तर.... | Manus hasne visarla tar.... |
➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰
आमच्या घरातील एका समारंभाच्या वेळी नातेवाईकांसोबत एकत्र
फोटो काढणे चालले होते. तो फोटोग्राफर तसा रसिक होता. तो आम्हला उभे राहण्याच्या
विविध पद्धती दाखवत होता. आम्ही पंधरा-वीस जन होतो.त्याने सगळ्यांना छान
रांगेमध्ये उभे केले आणि तो फोटो काढण्यासाठी तयार झाला, म्हणाला, “रेडी हं ,
स्माईल प्लीज! हं, असं नाही. हे बघा सर्वानी ‘चीज’ हा शब्द उच्चारण्याच्या प्रयत्न
करा मग तोंड बरोबर हलेल. हां हां शाबास रेडी !”
आमच्या सर्वांचा हसरा चेहरा फोटोमध्ये टिपण्याचा त्यने आटोकाट
प्रयत्न केला. आणि काय गंमत आहे पहा. नुसता शांत चेहरा नको हसराच चेहरा हवा. त्याच
वेळी माझ्या मनात विचारांचे चक्र वेगाने फिरु लागले आणि मनात विचार आला की,
त्यावेळी सगळेजण हसणेच विसर तर? ते कशाला? जर सगळीच माणसे हसणे विसरली तर काय होईल?
मला या प्रश्नाच्या उत्तराबाबत काही सुद्धा सुचेना उत्तर
म्हणून कोणतेही चित्र डोळ्यांसमोर येईना. कसे शक्य आहे ? खरच माणसापासून हसणे
वेगळे काढता येईल का ?
मला एक प्रसंग आठवला रस्त्याच्या कडेला एका झोपडीपाशी एक आई व
तिचे वळ दोघेही खेळत होती. बहुधा कचरा, भंगार गोळा करून पोट भरणारी असावी ती एका
फाटक्या गोणपाटावर बसली होती. अंगावर ठिगळे असलेली वस्त्रे होती. तिह्चे बालाही
कलकात मळकट दिसत होते; पं त्यांचा खेळ आनंदात पूर्ण डूबलेला होता. ती दोन्ही हातांनी धरून त्याला उंच नेई
आणि झरकन खाली घेऊन येई. वरून खाली येत असताना ते बाल खळखळून हसायचे. बाळाच्या
अंगाअंगातून हसू बाहेर फुटे आणि आईचा चेहरा हास्याने फुलून जाई किती सुंदर दृश्य
होते ते! मनात आले माणूस हसणेच विसरला तर ? तर काय होईल? संपत्तीच्या,
दारिद्र्याच्या पलीकडे जाणारी ती मनोवस्था ! ती मनोवास्थाच जीवनातून हद्दपार होईल.
माणूस हसणे विसरला तर काय होईल ? त्या बाळाचे काय होईल ? लहान
वयातील ते बाल ज्याला भावना व्यक्त करण्यासाठी अजून नित बोलताही येत नाही. त्या
बाळाकडे स्वताच्या भावना व्यक्त करण्यासाठी फक्त दोनच मार्ग आहेत. हसणे आणि रडणे .
माणूस त्याच्याकडे असणारे हसणेच विसरला तर, तो स्वच्या भावना कशा प्रकारे व्यक्त करेल?
हसण्यातून ते बाल आईशी संवादच साधत असते. हसणे संपले तर हा संवादाच नष्ट होईल आई
बाळाच्या नात्यात खूप मोठे अंतर पडेल. त्या लहानग्या बाळाचा मोठा कोंडमारा होईल.
मी आमदार झालो तर...
आज माणूस आपले अनमोल हसणे विसरला तर त्या लहानग्या बाळाचे जे
होईल तशीच अवस्था साऱ्या मानवजातीची होईल. आपण कोणत्याही कामात यशस्वी झालो तर
आपल्याला अत्यंत आनंद होतो. एखाद्या स्पर्धेमध्ये आपला विजय झला की आपण आनंदित होतो. आपल्या मनासारख्या गोष्ठी घडत
गेल्या की आपण त्या आनंदात हरवून जातो. आवडती माणसे भेटली आपले मन प्रफुल्लित होते. जरा आपण निरीक्षण करून पहिले तर सर्व काही
लक्षात येईल. दोन प्रमातली माणसे. मग ते कोणीही असोत- मित्र-मैत्रिणी, आई-बाबा, पती-पत्नी
किवा आई आणि तिचे बाळ कोणीही एकमेकांना भेटली की पहा. दोघेही बोलतात त्या वेळी
त्यातल्या शब्दांत, शब्दांच्या अर्थाला महत्व नसते. भेत्न्यातल्या आन्डला महत्व
असते. म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर हसू असते. तुम्ही जर तुमच्या जीवनातला कोणताही
सुखाचा प्रसंग आठवून बघितला रार आपण
सुखाचा सोहळा हास्यानेच साजरा करतो. हसणे नसेल तर आपल्या जीवनातील सुखाचे सोहळेच
नष्ट होतील.
म्हणूनच मानवी जीवनामध्ये विनोदाला फार मोठे महत्व प्राप्त झाले आहे.विनोदी नात, विनोदी लेखक, कवी यांना लोकप्रियता मिळते. अपघात, खून मारामाऱ्या, भ्रष्टाचार यांच्या बातम्यांनी भरलेल्या वर्तमानपत्रांमध्ये व्यंगचित्राना मानाचे स्थान मिळते. एक तरी विनोद चुटका छापला जातोच. चार्ली चाप्लिन याने माची जीवनातील सगळी व्यंगे विद्रूपता घालवण्यासाठी विनोदाचा आश्रय घेतला. हसणे नसेल तर विनोदच नष्ट होईल.
कल्पनात्मक निबंध म्हणजे काय? निबंधांचे लेखन कसे करावे ?
हास्य हे सुखाचे आनंदाचे प्रतीक आहे. माणूस जगतो तो केवळ
सुखासाठी . सुख हाच साऱ्या मानवजातीच्या जगण्याचा आधार असतो. अशा स्थितीत माणूस हसणेच
विसरला तर त्याच्या जगण्याचा आधारच नष्ट होईल. त्याचे जीवन कोरडे आणि रसहीन होऊन जाईल
.
मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा
अवश्य वापर करा👇
[मुद्दे:
फोटो काढण्याचा प्रसंग – हसणे विसरण्याची कल्पना –
हास्याचे महत्व अधोरेखित करणारा प्रसंग – हसणे नसल्यास सुखाचे क्षण नष्ट –
विनोदाचे मानवी जीवनातील महत्व – सुख हाच मानवी जीवनाचा आधार – हास्य म्हणजे सौख्य
– हसणे नसेल तर जीवनाचा आधार नष्ट. ]
➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰
हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता
Manus hasne visarla tar niband in Marathi
माणूस हसणे
विसरला तर निबंध
माणूस
हसण्याची शक्ती विसरला तर निबंध
Manus hasnyachi Shakti visarla tar nibandh
➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰
- निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
- तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
- नद्यांची होणारी घुसमट तुमच्या शब्दांत आम्हाला विचार नक्की COMMENT द्वारे कळवा.
➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰
Free Pdf file download
या निबंधाची Pdf file download करण्यासाठी खालील link वर click करा.
माणूस हसणे विसरला तर निबंध pdf file download
➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰
धन्यवाद