जाहिरातींच्या विळख्यात
![]() |
जाहिरातींच्या विळख्यात | Jahiratinchya vilkhyat |
✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏
आजच्या युगात आपले कोणतेही उत्पादन ग्राहकापर्यंत पोहचवायचे
झाल्यास उत्पादन कंपन्या जातीरातींची मदत घेतात. आपल्या उत्पादनांची जाहितात करून ते लोकांपर्यंत आपले उत्पादन पोहचवतात. जाहिरात
ही आजच्या युगात फार महत्वाची कला मानली जाते. उत्पादन कंपन्यांनी त्यांच्याकडे
उपलब्ध असलेल्या वस्तूंची जर जाहिरातच केली नाही तर ग्राहकांना त्या वस्तूबाबत माहिती कशी काय कळणार? अशा विचाराने जाहिरातीने मानवाच्या जीवनामध्ये स्थान निर्माण केले. आणि आज तिने मानवाचे
सारेच जीवन व्यापून टाकले आहे. वृत्तपत्रे, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, यांसारख्या
पायऱ्या पार करत ती रस्त्यांवर मोक्याच्या
जागी दिसू लागली आहे. आत्ता पहिले, तर ती नभोवाणी, दूरचित्रवाणी, संगणक आणि मोबाईल
फोनच्या माध्यमातून जगाच्या प्रत्येक घरामध्ये घुसली आहे.
अजगाने कोणत्याही प्राण्याला गिळले
की तो झाडाला विळखा घालून त्या प्राण्याची हाडे मोडतो असे ऐकले आहे. खरोखरच आज
जाहिरातींनी देखील माणसाला असाच विळखा घातलेला आपल्याला दिसून येतो. सकाळी
उठल्यावर दात कोणत्या ब्रश णे घासायचे. त्यासाठी कोणती टूथपेस्ट कोणती वापरायची हे
देखील जाहिरातच ठरवते. त्यानंतर आंघोळ करताना कोणता साबण अथवा शाम्पू वापरायचा ते
देखील जाहिरातच माणसाला सांगत असते. सकाळचा नास्ता बनवता कोणते तेल वापरावे, मसाले
कोणते वापरावेत, हे देखील जाहिरातच ठरवून देते. आपण सकाळी व्यायाम करत असताना
कोणती साधने वापरावीत हे देखील जाहीतातच ठासून सांगत असते. ऑफिसमध्ये काम करताना
कीन्व व्यवसायात आपले व्यक्तिमत्व कसे फुलवायचे त्यासाठी आपला पोशाख कसा असला
पाहिजे त्यांचे तपशीलवार नियोजन जाहिरात करते. इतकेच नाही तर रात्री झोपताना उशी व
गादी कोणती वापरावी ते ही जाहीतातच ठरवून देते. रात्री परस्परांना ‘गुड नाईट’
करण्यापूर्वी आम्हांला डासांसाठी गुड नाईट करण्याचा संदेश जाहिरातच देते. पाहिलेत
ना, माणूस दिवसाच्या सुरुवातीपासून ते रात्री झोपेपर्यंत जाहिरातींच्या या
विळख्यात किती गुरफटलेला आहे!
खरे पाहायला गेलो तर जाहीअरात करणे
ही सुद्धा एक कलाच आहे. जाहिरात करण्याचे
एक शास्त्र आहे त्याचप्रमाणे जाहिरातीचे तंत्र आहे. आज ही ज्काला, हे शास्त्र व हे
तंत्र अवगत करण्यासाठी पदवी परीक्षांचे अभ्यासक्रम सुद्धा उपलब्ध आहेत. जाहीरात ही अनेक काळाची पोशिंदी आहे. आज दूरचित्रवाणीवर, नभोवाणीवर जाहीराती
येतात त्या संगीताच्या सहाय्याने अधिक आकर्षक बनतात. जाहिरात बनवायची
म्हटलं की अभिनय हा हवाच, चित्रकला, लेखनकलेचासुद्धा येथे कस लागतो. छायाचित्रणाला
जाहिरातींमध्ये फार मोलाचे स्थान आहे. त्यामुळे जाहिरात ही माणसाच्या विविध
कलागुणांना वाव देण्याचे महत्वाचे काम पार पाडते. याच जाहिराती माणसाला प्रसिद्धी
आणि पैसा मिळवून देण्याचा मार्गही जाहिराती माणसाला उपलब्ध करून देतात.
