घन कचरा वर्गीकरण व व्यवस्थापन
नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या www.educationalmarathi.com या वेबसाईटवर ९ वी ते १२ वी साठी उपयुक्त असणारे पर्यावरण विषयक व इतर विषयाचे प्रकल्प देत असतो. आज ही आम्ही तुमच्यासाठी असाच एक प्रकल्प घेऊन आलो आहे. ' घन कचरा वर्गीकरण व व्यवस्थापन ' या प्रकल्पाची माहिती आम्ही प्रकल्पाच्या स्वरुपात खाली दिली आहे. तुम्हाला आवडल्यास आम्हाला comment द्वारे नक्की सांगा. चला तर मग सुरु करूयात.
प्रकल्प प्रस्तावना
माणसाच्या रोजच्या जीवनात विविध प्रकारचा घनकचरा निर्माण होतो. त्यामध्ये प्रामुख्याने स्वयंपाक घरात तयार होणारा टाकावू कचरा उपहार गृहामध्ये तयार होणारा कचरा इ. या घन कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत जाणाऱ्या शहरीकरणामुळे आज पर्यावरणाच्या विविध समस्या निर्माण झालेल्या आपल्याला पहावयास मिळतात, त्यामध्ये घन कचऱ्याचे विल्हेवाट ही एक पर्यावरणाच्या दृष्टीने फार मोठी आणि महत्वाची समस्या बनली आहे.
लोकसहभागाच्या माध्यमातून या घनकचऱ्याच्या समस्येवर उपाय शोधून त्याची योग्य ती अंमलबजावणी करणे ही आज काळाची गरज आहे. हे लक्षात घेता शासनाने संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान ही अतिशय परिणामकारक योजना सुरू केली आहे. त्या मध्ये नागरिकांनी आपला सहभाग दर्शवणे गरजेचे आहे. शहरांमधील निर्माण होणारा घनकचरा हा गुंतागुंतीचा व गंभीर प्रश्न बनत चालला आहे. संपूर्ण जगाचा जर आपण विचार केला तर प्रत्येक वर्षाला सुमारे शंभर कोटी टन इतका मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होत असावा असा अंदाज आहे. जगभरात वर्षाला तयार होणारा कचरा हा एका ठिकाणी एकत्र करून रचला तर माऊंट एव्हरेस्ट या पर्वताच्या उंची इतका एक पर्वत पर्वत उभा राहिल. जगामध्ये सर्वाधिक घनकचरा तयार होतो तो अमेरिका या देशामध्ये.
घन कचरा इतरत्र फेकल्याने शहर आणि गावं यांचं सौदर्य लयाला जातच; पण त्यामुळे आरोग्यविषयक अनेक प्रश्न निर्माण होतात. कचऱ्याच्या एकत्रीकरणाच्या जागी माशा, डास, उंदीर, आणि झुरळ यांची मोठ्या प्रमाणवर पैदास होते. घनकचर्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यासाठी अनेक उपाय सुचविले गेले आहेत. शहराच्या विविध भागात तयार होणारा कचरा एकत्रित गोळा करणे, त्याची शहरापासून दूरवर असणार्या ठिकाणी वाहतूक करणे, त्या ठिकाणी तो जाळून टाकणे किंवा कंपोस्ट खतासाठी वापरणे किंवा तसाच टाकून देणे या पद्धतीने व्यवस्था केली जाते.
शहरात तसेच खेडेगावात निर्माण होणार्या कचर्याचा अभ्यास करणे व कचर्याचे योग्य ते व्यवस्थापन व विल्हेवाट कशाप्रकारे करता येईल याचा अभ्यास करणे आज काळाची गरज बनले आहे. कचर्यामुळे अनेक आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होतात. घनकचऱ्याच्या या समस्येला वेळीच रोखले नाही तर भविष्यातील पिढीला फार मोठ्या समस्यांचा सामना करावा लागेल.
आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण ‘घनकचरा वर्गीकरण आणि व्यवस्थापन’ या बाबत सविस्तर माहिती घेणार आहोत.
अनुक्रमणिका
अ.क्र. घटक
१) विषयाचे
महत्व
२) प्रकल्पाची
उद्दिष्टे
३) घनकचरा
संकल्पना
४) घन
कचऱ्याचे स्त्रोत
५) घन कचऱ्याचे
वर्गीकरण/प्रकार
६) घन कचरा
व्यवस्थापन
७) घनकचऱ्याच्या
वाढीवर
नियंत्रण
मिळवण्यासाठी
लोकसहभागातून करता
येण्यासारखे उपाय
८) निरीक्षण
९) विश्लेषण
१०) निष्कर्ष
११) संदर्भ
१२) प्रकल्पाचा
अहवाल
[ मित्रांनो 'घन कचरा वर्गीकरण व व्यवस्थापन' या प्रकल्पाची वरील अनुक्रमानिकेनुसार सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली pdf फाईल डाउनलोड करून घ्या ]
हा प्रकल्प खालील प्रकारे देखील तुम्ही शोधू शकता.
- पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी
- प्रकल्प प्रस्तावना
- घन कचरा वर्गीकरण व व्यवस्थापन
- घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प
धन्यवाद