लोकसंख्या वाढ ग्रामीण आणि शहरी प्रकल्प
मित्रांनो आज आपण या लेखाच्या माध्यमातून ९ वी ते १२वी साठी उपयुक्त अशा पर्यावरण प्रकल्पाविषयी माहिती घेणार आहोत. या लेखाच्या माध्यमातून 'लोकसंख्या वाढ ग्रामीण व शहरी या प्रकल्पाविषयी माहिती देण्यात आली आहे. प्रकल्प आवडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा
प्रस्तावना
वाढत जाणाऱ्या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत
गरजा भागवण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा आज मोठ्या प्रमाणवर वापर होऊ लागला. शेती, रस्ते,
राहण्यासाठी जागा अशा विविध कारणांसाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड करण्यात आली. आजही
विविध कारणांसाठी पृथ्वीतलावर उपलब्ध असणार्या वनसंपत्ती चा मोठ्या प्रमाणवर ऱ्हास
होत आहे. लोकसंख्यावाढ या समस्येने एवढे उग्र रूप धारण केले आहे की विविध नैसर्गिक
आपत्तींच्या स्वरूपामध्ये ती आज मानवाच्या जीवावर उठली आहे.
वाढत जाणाऱ्या लोकसंख्येमुळे साऱ्या जगासमोर अजून नवनवीन समस्या या उद्भवत राहतील. आणि अजून नवनवीन समस्या या उद्भवत राहतील. पण ही वाढत
जाणाऱ्या लोकसंखेकडे एखादी समस्या म्हणून न पाहता एका संधीच्या दृष्टीकोनातून
पाहायला हवे. ही प्रचंड वाढलेली लोकसंख्या म्हणजे भारताची वाढलेली ताकदच म्हणावी
लागेल.
आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण
‘लोकसंख्या वाढ ग्रामीण आणि शहरी’ या बाबत सविस्तर माहिती घेणार आहोत.
अ.क्र. घटक
१) विषयाचे महत्व
२) प्रकल्पाची उद्दिष्टे
३) लोकसंख्या वाढ
४) लोकसंख्या वाढीसंदर्भातील वारंवार
वापरल्या जाणाऱ्या संज्ञा
५) लोकसंख्या संक्रमण
६) ग्रामीण आणि शहरी वसाहती
७) वाढत्या लोकसंखेमुळे
शहरी आणि ग्रामीण भागात निर्माण
होणाऱ्या पर्यावरणीय समस्या
८) निरीक्षण
९) विश्लेषण
१०) निष्कर्ष
११) संदर्भ
१२) प्रकल्पाचा
अहवाल
विषयाचे महत्व
निसर्ग चक्राच्या नियमाप्रमाणे पृथ्वीवरील
सर्व सजीवांची लोकसंख्या राहत असते. अन्नसाखळीद्वारे पर्यावरणाचा समतोल
राखण्यासाठी किती प्रमाणावर शाकाहारी प्राणी हवे आहेत तसेच किती प्रमाणात मांसाहारी
प्राणी हवे आहेत तसेच वनसंपत्ती किती प्रमाणवर असावी हे सारे निसर्गाद्वारेच
नियंत्रित होत असते. परंतु माणसाचा आता कोणताही नैसर्गिक शत्रू आज अस्तित्वात नाही
यामुळे मानवाच्या जन्मदरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणीही नाही. परिणामी मानव या प्राण्याची
पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात वाढ होत चाललेली आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर
तसेच मानवाने आज वैद्यकशास्त्रात इतकी प्रगती केली आहे की ज्यामुळे आज मानवाचे
आयुष्यमान वाढून मृत्युदर कमी झाला आहे.
वाढत जाणाऱ्या लोकसंख्येमुळे आज जगासमोर विविध समस्या उभ्या ठाकल्या आहेत आणि यापुढे अजून नवनवीन समस्या या उद्भवत राहतील. या समस्येवर वेळेवर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
म्हणून ‘लोकसंख्या वाढ ग्रामीण व
शहरी’ या विषयाबाबत अधिक माहिती घेणे खूप महत्वाचे आहे. आपण या प्रकल्पाच्या
माध्यमातून याच विषयावर माहिती घेणार आहोत.
[मित्रांनो वरील अनुक्रमानिकेनुसार pdf फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.]