व्यायाम आणि आरोग्य
![]() |
व्यायाम आणि आरोग्य | Vyayam aani aarogya |
🏋️♂️🏋️♂️🏋️♂️🏋️♂️🏋️♂️🏋️♂️🏋️♂️🏋️♂️🏋️♂️🏋️♂️🏋️♂️🏋️♂️🏋️♂️🏋️♂️🏋️♂️
आज भारतापुढे अनेक समस्या आहेत, त्यापैकी एक मोठी समस्या आहे.
ती म्हणजे अनारोग्याची. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात अनेक आजार
हे कायमचे ठाण मांडून बसलेले असतात. भारतातील मोठ्या प्रमाणावरील जनता ही
दारिद्ररेषेखाली असलेली आपल्याला आढळते. त्यामुळे ‘कुपोषण’ हे तर भारतातील लहान
मुलांच्या राशीलाच पुजलेले आहे. या शिवाय दरवर्षी पावसाला सुरु झाल्यानंतर येणारे
आजार सुद्धा आहेत. मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, असे एक दोन नाही तर अनेक आजार
आपल्या देशामध्ये विशेषतः मोठ मोठ्या शहरांमध्ये मुक्काम ठोकून बसतात. वाढत्या
प्रदूषणाचा भस्मासुर खेडेगावांत, शहरांत सर्वत्र पसरलेला आहे. त्यामुळे कॉलरा,
विषमज्वर असे अनेक आजारही या ठिकाणी ठाण मांडून बसलेले असतात. खेडेगावात हवा
प्रदूषणविरहित असते, असे म्हणतात; पण खेडेगावातील नद्यांचे पाणी आत्ता वाढत्या
शहरीकरणामुळे दुषित झालेले आहे. त्यामुळे आज अनेक आजार येथे लोकांच्या मानगुटीवर बसलेले
आहेत.
अशा परिस्थितीमध्ये देशाची प्रगती कशी काय साधणार? आज जागितक
स्पर्धेमध्ये टिकायचे असेल, तर देश आरोग्यपूर्ण असायला हवा. देश म्हणजे देशाची
जनता. या जनतेला विशेषतः देशातील तरुणांना आरोग्यपूर्ण करायला हवे असेल, तर थोडा भूतकाळाचा
आढावा आपल्याला घ्यायला हवा. पूर्वीच्या जीवनपद्धतीत आणि आजच्या जीवनपद्धतीमध्ये
बरेच अंतर आहे. पूर्वी बहतेक कामे ही माणूस स्वतः करत असे. यंत्राची मदत नसे.
बरेचसे अंतर पायी कापले जाई. त्यामुळे आपोआपच व्यायाम होत असे. सकाळी लवकर उठणे, सूर्यनमस्कार घालणे अशी घरोघरी शिस्तबद्धता
होती. गावागावांतून आखाडे असत. तेथे कुस्त्या, जोर बैठका चालत. घरोघरी गाई, म्हशी
असत. त्यामुळे निरसे दुध, सकस अन्न मिळत असे. आजचे जीवन हे अगदी वेगळे असलेले
आपल्याला पहावयास मिळते. जीवन, खाणे, झोपणे यांना ताळतंत्र नसतो. घरगुती
जेवणापेक्षा बाहेरचे खाणे, फस्त फूड आणि रात्रीची जागरणे, व्यसनाधीनता यांचा
आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
लोकमान्य टिळकांनी तरुणांना ‘बलोपासना’ करायचा उपदेश केला
होता. आजच्या समाजात वयक्तिक आणि सार्वजनिक आरोग्याचा विचार करणे अत्यंत आवश्यक
झाले आहे. त्यासाठी नियमित, शास्त्रशुद्ध व्यायामाची आवश्यकता आहे. जपानसारख्या
राष्ट्रामध्ये प्रतेक्काला ठराविक वेळी ठराविक व्यायाम करण्याची सक्तीच केलेली
असते. त्याच बरोबर अनेक देशांतून सार्वजनिक आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते, तशी
सवय आपल्या देशातील जनतेला मुळीच नाही. त्यामुळे अनारोग्याचा प्रश्न शासनापुढे
मोठा आहे.
नद्यांची घुसमट
‘गाडगेबाबा स्वच्छता अभियान’ ‘निर्मल ग्राम’ यांसारख्या योजना
शासनाने त्यासाठीच सुरु केल्या आहेत. त्यांतून काही गावांनी प्रेरणा घेतली आहे.
आत्ता युवकांतील व्यायामाची सवय वाढीस लागावी अशाही स्पर्धा सुरु कराव्यात .
महानगरातील महाकचऱ्याच्या समस्या सुटल्या आहेत. आत्ता लोकांनी आपलयाला चांगल्या
सवयी लाऊन घेतल्या तर अनारोग्याचा प्रश्न ही सुटेल. आपण आपली सर्व सुखे, सर्व
अनुभव आपल्या शरीरामार्फत घेतो. हे अनुभव घेणे म्हणजेच जगणे होय. आपले शरीर दुबळे
असेल, तर आपले जगणेही निरास बनेल. शरीर रोगट असेल, तर आपण आनंदाने जगूच शकणार
नाही. म्हणून आपण कसोशीने व्यायाम केलाच पाहिजे. निरोगी शरीरातच निरोगी मन राहू
शकते, हे नक्की. त्यामुळे स्वतःला व्यायामाची सवय लावून घेणे गरजेचे आहे.
वैचारिक निबंध म्हणजे काय? निबंधांचे लेखन कसे करावे ?
🏋️♂️🏋️♂️🏋️♂️🏋️♂️🏋️♂️🏋️♂️🏋️♂️🏋️♂️🏋️♂️🏋️♂️🏋️♂️🏋️♂️🏋️♂️🏋️♂️🏋️♂️
मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा
अवश्य वापर करा👇
[मुद्दे:
देशातील आरोग्याबाबत समस्या – अनेक आजार कायमचे ठाण मांडून
बसलेत – काही आजार काही वेळापुरते मर्यादित – दारिद्रयामुळे येणारे आजार –
प्रदूषणामुळे येणारे आजार – देशाच्या प्रगतीचा प्रश्न – पूर्वीची जीवनपद्धती
आरोग्यासाठी उपयुक्त – आजची जीवनपद्धती आरोग्यासाठी घातक – सवयी बदलल्या पाहिजेत –
सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष देणे आवश्यक.]
हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता
व्यायाम आणि आरोग्य निबंध
व्यायामाचे महत्व
व्यायाम आणि आरोग्य निबंध इन
मराठी
Vyayam aani
aarogya
Vyayamache
mahatwa nibandh in Marathi
- निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
- तुम्हाला कोणत्या विषयावरचा
निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा
आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
- व्यायामाचे तुमच्या जीवनातील स्थान आम्हाला नक्की COMMENT द्वारे कळवा.
Free Pdf file download
या
निबंधाची Pdf file download करण्यासाठी खालील link वर click करा.
व्यायाम आणि
आरोग्य निबंध pdf file download
धन्यवाद