घरातील एक उपद्रवी कीटक
आपल्याला सर्वत्र आढळणारा एक
कीटक म्हणजे माशी. माशी ही आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते. आपण कोठेही गेलो तरी
माशीही आपल्याला आढळतेच. मला तरी अजून माशी नसलेले ठिकाण कोठेही सापडलेच नाही.
माणसाला त्रास देणाऱ्या कीटकांचा विचार केला तर माझ्या माहितीप्रमाणे सर्वत्र
आढळणाऱ्या माशीचा पहिला क्रमांक लागतो. डास आपल्याला त्रासदायक ठरत असला तरीही
त्यापेक्षा माशीच जास्त माणसाला त्रास देते, असे माझे ठाम मत आहे. आज डासांना पळवून लावण्यासाठी विविध प्रकारची औषधे, अगरबत्ती, स्प्रे बाजारात उपलब्ध असलेले
आपल्याला पाहायला मिळतात. परंतु माश्यांना पळवून लावण्यासाठी असे कोणतेही औषध अथवा
अगरबत्ती उपलब्ध नाही.
![]() |
घरातील एक उपद्रवी कीटक |
माश्या आणि उपद्रव या दोनही
बाबी कायम सोबतच असतात. डासांप्रमाणे माश्या माणसाला चावत जरी नसल्या तरी. डासांचा
काही रोगांशी घट्ट संबध जोडला गेला आहे. तसे अजून माश्यांबाबत झालेले नाही. म्हणून
माश्या माणसाला निरुपद्रवी वाटत असाव्यात. आणि माश्यांना ही गोष्ट समजली असावी.
त्यामुळे माश्या या माणसाला अगदी चिकटायला येतात. माश्यांना दूर पळवून लावण्याचा
आपण कितीही प्रयात्न केला तरीही त्या तात्पुरत्या दूर जातात आणि काही क्षणात परत
येतात. आपण कधी कोणते काम एकाग्रतेने करत असलो किंवा घरात टीव्ही पाहत बसलो असलो
तर आपल्या भोवती माशीचा फेरा सुरूच झाला म्हणून समजा. आपण त्या माशीला कितीही
चतुराईने मारण्याचा प्रयत्न केला, तरी ती आपल्या तावडीत काही सापडत नाही. आणि ती
परत येऊन कधी पाठीवर, मानेवर वा कपाळावर अशा आपल्याला न दिसणाऱ्या जागेवर ठाण
मांडून बसते. मग तिला फक्त हाकलतच राहावे लागते. ती मात्र अगदी चतुराईने आपला जीव
वाचवत असते. मला तर वाटते अशा वेळी ती आपल्यालावर हसत असणार. ती चावत तर नाही; पण
सारखी सुळसुळ करत राहते. त्यामुळे आपले मन एकाग्र होत नाही. आपल्याला कोणत्याही
कामात नीट लक्ष लागत नाही. आपण शांत मानाने करायला घेतलेले काम करू शकत नाही. आपण
पार अस्वस्थ होतो. आणि चिडचिड करायला लागतो.
तसं पाहायला गेलो तर आपण
माशीच्या आकाराशी आपली तुलना केली तर आपण माशीपेक्षा महाकाय राक्षसच! तरीही ती
छोटीशी माशी आपल्याला घाबरून दूर कशी काय जात नाही? पुन्हा पुन्हा आपल्या अंगावर
येऊन बसते तरी कशी? आणि मारायला गेल्यावर प्रत्येक वेळी आपल्या तावडीतून सफाईदारपणे
सुटते तरी कशी ? याचे मला प्रचंड कुतूहल होते. मनात निर्माण झालेले हे कुतूहल मला
काही शांत बसू देत नव्हते मग मी मराठी विश्वकोश उघडला. त्यातील माशीची माहिती
वाचली आणि मी थक्कच झालो. तिच्या सुरक्षितरित्या पळून जाण्याचे जणू रहस्यच मला
उलगडले.
