भाजी विक्रेत्याचे मनोगत
![]() |
भाजी विक्रेत्याचे मनोगत | Bhaji vikretyache manogat |
✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏
मी माझ्या आईबरोबर दर आठवड्याला भाजी मंडईत भाजी विकत
घेण्यासाठी जात असे. माझी आई आमच्या ठरलेल्या भाजीवेक्रेत्याकडूनच भाजी विकत घेत
असे. पुढे नंतर मी एकटाच भाजी विकत घेण्यासाठी मंडईत जाऊ लागलो. एके दिवशी आईला खूप
काम असल्यामुळे आईने भाजी मंडईत मलाच भाजी आणायला पाठवले. मी भाजी आणायला आमच्या
ठरलेल्या भाजीविक्रेत्याकडे गेलो. आज भाजी मंडईत फारशी गर्दी नव्हती. मी आईने
सांगितलेली भाजी विकत घेतली. आणि माझ्या मनात एक प्रश्न आला आणि मी सहज
भाजीवेक्रेत्या काकांना तो विचारला. तुम्ही हा व्यवसाय कसा काय निवडला? तेव्हा
त्यांनी मला टेबलावर बसायला सांगितले आणि त्यांनी त्यांची जीवनकहाणी पुढे सांगू
लागले.
अरे बाळा! मी एक सामान्य भाजीविक्रेता आहे. लहानपणीपासूनच
आमच्या घरची परिस्थिती फार चांगली नव्हती. त्या वेळी माझे बाबा भाजी विकून जे थोडेफार
पैसे मिळायचे त्यातच आमच्या कुटुंबाचे कसेबसे दोन वेळचे जेवण मिळायचे पैशांची
कमतरता, त्यातच आजीचे आजारपण, माझे शिक्षण या सर्वांसाठी पैसे पुरवता पुरवता बाबा
फार थकून जात असत. माझी आई, बाबांना मदत व्हावी म्हणून ती ही गावातल्या सावकाराकडे
कामाला जायची. त्यातच कसेबसे घर चालायचे. पुढे माझ्या आजीचे आजारपण वाढले आणि तिला
दवाखान्यात न्यावे लागले. डॉक्टरांनी उपचारांचा खर्चसुद्धा मोठा सांगितला. परंतु
आजीवर उपचार करणे तेवढेच गरजेचे होते. त्यातच माझ्या शिक्षणावर होणारा खर्च त्या
वेळी परवडणारा नव्हता. त्यामुळे मला माझे शिक्षण अर्धवटच सोडावे लागले. पुढे एक
दोन वर्ष अशीच उलटून गेली.
घरात बाबांना मदत व्हावी म्हणून मी शहराकडे गेलो. आणि नोकरी
शोधू लागलो. परंतु माझ्या पदरी केवळ निराशाच पडली, कारण माझे शिक्षण अर्धवट राहिले
होते. ते पूर्ण करणे घरची परिस्थिती बिकट असल्याकारणाने शक्य नव्हते. शेवटी निराश
होऊन मी घरी परतलो. मला कोणतेही काम मिळाले नाही इतरांप्रमाणे मी एक बेकार म्हणून
जीवन जगत होतो. पुढे बाबांच्या त्यांच्या वाढत्या वयामुळे जास्त काम करणे
त्यांच्या तब्बेतीला झेपत नव्हते. मग मी हळूहळू त्यांच्या व्यवसायात मदत करू
लागलो. मला बाबांबरोबर फिरून धंदा करण्याची सवय झाल्यानंतर बाबांना कामातून विश्रांती
देऊन पुढे मी हा भाजीविक्रेत्याचा व्यवसाय स्वीकारला. अशा रीतीने मी या व्यवसायात पदार्पण
केले.
मी बाजारामध्ये बसून भाजी विकतो. त्यासाठी मी महानगरपालिकेच्या
कचेरीतून परवानगी काढली आहे. रोज लागणारी भाजी विकत आणण्यासाठी आमच्या या बाजारापासून
पाच ते सहा मैल दूर असणाऱ्या मोठ्या मार्केट मधून भाजी आणावी लागते. कधी कधी यायला
जायला वाहन ण मिळाल्याने पायी चालत जावे लागते. येथून दर दोन दिवसानी मी भाजी
आणायला आमच्या मोठ्या मार्केट मध्ये जातो. आणलेली भाजी चांगली टिकून राहावी यासाठी
तिची योग्य ती काळजी घेण्यासाठी उपाययोजना करतो. कारण भाजीपाला हा नाशवंत पदार्थ
आहे हा लवकर खराब होणारा माल. बाजारामध्ये गिऱ्हाईकांशी चालणारी घासाघीस तर तुम्ही
पाहताच. भांडखोर म्हणून आम्हांला नाव ठेवली जातात. पण एवढ्या कष्टाचे काम! म्हणून
जीभ थोडी तिखट होते ! पण काही गिऱ्हाईके आमच्या सचोटीमुळे आमच्याशी कायमची बांधली
गेली आहेत.
