![]() |
मोबाईल : २१व्या शतकाचा अग्रदूत |
माणसाच्या उत्त्पत्तीपासून आत्तापर्यंत अनेक शोध लावले
गेले. या शोधांमुळे त्याने त्याच्या अरण्यातल्या रानटी अवस्थेतून बाहेर पडून
अत्याधुनिक माणसाचे स्वरूप प्राप्त केले आहे. आत्तापर्यंत लागलेल्या शोधांमध्ये
सर्वश्रेष्ठ शोध कोणता ? असा प्रश्न कोणालाही विचारला, तर सार्वजन हसतमुखाने उत्तर
देतील – ‘मोबाईल’. या मोबाईलने २१व्या शतकातील माणसाच्या जीवनात अमुलाग्र क्रांती
घडवली आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याने आपले स्थान निर्माण केलेलं
आहे. शाळकरी मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत
सर्वाना प्रभावित करणारा हा मोबाईल चा शोध एकमेव शोध आहे. इतर कोणत्याही शोधाचा
इतका व्यापक परिणाम मानवी जीवनावर या आधी झाला नव्हता. म्हणूनच हा २१व्या शतकाचा
अग्रदूत आहे. या मोबाईलमुळेच मानवाचे जीवन विलक्षण सुखर बनले आहे. म्हणून कामातला
आनंद वाढला आहे. कामाचा वेग आणि कार्यक्षमता वाढली आहे.
गेल्याच आठवड्यात आम्ही मुंबईला जात असताना प्रवासात मध्येच
एक चौक लागला. आत्ता कोणत्या दिशेला गाडी वळवायची, हे कळेना. त्या ठिकाणी
दिशादर्शक फलक ही लावलेला नव्हता. एकही वाहन रस्ता सांगण्यासाठी थांबण्यातले
नव्हते. संपूर्ण परिसरामध्ये एकही वाटसरू दिसत नव्हता. आईबाबा, काकाकाकी चिंतेत
पडले. तेवढ्यात मला मोबाईल मधील गुगल मॅप ची आठवण झाली. आणि मी मोबाईल वर गुगल मॅप सुरु केला आणि काय चमत्कार ! काही सेकांदामध्येच आम्ही कोणत्या ठिकाणी होतो, आमच्या
पासून पोहचण्याचे ठिकाण किती दूर होते, कोणत्या रस्त्याने जावे वगैरे सर्व माहिती
मिळाली. एवढेच काय, त्या ठिकाणाची
वैशिष्टे, प्रेक्षणीय स्थळे, राहण्याच्या-जेवणाच्या सोयी, डॉक्टर्स, दवाखाने
मनोरंजनाची ठिकाणी वगैरे सगळी माहिती सोबत मिळाली. आमच्या पाच जणांपैकी फ़्क़्त
माझ्याकडेच इंटरनेट होते. माझे आईबाबा व काकाकाकी हे मोबाईलचा बोलण्याखेरीज असलेला
उपयोग आज प्रत्यक्षात अनुभवत होते.
मोबाईल वरून फक्त बोलता येते, असे नाही; तर बोलत असताना
दूरवर असलेल्या व्यक्तीला त्याच क्षणी पाहता सुद्धा येते. एकाच वेळेला अनेकजण
जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात बसून एकमेकांशी संवाद साधू शकतात. निर्णय घेऊ शकतात,
म्हणजे कामे झटपट होतात. कागदपत्रांची व्हाट्सअँपवर देवाणघेवाण होऊ शकते. फोटो
पाठवता येतात. अभ्यासाबाबत कठीण प्रश्नांची चर्चा करता येते. आवश्यक ते संदर्भ
इंटरनेट वरून मिळवता येतात. तज्ञांचे मार्गदर्शन मिळवता येते. ‘नोट्स’ या पर्यायात
जाऊन महत्वाचे मुद्दे नोंदवून ठेवता येतात. ऐनवेळी आठवलेल्या चार ओळी तसेच तासामधील
महत्वाचे मुद्दे तत्क्षणी नोंदवून ठेवता येतात. कामांची यादी, भेटीगाठीच्या वेळा,
अन्य विविध नोंदी यांची वेळच्या वेळी आठवण करून देण्याची सोयही मोबाईलमध्ये उपलब्ध
आहे. मोबाईल हा एकही पैसा न घेता, वेळेवर व न थकता अगदी अचूक काम करणारा आपला
सेक्रेटरीच आहे.
