ऑनलाइन शिक्षण काळाची गरज
![]() |
ऑनलाइन शिक्षण काळाची गरज |
ऑनलाइन शिक्षण हे आजच्या काळाची गरज बनले आहे. आजवर माणूस जी
प्रगती साधू शकला आहे ती फक्त आणि फक्त शिक्षणाच्याच जोरावर. शिक्षणामुळेच माणसाला
चांगल्या व वाईट गोष्टींचे ज्ञान होते व माणूस योग्य तो मार्ग निवडून आपल्या
जीवनाची पुढे वाटचाल करीत असतो. शिक्षण हे माणसाला पदोपदी उपयोगी पडत असते आणि ते
माणसाच्या शेवटपर्यत त्याची साथ सोडत नाही.
माणूस ज्या क्षणी जन्मतो तिथपासून ते अगदी त्याच्या जीवनाच्या
शेवटपर्यत त्याचे शिक्षण सुरूच असते. परंतु अधिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्याला
शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षण प्राप्त करण्यासाठी जावे लागते. २०२० या वर्षाला
सुरुवात झाली न झाली तेच जगावर एक मोठे संकट आले ते म्हणजे कोरोना महामारीचे संकट आणि
या संकटाचा सामना करण्यासाठी तेव्हा लॉकडाऊन हा एकाच पर्याय साऱ्या जगासमोर उपलब्ध
होता. त्यामुळे या महामारुपासून वाचण्यासाठी लॉकडाऊन लागू केले गेले. नागरिकांवर
संचारबंदी सारखी बंधने घालण्यात आली, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा,
महाविद्यालये सुद्धा बंद ठेवण्यात आली. अनेक परीक्षांची वेळापत्रके लांबणीवर
ढकलण्यात आली तर काही परीक्षा या अखेर रद्द करणे भाग पडले.
विद्यार्थी घारातच राहू लागले. एकीकडे परीक्षा रद्द झाल्याचा
आनंद तर होताच पण दुसरीकडे विद्यार्थ्यांना व पालकांना त्यांच्या भविष्याची चिंता
सतावू लागली होती. पुढच्या इयत्तेचा अभ्यास आपण कसा करणार? आपली वर्षे तर वाया
जाणार नाहीत ना? अशा प्रकारचे अनेक प्रश्न हे सर्वाना सतावू लागले. आणि या सर्व प्रश्नांवर
समस्यांवर शिक्षणसंस्थांद्वारे एक तोडगा काढण्यात आला तो म्हणजे ऑनलाइन शिक्षण
प्रणालीचा.
अगदी कमी कालावधीतच ऑनलाईन शिक्षण प्रणालीशी बहुतांश
विद्यार्थी जोडले गेलेआनी त्यांचे शिक्षण पुन्हा नव्याने सुरु झाले. हळू हळू
ऑनलाईन शिक्षण प्रणालीद्वारे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी
निर्माण झाली. विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी नव नवे मार्ग खुले झाले. प्रत्येक
विद्यार्थी त्याच्या सवडीनुसार शिक्षण घेऊ लागला. परंतु या ऑनलाईन शिक्षण
व्यवस्थेमध्ये सुद्धा समस्या निर्माण होऊ लागल्या त्या म्हणजे ऑनलाईन शिक्षण
घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या घरात स्मार्ट फोन असणे गरजेचे होते आणि ते ज्या
भागात राहतात त्या ठिकाणी मोबाईल ला नेटवर्क असणे आवश्यक होते. पण परिस्थिती अशी
होती की, काही विद्यार्थ्यांकडे मोबाईल होते पण, त्यांच्या भागात मोबाईल नेटवर्क
चांगले नव्हते. या समस्येवर मत करण्यासठी विद्यार्थी घरापासून दूर जेथे मोबाईल ला
नेटवर्क मिळेल त्या ठिकाणी जावून आपल्या अभ्यास पूर्ण करू लागले.
ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांना एक चांगली सवय
लागली ती म्हणजे स्वयंअध्ययनाची, स्वयंअध्ययन करताना विद्यार्थ्यांना काही प्रश्न
निर्माण झाल्यास त्या प्रश्नाचे उत्तर आपल्या शिक्षकांकडून त्वरित जाणून घेणे हे
ऑनलाईन शिक्षण प्रणालीमुळे आज शक्य होत आहे.
पारंपारिक शिक्षण व्यवस्थेमध्ये मुलांना त्यांच्या शाळा,
महाविद्यालयामध्ये जावून शिक्षण घेणे भाग पडत होते. पण आत्ता मात्र ऑनलाईन
शिक्षणामुळे त्यांच्या जाण्या-येण्याच्या वेळात बचत होऊ लागली. त्यामुळे उरलेला
वेळ विद्यार्थी त्यांच्या कला व छंद जोपासण्यासाठी देऊ लागले आहेत. त्यामुळे
त्यांचा सर्वांगीण विकास घडून येणे शक्य होत आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये
शिक्षकांइतकीच पालकांची भूमिका सुद्धा तेवढ्याच प्रमाणात महत्वाची आहे.
इलेक्ट्रॉनिक साधने लहान मुलांच्या हातात देताना पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे
गरजेचे आहे. आपला पाल्य काय शिकतोय याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मोबाईल, कॉम्पुटर यांतून
बाहेर पडणारा प्रकाश हा बराच काळ मुलांच्या डोळ्यांवर पडत असल्याने त्यांना
दृष्टीदोष होऊ शकतात. त्यामुळे मुलांची काळजी घेण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना
वेळेची योग्य ती विभागणी करून देणे गरजेचे आहे. जेणेकरून संभाव्य धोके टाळता
येतील.
आज ऑनलाईन शिक्षण पद्धत ही फार मोठ्या प्रमाणावर वापरली जावू
लागलीआहे. विद्यार्थ्यांना या शिक्षण प्रणालीमध्ये रुची निर्माण होताना दिसत आहे.
पारंपारिक शिक्षण पद्धत जरी महत्वाची असली तरीही आजच्या या आधुनिक जगाबरोबर
धावताना तसेच संकटांचा सामना करताना ऑनलाईन शिक्षण पद्धत ही खरच काळाची गरज आहे.
मित्रांनो तुम्ही हा निबंध खालील प्रमाणे देखील शोधू शकता.
- ऑनलाईन शिक्षण काळाची गरज
- ऑनलाईन शिक्षण
- Online
shikshan kalachi garaj
- Online
shikshan
धन्यवाद