वर्षानुवर्षे चाललेल्या आमच्या व्यवसायामध्ये आत्ता अडचणी
उभ्या राहत आहेत. बाहेरून कुठून-कुठून आलेले काही फेरीवाले विक्रेते दारोदार फिरून
भाजी विकतात. त्यामुळे बाजारात भाजी घेण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या
दिवसेंदिवस घाटात चालली आहे. ते हलक्या प्रकारची भाजी स्वस्तामध्ये विकतात आणि लोक
फसतात. शिवाय या फेरीवाल्यांना महापालिकेची परवानगी काढावी लागत नाही. पण कार तर या
सर्वांचा आमच्या स्थानिक भाजीविक्रेत्यांच्या धंद्यावर परिणाम होतो. मध्यंतरी
आम्हांला त्यांच्याशी झगडाव लागलं होत.
मला समाजाच्या एकाच गोष्टीचे वाईट वाटते ते म्हणजे लोक जेव्हा
मोठ-मोठ्या पंचतारांकित हॉटेलात जेवायला जातात तेव्हा तेथील पदार्थांवर लावण्यात
येणाऱ्या दरावर घासाघीस करीत नाहीत. तसेच ते जेव्हा मोठ-मोठ्या दुकानांतून
कपडे-तसेच चैनीच्या वस्तू खरेदी करतात तेव्हा त्यांच्या किंमतींकडे लक्ष देत
नाहीत, घासाघीस करीत नाहीत आणि तेच लोक जेव्हा भाजी विकत घ्यायला बाजारात येतात.
तेव्हा वीस रुपयांची भाजी पंधरा रुपयाला मिळावी यासाठी घासाघीस करतात. काही वेळेला
आमच्याशी आवाज चढवून बोलतात. वेडेवाकडे बोलतात. पण आम्हांला आत्ता त्याची सवय होऊन
गेली आहे. समाजाकडे एकच विनंती आहे. की त्यांनी त्यांचे वागणे बदलावे. पण काही
मनसे आम्हांला खूप सहकार्य करतात. असो! असे बरे वाईट अनुभव आम्हांला येतच असतात.
इतरांप्रमाणे मी सुद्धा माझ्या भविष्यातले काही बेत आखून
ठेवले आहेत. एक म्हणजे हा भाजीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणवर वाढवायचा. आमच्या
दुकानाच्या विविध शहरांत शाखा उघडून तेथील लोकांना उत्तम प्रतीच्या भाज्यांचा
पुरवठा करायचा. आत्ता माझी मूळ सुद्धा मोठी होतायत त्यांना त्यांच्या आवडीचे
शिक्षण देऊन मोठे करायचे. आत्ता आई-बाबांना काही काम होत नाही त्यांना या
सर्वांतून आराम द्यायचा. भविष्यात एक उद्योजक म्हणून नावारूपाला यायचंय आणि घरातील
सर्वांची स्वप्न पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करीन.
बाळा! सुरुवातीची परिस्थिती कशीही असली तरीही, त्यांतून
मनापासून प्रयत्न करून मार्ग शोधलात की वाट आपोआपच सापडते. जेव्हा आपल्यावर संकटे
येतात तेव्हा ती संकटे त्यांचे समाधान सुद्धा स्वतःबरोबर घेऊन येतात . आपल्याला
फक्त ते ओळखून योग्य त्या मार्गाने वाटचाल केली पाहिजे. बाला आज तुझ्याशी बोलून मन
हलक झाल. चाल आत्ता मी तुझा निरोप घेतो. पुन्हा भेटूच आपण या भाजी-मंडईत.
मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा👇
[मुद्दे:
घरची परिस्थिती
अर्धवट शिक्षण
बेकारी
स्वीकारलेला व्यवसाय
मोठ्या मार्केट मधून भाजी आणणे व विकणे
चांगले वाईट अनुभव
समाजाकडून अपेक्षा
भविष्यातील योजना
उपदेश
सांगता.]
हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता
- भाजी विक्रेत्याचे मनोगत
- भाजी विक्रेत्याचे मनोगत मराठी निबंध
- Bhaji vikretyache manogat Marathi nibadha
- Bhaji vikretyahce manogat essay in Marathi
✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏
- निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
- तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध
हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
- हा तुम्हाला निबंध कसा वाटला,
आम्हाला COMMENT
द्वारे
कळवा.
धन्यवाद