आजकाल जाहिरातींच्या माध्यमातून होणारी ग्राहकांची फसवणूक ही
फार घातक ठरत आहे. काळेपणा दूर करण्यासाठी व आपला चेहरा गोरापान दिसण्यासाठी हा विशिष्ट
प्रकारचा साबण वापरा, लांब व भरपूर दाट केसांसाठी हे विशिष्ट प्रकारचे तेल वापरा. आपले
दात मजबूत राहण्यासाठी हीच टूथपेस्ट वापरा, हे विशिष्ट प्रकारचे रत्न तुम्ही
तुमच्यासोबत बाळगलेत तर तुम्हाला महिना भरात धनप्राप्ती होईल. अश्या प्रकारे जाहिरातींच्या
माध्यमातून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. काही वेळेला तर जाहिरातींना खरे मानून
युवक विविध औषधांचे सेवन करतात. काही वेळेला जाहिरातीच्या विळख्यात सापडलेल्या या
युवकांचे शारीरिक नुकसान होतेच, पण त्यांना जबर मानसिक धक्काही बसतो.
आजच्या या जाहिरातींनी वेढलेल्या जगात केवळ जाहिरात करूनही या
उद्योजकांचे आणि व्यापाऱ्यांचे मन भरत नाही. मग ते ग्राहकांपुढे वेळोवेळी विविध
प्रलोभने उभी करतात. या दोन वस्तू घेतल्यावर त्यावर एक वस्तू फुकट वगैरे.
वेगवेगळ्या ऋतुमानानुसार विविध वस्तूंचे ‘भव्य सेल’ लावलेले आपल्याला पाहायला
मिळतात हे सेल याच जाहिरातींचे एक वेगळे स्वरूप आहे. मग सामान्य ग्राहक त्या
प्रलोभानापायी अनावश्यक गोष्टींची सुद्धा खरेदी करू लागतो. हा के फार मोठा तोटा
जाहिरातींमुळे होताना आपल्याला पहावयास मिळतो. यामुळे माणसाचे वैयक्तिक नुकसान
होतेच; पण त्याचबरोबर देशाच्या आर्थिक विकासाच्या प्रवासात विकृतीही निर्माण
होतात. सर्वसामान्य जनता जागरूक राहिली, तरच या जाहिरातींच्या दुष्परिणामांपासून
स्वतःला वाचवता येऊ शकते.
मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा
अवश्य वापर करा👇
[मुद्दे:
आजच्या जगातील महत्वाची बाब
आपल्याला वस्तूची माहिती पुरवण्यासाठी जाहिरातीचा मानवी
जीवनात प्रवेश
या जाहिरातींचा माणसाला अजगरासारखा विळखा
जाहिरातींचे तंत्र अनेक अंगांनी विकसित
जाहिरात ही सुद्धा एक कलाच
जाहिरात हे आज पैसे मिळवण्याचे साधन
खोट्या व फसव्या जाहिराती
ग्राहकांना दाखवलेली आमिषे
ग्राहकांमध्ये जागृती आवश्यक
समारोप]
हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता
- जाहिरातींच्या विळख्यात
- जाहिरात आणि ग्राहक
- जाहिरातींच्या विळख्यात मराठी निबंध
- Jahiratinchya
vilkhyat nibandh
- Jahirat aani
grahak
- निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
- तुम्हाला कोणत्या विषयावरचा
निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
- हा तुम्हाला निबंध कसा वाटला,
आम्हाला COMMENT
द्वारे
कळवा.
धन्यवाद