एका छत्रीची आत्मकथा
![]() |
एका छत्रीची आत्मकथा | Eka chhatrichi aatmakatha. |
✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏
मित्रांनो मी एक मोडलेली छत्री आहे. आत्ता मी तुमच्यासाठी
बिनकामाची आहे. मी माझ्या या छोट्याश्या जीवनात खूप उन्हाळे पावसाळे बघितले आहेत.
माझ्या जीवनाची जीवनकहाणी एकदम रोमांचकारी आहे. आज मी तुम्हाला माझ्या जीवनाची
गोष्ट सांगते नीट ऐका हा.
माझ्या जन्म होऊन साधारण पाच वर्षांचा कालावधी होऊन गेला. एका
कंपनीच्या कारखान्यामध्ये मला तयार करण्यात आले होते. काळ्या आणि त्यावर पांढऱ्या
रेषा असणाऱ्या मुलायम कापडापासून माझी निर्मिती झाली होती. माझा सांगाडा मजबूत
तारांचा वापर करून बनवला गेला होता. मला बनवण्यासाठी वापरण्यात आलेल्या तारा या
स्टील पासून बनवण्यात आल्या होत्या. मला धरण्यासाठी बसवलेली मुठ देखील अगदी आकर्षक
होती. कारखान्यात काम करणाऱ्या कारागिरांनी मला अगदी मनापासून बनवले होते. माझी
निर्मिती होत असताना मला कारखान्यामध्ये खूप वेदना सहन कराव्या लागल्या होत्या, पण
त्यामुळे माझे तूप कोणाच्याही पटकन डोळ्यांत भरेल असे सुंदर आणि मनमोहक झाले होते.
माझी सजावट झाल्यानंतर स्वतःचे खुललेले रूप पाहून माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
काहीच दिवसांमध्ये मी माझ्या दुसऱ्या नातलगांसोबत बाजारातील
एका मोठ्या दुकानामध्ये येऊन पोहचलो. पावसाळ्याचे दिवस सुरु होताच एका गिऱ्हाईकाने
मला खरेदी केले. माझा मालक मला घेऊन दुकानाच्या बाहेर पडतो न पडतो तोच मुसळधार
पाऊस पडू लागला. मी पावसाचा पूर्णपणे सामना केला आणि माझ्या मालकांना घरी सुखरूप
पोहचवले. घरी पोहोचताच घरातील सर्वांनी माझी खूप प्रशंसा केली.
पावसाळ्यात माझा एकच प्रयत्न असायचा की माझे मालक कशाहीप्रकारे
पावसात भिजताकामा नये. मी पावसाच्या पाण्याच्या धारा आणि सोसाट्याचा वारा
माझ्यावरच झेलत असे. मी माझ्या मालकांबरोबर चित्रपट गृहे, क्लब, बाजार, दवाखाने,
मंदिरे आणि माहित नाही आणखी किती ठिकाणी फिरले आहे. अशाप्रकारे दोन ते अडीज वर्षे
मी त्यांची सेवा केली. एक दिवस माझ्या मालकाने मला मंदिराच्या दरवाज्याजवळ ठेवले
आणि देवाचे दर्शन घेण्यासाठी ते मंदिरात गेले. त्या ठिकाणाहून एका चोराने मला
चोरले आणि त्यानंतर मी एका फेरीवाल्याच्या हाती जावून पडले.
मी या नवीन मालकासोबत मी गरिबांच्या राहणीमानाचे दर्शन केले.
पावसाळ्याच्या दिवसांत तर ठीक होते, पण कडाक्याच्या उन्हात देखील मला माझ्या नव्या
मालकाची सेवा करायला लागायची. एके दिवशी एका भांडणामध्ये मी त्याला कसे बसे
वाचवले, पण त्यात माझी हाडे मोडली गेली आणि माझा मुलायम कपडा सुद्धा फाटला. तो मला
छत्री दुरुस्त करणाऱ्याकडे घेऊन गेला. मला त्याने नीट ठीक करून दिले. पण आत्ता
माझे तरुणपणाचे दिवस संपत चालले होते. मी माझ्या आयुष्यातल्या शेवटच्या दिवसांकडे
वाटचाल करीत होते. एक दिवस मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे माझ्या तारा
उलट्या झाल्या आणि माझा एका बाजूचा भाग तुटला. त्या दिवशी माझ्या मालकाने घरी
आल्यावर मला या अंधाऱ्या कोपऱ्यात फेकून दिले.
या घराच्या अंधाऱ्या कोपऱ्यात पडून पडून मी माझ्या जीवनाचे
शेवटचे दिवस मोजत आहे. मी माझे सारे आयुष्य मानवाची सेवा करण्यासाठी अर्पण केले आहे,
याचा मला आनंद आहे.
मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा
अवश्य वापर करा👇
[मुद्दे:
प्रस्तावना
निर्मिती व जन्म
दुकानातून बाहेर
जीवनातील चढाव उतार
चांगले वाईट अनुभव
माझा आदर्श
शेवटचे दिवस सुरु.
समारोप.]
हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता
एका छत्रीची आत्मकथा
एका छत्रीचे मनोगत
मी छत्री बोलतेय
मी छत्री बोलत आहे
Chhatrichi aatmakatha
Eka chhatriche manogat
Mi chhatri
boltey
Mi chhtri
bolat aahe
- निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
- तुम्हाला कोणत्या विषयावरचा
निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
- हा तुम्हाला निबंध कसा वाटला,
आम्हाला COMMENT
द्वारे
कळवा.
धन्यवाद