दुष्काळ- एक आपत्ती
दुष्काळ- एक आपत्ती | Dushkal ek aapatti. |
✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏
रोज-रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या ऐकून मन हादरते. एखाद्या रोगाची लागण व्हावी आणि फळे
द्यायला झालेली झाडे मरत जावीत; तसे शेतकरी आत्महत्येच्या मार्गाने जीवन संपवत आहेत.
कधी कधी तर वर्ष-दोन वर्षांच्या लहान बाळासोबत जीवन संपवताना दिसत आहेत. त्या बिचाऱ्या
बालकांनी जीवन जगायला सुरुवात देखील केलेली नसते, तेवढ्यात त्यांच्यावर काळाचा
घाला येतो. कधी संपणार हे? जगण्याची उमेद कधी मिळणार या अभागी शेतकऱ्यांना?
दरवर्षी भारतात कोणत्या ना कोणत्या राज्यात दुष्काळ पडतोच. मग
तो ओला दुष्काळ असेल किंवा कोरडा दुष्काळ असेल. अजूनही आम्ही या नैसर्गिक आपत्तीवर
मात करू शकलो नाही. गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा या नद्यांना पूर आल्याची बातमी
आपल्याला दरवर्षी ऐकायला तसेच वाचायला मिळते. उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल या
राज्यात पूर येतात. त्या प्रदेशातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलव्ल्याच्या बातम्या
अधूनमधून ऐकायला मिळतात. कुठे गुरेढोरे वाहून गेलेली असतात; तर कधी उभ्या पिकांची
नासाडी झालेली असते. कधी कधी गावेच्या गावे वाहून जातात. अकाली पाऊस पडल्याने
पिकांवर कीड पडून पिके वाया गेल्याच्या बातम्याही आत्ता नवीन राहिलेल्या नाहीत.
‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी आम्हा शेतकऱ्याची अवस्था झाली आहे.
सरकार दुष्काळी भागांना अन्नधान्याचा पुरवठा करते, पाण्याचा
पुरवठा करते. जिथे पूर आलेले असतात त्या ठिकाणावरील लोकांची राहण्याची सोय केली
जाते. पण हे सर्व उपाय तात्पुरते असतात. या भागामध्ये राहणारी जनता या
आपत्तींपासून आपला बचाव कसा करता येईल, हे संकट कसे दूर होईल, याची चिंता करत
असते.
जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारा चेरापुंजीसारखा प्रदेश
भारतामध्ये आहे. हिमालायासारखे गोड्या पाण्याचे उगमस्थान आहे. गंगा, यमुना,
ब्रह्मपुत्रा यांसारख्या बारमाही भरपूर पाणी देणाऱ्या नद्या आहेत. या नद्यांना
कळावे काढून ते दक्षिणेकडील नद्यांना का नाही जोडता येणार? आसेतुहिमाचल सर्व नद्या
एकमेकांना जोडून जलसंपत्तीचे नियोजन करता येईल. शाप ठरणारे पाणी वरदान ठरेल.
याचबरोबर आणखीही काही उपाययोजना करता येईल. दुष्काळाचे एक
प्रमुख कारण म्हणजे जमिनीखाली पाण्याची पटली खूप खोल गेली आहे, हे होय. ही पटली
वाढवण्याचे उपाय केले पाहिजेत. उपाय खरे तर साधे व स्पष्ट आहेत. शेतात्म
डोंगर-उतारावर आडवे चर खोदले पाहिजेत. जेणेकरून पाणी वेगाने वाहून जाणार नाही. ते
मध्ये मध्ये अडवले जातील. पाणी अडले की ते जमिनीत झिरपू लागेल. शक्य अशा ठिकाणी
बंधारे घालून पाझर तलाव बांधले पाहिजेत. यामुळेही जमिनीखालची पाण्याची पटली
वाढण्यास मदत होईल. ही कामे जर रोजगार हमी योजना राबवून केली गेली तर त्याचे
दुहेरी फायदे आहेत. दुष्काळ निवारण्याचा मार्ग उपलब्ध होतो. तसेच, शेतकऱ्यांना
उपजीविकेसाठी पैसेही मिळतात.
महाराष्ट्र हा आत्ता दुष्काळाच्या छायेताला प्रदेश बनला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात उसासारखे अत्पानी पिणारे पिक घेताच कामा नये. पिकांचा नकाशा तयार करून त्यानुसारच लागवड केली पाहिजे. तसेचशेतकऱ्यांना आर्थिक नियोजनात मदत केली पाहिजे. नगदी पिकांसाठी मार्गदर्शन केले पाहिजे.
सर्वात महत्वाचे म्हणजे खाजगी सावकारीवर बंदीच लादली पाहिजे.
खाजगी साव्कारीनेच शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती फास आवळला आहे. म्हणून सावकारीचे
उच्चाटन हा प्रश्न प्राधान्यक्रमात अग्रभागी ठेवला पाहिजे.
हे उपाय सर्व सामर्थ्यानिशी केल्यास, किनालाही स्थलांतर करावे
लागणार नाही. गुरेढोरे मरणार नाहीत. स्वराज्यात सुराज्य अवतरेल आणि मग भारतमातेचे ‘
सुजलाम सुफलाम् , सस्य शामालाम’ असे केलेले गुणगान सार्थ ठरेल.
मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा
अवश्य वापर करा👇
[मुद्दे:
शेतकऱ्यांच्या आत्महत्या
दुष्काळ ओला – सुका
नैसर्गिक संकट
दुष्काळातील आपत्तींचे वर्णन
माणसे, गुरेढोरे यांचे हाल
कर्जबाजारीपणा
मदतीची गरज
दुष्काळ निवारणाचे ठोस उपाय
जगण्यातील दाहकतेचा तीव्र अनुभव
शेवट ]
हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता
- दुष्काळ एक आपत्ती
- दुष्काळ एक आपत्ती निबंध मराठी
- दुष्काळ एक आपत्ती मराठी निबंध
- Dushkal ek
aaptti
- Dushkal ek
aapatti Marathi nibandh
- Dushkal ek
aapatti nibandh Marathi.
✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏
- निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
- तुम्हाला कोणत्या विषयावरचा
निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
- दुष्काळ एक आपत्ती यावर तुमच्याकडे
अधिक माहिती असल्यास COMMENT च्या मदतीने इतरांशी
शेअर करा.
✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏
धन्यवाद