माझा आवडता सण दिवाळी
![]() |
माझा आवडता सण दिवाळी | Maza aavdata san diwali. |
🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆
भारतामध्ये सण उत्सवांची सुवर्णमयी परंपरा ही प्राचीन
काळापासून चालत आलेली आहे.घरा घरांमधून अंधकार दूर करून दिव्यांचा प्रकाश सर्वत्र
पसरवणारी दिवाळी ही खर्च भारतातील सणांची महाराणीच आहे.
माझा महाराष्ट्र
ज्या वेळी श्री रामचंद्र लंकेच्या विजयानंतर ज्या वेळी ते
अयोध्येला परत आले तेव्हा अयोध्यावासियांनी दिवे प्रज्वलित करून त्यांचे स्वागत
केले होते. तेव्हा पासून दिवाळी या सणाची सुरुवात झाली. अजून एक मान्यता आहे ती
म्हणजे महाराज युधिष्ठीर च्या राजसूय यज्ञाची पूर्णाहुती याच दिवशी झाली होती,
तेव्हापासून हा हे पर्व साजरे केले जाते. अशा विविध आख्यायिका दिवाळी या सणाबाबत
आहेत. काही लोक दिवाळीच्या दिवसाला भगवान महावीर यांचा निर्वाण दिन मानतात. या
प्रकारे प्रत्येक भारतीय नागरिक दिवाळीच्या या प्रकाशमय पर्वात आत्मीयतेचा अनुभव
करतो.
दिवाळी सफाई आणि सजावटीचा सोनेरी संदेश घेऊन येते. दिवाळी
येण्याच्या आधी काही दिवस लोक आपल्या घराची साफ सफाई करायला सुरुवात करतात. आपल्या
घराचा परिसर झाडून साफ करतात. लोक दिवाळीच्या सणानिमित्त नवनवीन कपडे खरेदी करतात.
स्त्रिया दिवाळीच्या मुहूर्तावर दागिने खरेदी करतात. प्रत्येक घरामध्ये गोड धोड
पदार्थ बनवले जातात. या प्रकारे दिवाळी चे आगमन होण्याच्या आधीच सर्व ठिकाणी
उत्साहाची आणि आनंदाची लहर उठते.
माझी आई.
आश्विन महिन्यातील कृष्णपक्ष च्या त्रयोदयीपासून ते कार्तिक
महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीये पर्यंत (भाऊबीज) पर्यंत दिवाळी हा सण मोठ्या धामधुमीने साजरा
केला जातो. घरा - घरांमध्ये दिवे, मेणबत्त्या, तसेच विजेचे विविध प्रकारचे दिवे
लावून घर प्रकशित केले जाते. फटाक्यांच्या आतीश्बाजीने सारे वातावरण आनंदून जाते.
त्रयोदशी (धनत्रयोदशी) या दिवशी लोक आपल्याजवळ असलेल्या धनाची पूजा करतात. चतुर्दशी
ला ‘नरक चतुर्दशी’ सुद्धा बोलले जाते. याच दिवशी भगवान श्रीकृष्णानांनी नरकासुराचा
संहार केला होता.
अमावस्येचा दिवस हा दिवाळीचा दिवस असतो. याच दिवशी व्यापारी
लोक त्यांच्याकडे असणाऱ्या हिशोबाच्या वह्यांची पूजा करतात. दिवाळीच्या निमित्ताने
सर्व नातेवाईक एकमेकांना भेटायला येतात. यानंतर येते ती म्हणजे भाऊबीज या दिवशी
बहिण भावला टिळा लावते आणि गोड-धोड पदार्थ खाऊ घालते. या दिवशी भाऊ बहिणीला काही
तरी भेटवस्तू देतो.
दिवाळीच्या प्रकाशाने सर्वांचे घर-अंगण आणि तन-मन दोन्ही ही
आनंदाने भरून जातात. आपल्या मनातील द्वेष भावना दूर होतात.सर्वांचे हृदय प्रेम आणि
सद्भावाने भरून जाते. यामुळे सामाजिक जीवनाला एक नवीन चेतना मिळते. असा हा
दिवाळीचा सण माझा प्रिय सण आहे.
मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा
अवश्य वापर करा👇
[मुद्दे:
प्रस्तावना
दिवाळीच्या संदर्भामध्ये असणाऱ्या पौराणिक कथा
दिवाळीच्या आधीची पूर्व तयारी
दिवाळीच्या सणाचे वर्णन
दोषांचे निवारण
संदेश.]
हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता
maza aavdata san diwali nibandh dakhava
maza aavadata san diwali nibandh in martahi
maza aavadata san diwali essay in marathi language
maza aavadata san diwali ya vishyavar nibandh
maza aavadata san diwali yavar nibandh in marathi
माझा आवडता सण दिवाळी
माझा आवडता सण दिवाळी माहिती
माझा आवडता सण दिवाळी वर निबंध
माझा आवडता सण दिवाळी निबंध इन मराठी
- निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
- तुम्हाला कोणत्या विषयावरचा
निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
- तुमच्या आवडत्या सणाचे थोडक्यात
वर्णन आम्हाला COMMENT
द्वारे
कळवा.
धन्यवाद