मी भ्रष्टाचार विरोधी मंत्री झालो तर...
![]() |
मी भ्रष्टाचार विरोधी मंत्री झालो तर... | Mi bhrashtachar virodhi mantri zalo tar... |
✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏
निसर्गाच्या खुशीत वसलेलं आमचं एक छोटास गाव आहे. परंतु
शहरापासून गावाचे अंतर खूप असल्याने गावाचा पाहिजे तेवढा विकास अजून घडून आला
नाही. गावातील रस्त्यांची अवस्था फार बिकट झाली होती. विकासाच्या दृष्टीने सारी बोंब
होती. एका योजनेच्या माध्यमातून आमच्या गावाला जोडणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरण
करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. आत्ता आमच्या गावातील राजकीय वातावरण एकदम ढवळून
निघाले होते. रस्त्याचे काम एका ठेकेदाराला देण्यात आले. थोड्या दिवसांतच कामाला
सुरुवात झाली. रस्त्याच्या सामग्रीचे ट्रक येऊ लागले. सामग्रीची पाहणी केली असता.
ती सामग्री निकृष्ट दर्जाची असलेली आढळून आली. आलेल्या सामाग्रीबाबत ठेकेदाराकडे
चौकशी केली असता. त्याने सांगितले की रस्त्याच्या कामाला मंजूर झालेल्या रक्कमेची
अर्धीच रक्कम आमच्यापर्यंत पोहोचली. त्यामुळे त्याच रक्कमेत काम सुरु आहे. यावरून
सरळ सरळ उघड झाले की या कामात भ्रष्टाचार झाला आहे.
मी शांतपणे सारे पाहत होतो. कसली ही लोकशाही लोकांनी निवडून
दिलेले लोकप्रतिनिधीच भ्रष्टाचार करीत आहेत. की भ्रष्टाचारी लोकच राजकारणात शिरले?
सज्जन लोक नेहमी राजकारणापासून दूर राहिलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे या
भ्रष्टाचारी लोकांच्या हातामध्ये सत्ता जाते. ते काही नाही आत्ता आपणच भ्रष्टाचारी
विरोधी मंत्री होणार. या विचाराबरोबरच. माझ्या मनात भ्रष्टाचारविरोधी नेत्याची
कल्पनाचित्रे तरळू लागली.
मला एखाद्या मंत्रिपदासाठी पात्र व्हायला अजून सात-आठ वर्षे
तरी आहेत. ही गोष्ट चांगलीच झाली. मला माझ्या योजनांची भरपूर तयारी करता येईल. तशा
काही योजना माझ्या तयारच आहेत.
सर्वांत आधी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद,
नगरपालिका, महानगरपालिका यांच्याद्वारे कोणकोणती विकास कामे केली जातात याचा
सविस्तर अभ्यास करेन. कोणकोणत्या कामांमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणवर होतो.
याबाबत माहिती संकलित करेन. प्रत्येक कामाची कार्यवाही कशाप्रकारे केली जाते हे
बारकाईने समजावून घेईन सर्व विकास कामांचे व्यवहार हे ऑनलाईन माध्यमातून करण्याचा
आग्रह धरीन. यांमुळे कामातील पारदर्शकपणा वाढण्यास मदत होईल. आणि भ्रष्टाचाराची
मुळे जेथल्या तेथे ठेचली जातील.
या सर्व कार्यपद्धती चा अभ्यास करून मी थांबणार नाही तर,
भ्रष्टाचार कमी होण्यासाठी गावपातळीवर तसेच तालुका, जिल्हा पातळीवर भ्रष्टाचार
विरोधी पथके स्थापन करून विविध योजना राबवण्यावर भर देईन. काम घेणारे ठेकेदार
स्वतःला काम मिळावे म्हणून मंत्र्यांना लाच देवू करतात. कायदा मोडून स्वताला काम
मिळवू पाहतात. यातच भ्रष्टाचाराची मुले आहेत. लोकांच्या या वागणुकीविरुद्ध
लोकांमध्ये जनजागृती घडवून आणीन जनतेच्या मनात नितीबाद्द्ल चाड असेल तरच ती मंत्र्यांच्या
मनात निर्माण होईल. शिधावाटप कार्यालये, पोलिस ठाणी व हॉस्पिटले या ठिकाणी
चालणारे कामकाज कशा प्रकारे होते याचा अभ्यास करेन. आणि या ठिकाणांवर होणाऱ्या
भ्रष्टाचारांना कायमचा आळा घालायचा प्रयत्न करेन.
आज प्रत्येक माणसाला कोणत्याही कार्यालयात गेल्यावर स्वतःचे
मन कमी वेळात करून हवे असते. मग ते काम लवकर करून मिळावे यासाठी तो त्या
अधिकार्याला लाच देऊ करतो. आणि येथूनच भ्रष्टाचार फोफावायला लागतो. आणि सगळीकडे
भ्रष्टाचाराचे साम्राज्य पसरते. जर भ्रष्टाचार समाजातून कमी करायचा असेल तर माणसांची
ही वृत्ती कमी करण्याच्या दिशेने पाऊले उचलेन. भ्रष्टाचार विरोधी पथके स्थापन करून
ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होत असेल त्या ठिकाणी धाडी टाकून भ्रष्टाचार करणाऱ्या
व्यक्तीला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल या दृष्टीने प्रयत्नशील राहीन जेणेकरून,
शिक्षेच्या भीतीने भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होईल.
भ्रष्टाचार आपल्याला कमी करायचा असेल तर प्रत्येक नागरिकांनी
स्वतःपासून सृरुवत केली पाहिजे. कोणालाही लाच देऊ नये अथवा कोणाला लाच देवू नये हा
निश्चय मनाशी बाळगला तर भ्रष्टाचार आपोआप कमी होईल.
एकंदरीत पाहायला गेलो तर भ्रष्टाचार कमी करायचा असेल तर
प्रत्येकाने स्वतःच्या इच्छेने भ्रष्टाचाराला आवर घातला पाहिजे हाच सर्वोत्तम उपाय
आहे.
मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा
अवश्य वापर करा👇
[मुद्दे:
- असा मंत्री असण्याची आवश्यकता वाटायला लावणारा प्रसंग
- भ्रष्टाचारामुळे देशाचे होणारे नुकसान
- असा मंत्री झाल्यावर कोणकोणत्या कामांकडे प्राधान्याने लक्ष देणार
- त्यामुळे कोणते नुकसान टळेलकोणते फायदे होतीलमुळात ही वृत्ती नष्ट करायची उपाययोजना
- स्वतःपासून सुरुवात
- भ्रष्टाचार फक्त पैशाचाच नसतो
- एकंदरीत सच्छील वृत्तीची गरज ]
✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏
हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता
- मी भ्रष्टाचार विरोधी मंत्री झालो तर...
- भ्रष्टाचार विरोधी मंत्री झालो तर...
- Mi bhrashtachar
virodhi mantra zalo tar…
- निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
- तुम्हाला कोणत्या विषयावरचा
निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
- हा तुम्हाला निबंध कसा वाटला,
आम्हाला COMMENT
द्वारे
कळवा.
✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏
धन्यवाद