आपली बहुतेक दैनंदिन कामे आपण मोबाईलमुळे झटपट व अचूक करू
शकतो, हव्या असलेल्या अनेक वस्तूंची तसेच सेवांची माहिती मिळवून त्यांतून हवी ती
निवड करता येते; हवा तो विक्रेता निवडता येतो; मागणी नोंदवता येते. बँकेचे सर्व
व्यवहार घरबसल्या करता येतात. घरूनच बिले सुद्धा भरता येतात. पैशांचे देण्याघेण्याचे
व्यवहार ऑनलाईन करता येतात. ऑटो रिक्षा-बस पासून ते रेल्वे विमानापर्यंत सर्वांची
तिकिटे आरक्षित करण्यासाठी आत्ता कुठेही जायला नको. आता माणूस कोणाला भेटकार्ड
किंवा भेटवस्तू पाठवायची असल्यास मोबाईल च्या सहाय्याने हव्या त्या पत्त्यावर परस्पर
पाठवून देतो.
मोबाईल चा वापर करून आपण काय करू शकत नाही? मोबाईलवर आपण
आपल्या दैनंदिन कामांचे नियोजन करू शकतो. शासकीय कार्यालयातील कामे आपण घरबसल्या
करू शकतो. शिक्षापत्रिका, जन्ममृत्यु दाखला, सात-बारा उतारा वगैरे दाखले आता घरबसल्या
मिळवता येतात. या दाखल्यांसाठी आता दिवस खर्च करायला लागत नाही तसेच तेथील काम
करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे खिसे भरावे लागत नाहीत. या दाखल्यांच्या प्रति मोबाईल
मध्ये उपलब्ध होतात. आपण त्यांची घरातच छापील प्रत घेऊ शकतो. खरे तर त्याचीही गरज
नाही. ज्या कार्यालात हवा आहे त्या कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपण मोबाईल मध्ये
असलेली प्रत फॉरवर्ड करू शकतो. किती सोप्प आहे नाही का?
भ्रष्टाचार-समाजाला लागलेली कीड
मोबाईल ला असलेल्या कॅमेऱ्याच्या मदतीने आपण आपल्या
जीवनातील मौल्यवान क्षण जपून ठेवू शकतो. एडीट या पर्यायातून आपल्या फोटोंना
अप्रतिम रूप बहाल करता येते आणि समाजमाध्यमात आपल्या टिप्पणीसह ते प्रसिद्ध करून
आपल्या जवळच्या माणसाना आपल्या आनंदामध्ये समाविष्ट करून घेता येते. लोकांना सावध
करण्यापासून ते गुन्हेगारांना पकडण्यापर्यंत याचा उपयोग होतो.
मोबाईलवर तर मनोरंजनाचा खजिनाच उघडला गेला आहे. टेलिकॉम कंपन्यांनी लोकांना लुबाडण्याची नुकतीच एक योजना आखली होती. पण नेटनूट्रॅलिटी या नावाने लोकांनी केवळ मोबाईल द्वारे मोहीम चालवून बलाढ्य कंपन्यांना नामोहरम केले.
मोबाईलच्या सामर्थ्याचे किती कौतुक करावे? मोबाईल चे
कितीतरी उपयोग अजून सांगता येतील. त्याची गरजच नाही. मोबाईल ने सामान्य माणसाला
मुक्त केले आहे. त्याला अधिक स्वतंत्र केले आहे. त्यामुळे लोकशाही अधिक बळकट
होण्यास मदत होणार आहे.
वैचारिक निबंध म्हणजे काय? निबंधांचे लेखन कसे करावे ?
मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा
अवश्य वापर करा👇
[मुद्दे:
- सर्वश्रेष्ठ शोध
- २१व्या शतकावर प्रभाव गाजवणारा
- मोबाईलमुळे मानवी जीवन अधिक सुखकर
- मोबाईलच्या अप्रतिम उपयोगाचा एक प्रसंग
- बोलणे,संवाद साधने
- कामांचा वेग वाढला
- दैनंदिन कामे जलद
- अभ्यासात उपयोग
- शासकीय कामामध्ये उपयोग
- कॅमेऱ्याचा उपयोग
- नागरिक अधिक समर्थ
- लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी उपयोग.]
हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता
मोबाईल : २१व्या शतकाचा अग्रदूत
21 vya shatakatil agradut mobile
Mobile che upyog Marathi
- निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
- तुम्हाला कोणत्या विषयावरचा
निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
- मोबाईल २१व्या शतकातील अग्रदूत
आहे का ? तुमचे मत आम्हाला COMMENT
द्वारे
कळवा.
धन्यवाद