माशीला दोन मोठे टपोरे डोळे
असतात. त्या डोळ्यांत प्रत्येकी चार हजार नेत्रिका असतात. नेत्रिका म्हणजे आपण
कोणतीही सुक्ष्म वस्तू मोठी करून पाहण्यासाठी ज्या सुक्ष्मदर्शकाच्या भिंगाचा वापर
करतो, त्याला नेत्रिका असे म्हणतात. म्हणजे आठ हजार भिंगांमधून माशी आपल्या
भोवतालचा परिसर पाहत असते. माशीला कोणत्याही दिशेने येणाऱ्या संकटाची चाहूल त्वरित
लागते आणि ती क्षणाचाही विलंब न करता तेथून पळ काढते आणि आपला जीव वाचवते.
एके दिवशी सायंकाळी शाळेतून
घरी आल्यावर समोरचे दृश्य पाहून चकितच झालो. एका बसच्या काठावर माश्या ओळीने
गोलाकार बसल्या होत्या. मी गुपचूप तेथून बाजूला झालो आणि माझ्या बाबांकडे असलेले
मोठे बहिर्गोल भिंग घेऊन आलो आणि त्या माश्यांचे त्या भिंगाच्या मदतीने निरीक्षण
करू लागलो.
प्रत्येक माशीला सहा पाय
असल्याचे माझ्या निदर्शनास आले. त्या माश्या अधूनमधून पुढचे दोन पाय वर उचलून त्या
हातासारखे वापरत होत्या. कधी कधी दोन्ही हात एकमेकांवर घासायच्या; तर कधी
चेहऱ्यावरचे पाणी बाजूला करण्यासाठी हात फिरवावा त्याप्रमाणे हात फिरवायच्या. जणू त्यांचा स्वच्छतेचा कार्यक्रमच चालू होता
म्हणायला काही हरकत नाही. मला हसू आले. कुजलेले पदर, गटारे अशा ठिकाणी वास्तव्य
करणाऱ्या या माश्या स्वच्छता करीत होत्या.
या माश्यांच्या पायांवर दाट
केस असतात. या केसांत अक्षरशः कोट्यावधी सूक्ष्मजंतू घर करून राहतात. त्या आपल्या
अन्न पदार्थांवर येऊन बसतात. त्यांच्या पायावर चिकटून आलेले रोगजंतू आपल्या अन्नात
मिसळतात. आपल्याला हगवण, कॉलरा, टायफॉईड यांसारख्या रोगांची लागण होते. आपल्या
देशामध्ये या रोगांमुळे काही हजार माणसे मृत्युमुखी पडतात. केवढा हा मोठा
माश्यांचा उपद्रव!
आज माश्यांना पळवून लावायला बाजारात औषधे उपलब्ध
नसली तरीही त्यांना पळवून लावण्याचा एक उपाय आहे तो म्हणजे स्वच्छता. माश्यांना
घाण अत्यंत प्रिय असते. म्हणून जर आपण घाणच करायची नाही. केवढा चांगला उपाय आहे हा!
निबंध लिहित असताना खाली
दिलेल्या मुद्यांचा अवश्य वापर करा.
[ मुद्दे:
उपद्रव करणाऱ्या कीटकांची ओळख
त्रासाचे स्वरूप
कीटकांविषयी कुतूहल
कीटकांचे स्थूल स्वरूप
कीटकांपासून होणारा त्रास
त्या कीटकांची पैदास
त्या कीटकांच्या निर्मूलनाचा
मार्ग
समारोप. ]
मित्रांनो तुम्ही हा निबंध या
प्रकारे सुद्धा शोधू शकता :
- मराठी निबंध
- घरातील एक उपद्रवी कीटक मराठी
निबंध
- घराती उपद्रवी कीटक माशी
- Marathi nibandh
- Gharatil ek updravi kitak Marathi nibandh
- Gharatil updravi kitak mashi
धन्यवाद