एका कुत्र्याची आत्मकथा
मी एक कुत्रा आहे. तुमच्या अगदी ओळखीच्या असणारा मी प्राणी
आहे.
माझा जन्म गावातल्या एका शेतकऱ्याच्या घराच्या मागच्या बाजूला असणाऱ्या झोपडीमध्ये झाला होता. मी
माझ्या आईचा सर्वात लाडका मुलगा होतो. आमच्या आईने खूप प्रेमाने आमचे पालन- पोषण
केले होते. इकडून तिकडून आणलेल्या भाकऱ्याचे तुकडे खाऊन आम्ही मोठे झालो. आसपास ची
लहान लहान मुली मला उचलून घरी घेऊन जायचे आणि मला दुध – बिस्कीट खाऊ घालायचे. मला पोटभर
खाऊ घालायचे मी लहान असतानाच सर्वांचा आवडता बनलो होतो.
![]() |
एका कुत्र्याची आत्मकथा | Eka kutryachi aatmakatha. |
एक दिवस त्या गावामध्ये एक व्यापारी आला होता. अचानक त्याची
नजर माझ्यावर पडली आणि काय काही कळलेच नाही की त्याला माझ्यामध्ये काय विशेषता
दिसली. गावातून परत जात असताना तो मला त्याच्यासोबत घेऊन गेला. सर्वांचा निरोप
घेतानाचे दृश्य मी माझ्या जीवनभर कधीच विसरू शकत नाही. मला दुरावताना पाहू माझी आई
आणि भाऊ बहिणी बैचेन झाले होते. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. माझ्या ही
डोळ्यांमध्ये विरहाचे अश्रू तरळत होते.
त्या व्यापाऱ्याच्या घरामध्ये खूप लहान मुले होती. सारी मुल
माझ्यासोबत खेळू लागली. साऱ्यांकडून मला खूप स्नेह मिळाला. घराच्या मालकिणीने मला
उचलून घेतले आणि माझ्या पाठीवर ती प्रेमाने हात फिरवू लागली. त्या घरामध्ये
सर्वांनी माझे नाव ‘टिपू’ असे ठेवले. चांगल्या प्रकारे जेवण आणि सर्वांकडून
मिळणारे प्रेम! मी साऱ्या घरामध्ये मी मनसोक्त आणि मोकळेपणाने फिरत असायचो. एके
दिवशी मालकाच्या घरामध्ये रात्री चोर घुसले होते. त्यांना बघून मी जोर जोराने
भुंकू लागलो. माझ्या आवाजाने घरातील सगळे जन जागे झाले पहिले तर अंगणामध्ये दागिन्यांची
पेटी पडलेली होती. माझ्या भुंकण्याने घाबरून पकडले जाण्याच्या भीतीने चोरांनी
चोरलेले दागिने आणि इतर समान तिथेच टाकून त्यांनी तेथून पळ काढला होता.
जसजसे दिवस सरू लागले त्याप्रमाणे माझा उत्साह आणि माझे
रंगरूप फिके पडू लागले. मी सतत आजारी पडू लागलो. हळू – हळू मालकाच्या घरामध्ये मी
उपेक्षेचा पात्र बनू लागलो. एक दिवस मालकाच्या मुलाने ‘बुलडॉग’ जातीचा एक नवीन
कुत्रा आणला. मी भुंकून भुंकून खूप विरोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु काठीने
मारून मला घरातून बाहेर काढून टाकले गेले.
आज मी इकडे तिकडे भटकंती करून माझे उरलेले जीवन जगत आहे.
हिवाळ्याच्या थंडीने माझी पार बिकट अवस्था झाली आहे. काय माझा मालक अजून सहा ते एक
वर्षभर मला सांभाळू शकत नव्हता का ? पण त्याच्यामध्ये एवढी दया नव्हती की तो
माझ्या दुखःला समजू शकेल.
निबंध लिहिताना खालील मुद्यांचा अवश्य वापर करा.
[मुद्दे:
प्रस्ताना
जन्म आणि बालपण
मालकाच्या घरातील जीवन
सुखी जीवन
जीवनातील चढ उतार
म्हातारपण आणि तिरस्कार
शेवट.]
हा निबंध तुम्ही खालीलप्रमाणे देखील शोधू शकता
- एका कुत्र्याचे मनोगत
- एका कुत्र्याची आत्मकथा
- कुत्र्याची आत्मकथा
- कुत्र्याची व्यथा
- मराठी निबंध
- Eka kutryache
manogat
- Eka kutrychi
aatmakatha
- Kutryachi aatmakatha
- Kutryachi vyatha
- Kutyache jivan
tyachyach shabdat
- Marathi nibandh