माझी वसुंधरा माझी जबाबदारी / पर्यावरणाचा ऱ्हास – एक समस्या
पर्यावरणाचा ऱ्हास – एक समस्या | paryavarnacha rhas – ek samasya |
🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
शाळेच्या पालक सभेमध्ये जमलेल्या पालकांची आपापसांत चर्चा
चालली होती की, आजच्या या मुलांच्या डोक्यावर किती अभ्यासाचा भार आहे? सर्व
पालकांचे या विषयावर एकमत झाले होते. त्यांच्या गप्पा चांगल्याच रंगात आल्या
होत्या. मुलांच्या अभ्यासाच्या विषयामध्ये किती नवनवीन विषय समाविष्ट केले जात आहेत.
‘परिसर आणि पर्यावरण अभ्यास’ या विषयांची काय गरज आहे? मुलांच्या डोक्यावर ओझे आहे
नुसते. त्या त्यांच्या रंगलेल्या गप्पांमध्ये मध्येच मला स्वतःच मत मांडावेसे
वाटले, “ हे पालकांनो मुलांचे पालक म्हणून जी
तुमची कर्तव्ये आहेत ती तुम्ही नीट पार पाडत नाहीत, म्हणून मुलांना त्या
गोष्टींबाबत ज्ञान देता यावे म्हणून शासनाला हे सर्व निर्णय घ्यावे लागतात.
आपले आरोग्य, आपले घर यांचा परस्परांशी किती संबंध आहे, हे
तुम्ही कधी आपल्या मुलांना सांगितलेच नाही. आपला परिसर स्वच्छ ठेवणे किती महत्वाचे
आहे हे तुम्ही कधीही आपल्या मुलांच्या मनावर ठसवले नाही. आपल्या भोवतालचे वातावरण
शुद्ध राहवे म्हणून तुम्ही तुमच्या आजूबाजूला कडुलिंब, दुर्वा, तुळस यांसारख्या
वनस्पतींची कधी आवर्जून लागवड केली आहे का? प्राचीन काळामध्ये एकत्रित कटुंबसंस्थेमध्ये
लहान असतानाच मुलांवर मोठ्या माणसांकडून संस्कार केले जायचे. मात्र आत्ता विभक्त
कुटुंबव्यवस्थेत या गोष्टींचा अभाव असल्याचे दिसून येते. त्यामुळे आत्ता ही
जबाबदारी समाजची म्हणजेच शाळेची ठरते.
अगदी मोठ्या गरुडा पासून ते अगदी लहान मुंगीपर्यंत सर्वजण
पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करत असतात. पण सर्वश्रेष्ठ असणारा माणूस मात्र
आपल्या बुद्धीच्या जोरावर या पर्यावरणाचा समतोल बिघडवतो आहे. माणसाचे असे हे
बेफिकीरपणे वागणे एक दिवस जग निर्मनुष्य करून सोडेल, असा धोका आत्ता वाटू लागला
आहे. निसर्गाने मानवाला अन्न, वस्त्र, निवारा यांसारख्या अनेक महत्वाच्या गोष्टी
दिल्या पण मानवाने त्याचा योग्य उपयोग केला नाही, नेहमी दुरुपयोगच करताना दिसत
आहे.आणि त्यावेळी तो आपल्या भविष्याचा विचार करीत नाही.अलीकडे तर शहरातील माणूस
मातीला विसरत चालला आहे.. वाढती वृक्षतोड मानवाच्या अस्तित्वावरच आघात करीत आहे.
माणूस आपले सौंदर्य जपण्याचा आटोकाट प्रयत्न करतो परंतु, या वसुंधरेची जरासुद्धा
काळजी घेत नाही.
धरणीमातेचा ऱ्हास करणाऱ्या या अविचारी माणसमध्ये जागरुकता
निर्माण व्हावी म्हणून ‘वसुंधरा दिन’ हा दिवस २२ एप्रिल रोजी साजरा केला जावू
लागला. पर्यावरणाचा हा प्रश्न साऱ्या सृष्टीच्या अस्तित्वाशी संबंधीत असल्याने
आंतरराष्ट्रीय ग्राहक संघटनेकडून १९९२ सालापासून हा वसुंधरा दिन साजरा केला जावू
लागला.
माणसांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जशी जशी
लोकसंख्या वाढत चालली आहे तसेच या पृथ्वीवर मानवनिर्मित कचऱ्याचे साम्राज्यसुद्धा
वाढत चालले आहे. त्यामध्ये वर्षानुवर्षे नष्ट न होणाऱ्या प्लास्टिक चा कचरा तर अगदी
दक्षिण ध्रुवापासून ते अगदी उत्तर ध्रुवापर्यंत पासरला आहे. अशा प्रकारे माणूसच या पर्यावरणाच्या ऱ्हासाला
कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे आत्ता माणसाला या त्याच्या चुकांचे गंभीर परिणाम
भोगावे लागत आहेत.
आपल्या वागणुकीचे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहेत हे समजल्यावर
आजकाल माणसामध्ये पर्यावरणाचे जतन करण्याची तीव्र जाणीव निर्माण झाली आहे.
त्यासाठी विविध कायदे, नियम तयार केले गेले आहेत. आपली वाहने नेहमी सुस्थितीत
ठेवणे, वेळोवेळी पी.यु.सी. तपासणे, सार्वजनिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करणे,
कारखान्यातील दुषित पाण्याची योग्य ती विल्हेवाट लावणे, ओला कचरा सुका कचरा अशी
तयार होणाऱ्या कचऱ्याची विभागणी करणे, यांसारख्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा
अवलंब करून आपल्याला आपल्या पर्यावरणाचा समतोल टिकवला पाहिजे. उपलब्ध उपाययोजनांचा
वापर करून आपल्या पर्यावरणाचे जतन केले पाहिजे. भारतासाख्या देशामध्ये सौर उर्जेचा
जास्तीत जास्त वापर करणे खूप फायदेशीर आणि पर्यावरणपूरक आहे. सारा समाज जेव्हा
पर्यावरणाच्या रक्षणासाठी मनापसून प्रयत्न करेल तेव्हाच तो आपली प्रगती साधू शकेल.
मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा
अवश्य वापर करा👇
[मुद्दे:
माणूस आणि पर्यावरण यांचे अतूट नाते
माणसाला या नात्याचा विसर
इतर प्रांण्याना विसर पडलेला नाही
पर्यावरणाचा ऱ्हास
माणसाची निसर्गापासून फारकत
‘वसुंधरा दिन’ पाळण्याची सुरुवात
लोक्संखेत बेसुमार वाढ
मानवनिर्मित कचऱ्याची निर्मिती
काही प्रमाणात जनजागृती करणे
कचरा व्यवस्थापन, वाहनांची योग्य ती देखभाल, सौरउर्जा ,
संसाधनांचा मर्यादित वापर वगैरे मार्गांनी उपाय योजना सुरु
समारोप]
हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता
- विशुद्ध पर्यावरण: एक सामाजिक जबाबदारी
- पर्यावरणाचा ऱ्हास एक समस्या
- पर्यावरण रक्षण
- पर्यावरण रक्षण आणि माणूस
- Vishudha paryavarn
ek samajik jababdari
- Paryavarnacha
rhas ek samasya
- Paryavarn rakshan
- Paryavarn rakshan
aani manus
- निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
- तुम्हाला कोणत्या विषयावरचा
निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
- हा तुम्हाला निबंध कसा वाटला,
आम्हाला COMMENT
द्वारे
कळवा.
धन्यवाद