टाकाऊ कचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन
मित्रांनो ‘आज आपण टाकाऊ कचऱ्याचे
वर्गीकरण व व्यवस्थापन.’ या विषयावरील सविस्तर माहिती पाहणार आहोत. याचा उपयोग
शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रकल्प करताना होणार आहे. ११वी १२ वी
च्या सुधारित अभ्यासक्रमातील पर्यावरण या विषयाच्या प्रकल्पाच्या मुद्द्यांनुसार माहिती
आम्ही येथे दिली आहे. हीच माहिती तुम्हाला तुमचा प्रकल्प पूर्ण करण्यास मोठी मदत
करेल यात काही शंका नाही.
(पर्यावरण प्रकल्प ९वी ते १२वी
साठी.)
टाकाऊ
कचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन
प्रकल्प प्रस्तावना
या पर्यावरणात आधीपासून कोणत्याच प्रकारचा कचरा हा अस्तित्वात नसतो. पृथ्वीवर कचरा हा मानवच तयार करत असतो. निसर्ग जे आपल्याला देत असतो तेच त्या
निसर्गाला परत देणे गरजेच असते. जर आपण
झाडांचे उदाहरण पाहायला गेलो तर झाडे आपल्या अन्न,वस्त्र, निवारा यांसारख्या
गोष्टी पूर्ण करतात. आपल्याला मिळालेल्या या गोष्टी त्या झाडांना योग्य त्या
मार्गाचा अवलंब करूनच परत दिल्या पाहिजेत. योग्य स्वरुपात झाडाने दिलेल्या वस्तूची
परतफेड करायची म्हणजे झाडाने आपल्याला केलेल्या मदतीच्या बदल्यात आपण झाडाला योग्य
ते खत, पाणी दिले पाहिजे. पण अशी परतफेड मानव कधी करताना आपल्याला दिसून येतच
नाही. झाडाने दिलेल्या वस्तूंचा आपण वापर करतो आणि नंतर नको असलेला भाग आपण या
पर्यावरणात इकडे तिकडे टाकून देतो. माणूस या कचऱ्याची थोड्याफार प्रमाणात
विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करतो. परंतु, त्या निर्माण झालेल्या कचऱ्याचा काही
पुनर्वापर करता येऊ शकतो का? हा कचरा उपयोगी पडू शकतो का याचा कोणीही विचारच करीत
नाही. मानव निसर्गाची परतफेड योग्य रीतीने करताना दिसून येतच नाही. या सर्वांवर एक रामबाण उपाय म्हणजे, येथे जो
कचरा झालाय तो आपल्यामुळेच झालाय ही भावना आणि योग्य ती प्रत्यक्ष कार्यवाही
प्रत्येक नागरिकाने केली तर कचऱ्याचा प्रश्नच उरणार नाही.
टाकाऊ कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी तयार केलेला आपला कायदा जरी योग्य
असला तरीही खरा अडथळा त्याची अंमलबजावणी करण्यातच असल्याचे दिसून येते. कचऱ्याच्या
समस्येला आपण नागरिक देखील जबाबदार आहोत हे प्रत्येकाने स्वीकारले पाहिजे.आपल्या
आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा, खाऊ खावून झाल्यानंतर त्याचा कागत चुरगाळून
तेथेच न टाकता कचऱ्याच्या डब्यातच टाकला पाहिजे, पाण्याच्या बाटलीतील पाणी संपल्यानंतर ती
बाटली गाडीच्या खिडकीतून बाहेर टाकून देऊ नये, इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचा आपण अवलंब
करत नाही, तशी शिस्त मुलांना पालकांकडून
लावली जात नाही. निष्काळजीपणे आपण एखादी वस्तू लगेच टाकून देतो आणि त्याचा या
पर्यावरणावर काय परिणाम होत असेल याचा विचारच करीत नाही. आपल्या आजूबाजूचा परिसर
म्हणजे कचराकुंडी असेच आपण समजत असतो.
आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण ‘टाकाऊ कचऱ्याचे वर्गीकरण व
व्यवस्थापन ’ या बाबत सविस्तर माहिती घेणार आहोत.
अनुक्रमणिका
अ.क्र. घटक
१) विषयाचे महत्व
२) प्रकल्पाची उद्दिष्टे
३) टाकाऊ कचरा
४) टाकाऊ कचऱ्याचे वर्गीकरण
५) टाकाऊ कचऱ्याचे स्रोत
६) टाकाऊ कचरा व्यवस्थापनाच्या
सर्वसाधारण पद्धती
७) सामूहिक कचरा व्यवस्थापन
व
वैयक्तिक सह्भाग
८) निरीक्षण
९) विश्लेषण
१०) निष्कर्ष
११) संदर्भ
१२) प्रकल्पाचा अहवाल
[ या प्रकल्पाची वरील
अनुक्रनिकेनुसार सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून pdf file डाऊनलोड
करून घ्या.]
PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील DOWNLOAD BUTTON वर क्लिक करा.
नवीन प्रकल्पांच्या Notification मिळवण्यासाठी Educationalमराठी चे You Tube Channel आत्ताच Sbscribe करा.
PDF DOWNLOAD कशी करावी हे खालील video मध्ये पहा.