![]() |
सादरीकरण- एक जीवनावश्यक कौशल्य |
✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏
असे म्हटले जाते की, माणूस हा सामाजिक प्राणी आहे. तो
समूहामध्ये राहणे पसंत करतो. तो एकेकटा, स्वतंत्रपणे जगूच शकणार नाही. तो एकत्र
टोळीने राहतो. तो त्यच्या जगण्याच्या आधारच आहे. हा आधार नसेल तर माणूस वेडापिसाच
होईल. म्हणूनच बघा, प्राचीन भारतीय संस्कृतीपासून ते अगदी आजतागायत सर्वत्र
माणसाला शिक्षा केली जाते ती तुरुंगवासाची . त्याला त्याच्या मित्रांपासून, समाजापासून,
कुटुंबापासून तोडून टाकण्याची शिक्षा असते. बाह्य जगाशी कोणताही संपर्क येऊ
द्यायचा नाही, हीच ती शिक्षा असते. ही शिक्षा माणसाला मृत्युदंडापेक्षा ही भीषण
वाटत आलेली आहे. समाजात राहणे ही त्यांची जीवनावश्यक गरज आहे.
समाजात राहायचे म्हणजे दुसऱ्यांच्या सोबतीने, त्यांच्या
सहकार्याने राहायचे. म्हणूनच ज्यांच्या सोबत आपण राहतो, वावरतो त्यांना आपल्या
इच्छा-आकांक्षा, भावना-विचार समजावून सांगणे आवश्यक ठरते. इतरांच्या
इच्छा-आकांक्षांना तडे ण जाता आपल्या मनाप्रमाणे जगता आले पाहिजे. म्हणूनच आपल्या
कल्पना भावना, विचार इतरांना समजावून सांगणे हे अत्यंत कौशल्याचे ठरते. याच्यासाठी
सादरीकरणाची गरज आहे. स्वतःची मते पद्धतशीरपणे समजावून सांगण्यासाठी खास युक्तिवाद
करावा लागतो. ही सर्व पद्धत म्हणजे सदरीकरण होय.
सादरीकरणाशिवाय माणूस नाही. सादरीकरण हा माणसाच्या जगण्याचाच
एक भाग आहे. आपले बोलणे, चालणे, उठणे, बसणे, वागणे, हातवारे करणे किंबहुना आपली
देहबोली हे आपले सादरीकरणच होय. या सादरीकरणातून आपले व्यक्तिमत्व व्यक्त होत
असते. आपण फारच थोड्या कृती एकट्याने, खाजगीरीत्या करतो. आपले बहुतांशी जगणे
इतरांसमोर, इतरांसोबतच घडत असते. म्हणजे आपण इतरांसमोर सदोदित सादरीकरणच करत असतो
म्हणा णा!
हे सादरीकरण अनौपचारिक पद्धतीने घडत असते. म्हणूनच आईवडील
किंवा अन्य वडीलधारी माणसे “उठता बसता काळजी घे”, “असा उभा
राहू नकोस, तसा राहा” या अशा सूचना करतात. इतरांसमोर आपले
व्यक्तिमत्व चांगल्या रीतीने प्रकट व्हावे, ही त्यांची इच्छा असते. म्हणजेच आपल्या
देहबोलीला, आपल्या वागण्याबोलण्याला किती महत्व आहे, हे लक्षात येईल.
मात्र, आताचे जीवन खूप गुंतागुंतीचे बनले आहे. खूप व्यामिश्र
बनले आहे. जागतिकीकरणामुळे संपूर्ण मानवी जीवनच ढवळून निघाले आहे. कामांचे स्वरूप
व व्याप्ती वाढली आहे. विविध प्रकारचे उद्योग-व्यवसाय निर्माण झाले आहेत. संगणक,
इंटरनेट, मोबाईल यांसारख्या माहितीतंत्रज्ञानाच्या दुतांमुळे सर्व व्यवहारांचे
स्वरूप आरपार बदलले आहे. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक क्षेत्रांत अनेकानेक घडामोडी
घडताहेत. यासाठी चर्चा, परिषदा, मेळावे, बैठका, संमेलने, शिबिरे इत्यादी आयोजित
केली जात आहेत. माणसांना विविध कारणांनी असे एकत्र यावे लागत आहे. अशा वेळी
समूहासमोर आपल्या कल्पना, आपली मते व्यक्त करण्याची, सगळ्यांना आपले विचार समजावून
सांगण्याची वेळ येते. आधुनिक काळात या सगळ्याला आपल्याला सामोरे जावे लागत आहे. हे
टाळता येणे शक्यच नाही. अन्न्यथा आपल्याला नोकरी, धंदा वा व्यवसाय करताच येणार
नाही. येथे सादरीकरणाचा संबध येतो. अशा या सादरीकरणाशिवाय आपण जगूच शकणार नाही.
काही वर्षांपूर्वी जीवन हे शांत, संथ होते. तेथे कोणाला,
कशाचीही घाई नव्हती किंवा अगत्यही नव्हते. म्हणून कोणीही सैलपणाने वागला तरी ते
चालून जाई. आत्ता मात्र ते शक्य नाही. म्हणून सादरीकरणाचा अभ्यासही करावा लागेल. आपण
जेव्हा दुसऱ्यांसमोर सादर होतो तेव्हा, उभे राहणे, बोलणे, हातवारे करणे या सगळ्याच
गोष्टींचा काटेकोर पणे अभ्यास करावा लागेल. कोणत्या हेतूने व कोणत्या प्रकारच्या
लोकांसमोर आपण उभे राहिलो आहोत, हे लक्षात घेऊन आपल्याला आपल्या सादरीकरणाची रीत
ठरवावी लागेल. सादरीकरण हे आता दुर्लक्ष करण्याएवढे बिनमहत्वाचे राहिलेले नाही.
आपण शाळा-कॉलेजात अभ्यास करतो, तसा सादरीकरणाचा अभ्यास करावा लागेल. सातत्याने
सराव करावा लागेल. तर आणि तरच आपला आधुनिक जगामध्ये टिकाव लागणार आहे.
✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏
मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा
अवश्य वापर करा👇
[मुद्दे:
समूहात राहणे ही माणसाची जीवनावश्यक गरज
त्यामुळे इतरांसमोर कौशल्याने सदर होणेदैनंदिन जीवनात
अनौपचारिक सदरीकरण
आधुनिक जीवन गुंतागुंतीचे
सतत विविध समूहांसमोर सादर होण्याची निकड
विशिष्ट कौशल्य आवश्यक
पूर्वीचे जीवन शांत, संथ
सादरीकरणाचा अभ्यास करणे आजच्या काळात अत्यंत महत्वाचे
समारोप.]
हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता
- सादरीकरण: एक जीवनावश्यक कौशल्य
- सादरीकरण एक कौशल्य
- Sadarikaran
ek jivanavshyak koushalya
- Sadarikarn ek
koushalya
- निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
- तुम्हाला कोणत्या विषयावरचा
निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
- हा तुम्हाला निबंध कसा वाटला,
आम्हाला COMMENT
द्वारे
कळवा.