BUY PROJECT PDF Click Here!

पक्षी बोलू लागले तर... | Pakshi bolu lagale tar....

पक्षी बोलू लागले तर... कल्पनात्मक निबंध जेव्हा पक्षी बोलतील Pkshi bolu lagale tar… Kalpanatmak nibandh Jevha pakshi boltil. Marathi nibadha.
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

पक्षी बोलू लागले तर...



        उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी आणि माझे मित्र काही दिवसांसाठी  मामाच्या गावाला गेलो होतो. मामाची मोठी काजू आणि आंब्यांची बाग असल्याने आम्ही तेथे निसर्गाच्या सानिध्यातच राहायचे पसंत केले. बागेपासून मामाच्या घराचे अंतर तसे जवळच होते. मामाने आम्हाला राहण्यासाठी एका छोट्या झोपडीची व्यवस्था सुद्धा केली होती. शहरातील रोजच्या त्या धकाधकीच्या जीवनपद्धतीपेक्षा फार वेगळाच दिनक्रम होता तेथे. आमच्या शहरातल्या घरी आई सकाळी मी वेळेवर शाळेत पोहचावे म्हणून मला झोपेतून उठवून उठवून पार कंटाळत असे, पण येथे या झोपडीमध्ये भल्या पहाटेच मला जाग येत असे. याचे कारण म्हणजे बागेतील भोवतालची झाडे जणू भल्या पहाटेच जागी झालेली असत. झाडांवर राहणारे पक्षी आकाशात पांढरे फुटू लागले न लागले तोच किलबिलाट करायला सुरुवात करत असत. किती नानाप्रकारचे आवाज पडायचे कानी. मी पक्षांचा किलबिल आवाज आजवर गोष्टींच्या पुस्तकात वाचला होता. पण मामाच्या गावाला मात्र पक्षांचा किलबिलाट प्रत्यक्ष ऐकण्याची मला संधी मिळाली. माझ्या मनात मधूनच एक विचार आला काय बोलत असतील हे पक्षी बरे?


पक्षी बोलू लागले तर... | Pakshi bolu lagale tar....

पक्षी बोलू लागले तर... | Pakshi bolu lagale tar....



        आज आपल्याला माणसे विविध देशांत बोलल्या जाणाऱ्या भाषा शिकतात, पण अजूनही त्यांना या पक्षांची भाषा काही अवगत झाली नाही. जर खरंच पक्षी बोलू लागले तर... ! खर तर पक्षी हे आपापसांत बोलतच असतात, परंतु आपल्याला ते काही समजत नाही. वसंत ऋतुमध्ये कोकीळ पक्षी आपल्या कोकिळेला प्रेमाने साद घालत असतो. तेच त्याचे ‘कुहू कुहू’ बोलणे जंगलातून जाणाऱ्या हौशी लोकांनी लिहून ठेवले आहे. वेगवेगळ्या प्रसंगी पक्षी सुद्धा वेगवेगळे आवाज काढत असतात. कधी ते भीतीपोटी ओरडत असतात, तर कधी ते आपल्या  सख्या-सोबत्यांना संकटाची जाणीव करून देत असतात, तर कधी आनंद व्यक्त करत मधुर आवाजातली गाणी म्हणत असतात. प्रत्येक वेळचे त्यांचे आवाज वेगवेगळे म्हणजे त्यांच्या भाषाही वेगवेगळ्या असतात.


        असे हे पक्षी जर मानवाशी बोलू लागले तर..  ते आपल्याला धन्यवाद देतील की शाप देतील? माणसाने स्वतःच्या स्वार्थापोटी या पक्षांचे जीवन नकोसे केले आहे. बेसुमार जंगलतोड केली. सुरुवातील भारतभूमीवर ३६ टक्के वनांचे अच्छादन होते त्यापैकी आत्ता फक्त नऊ टक्के इतकीच वनसंपदा शिल्लक राहिली आहे. एकदा का जंगले नष्ट झाली की, पक्षांचे राहणीमान धोक्यात येते. मग हे पक्षी आपली घराती कोठे बांधणार? एखाद्या चिमणीने माणसाच्या घराच्या एका कोपऱ्यात घरटे बांधून राहण्याचा प्रयत्न केला, तर माणूस तिचे घरटे मोडून तोडून टाकतो. मात्र तोच माणूस सुगरणीचे घरटे झाडावरून काढून आणून आपल्या घराच्या व्हरांड्यात शोभेसाठी लटकवून ठेवतो. आपल्या जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी माणूस काही पक्षांचे लुसलुशीत मांस खायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. त्यांच्या अंड्यांवर त्याची न्याहारी चालते. पक्षी जर खरेच बोलू लागले तर त्यांची ही व्यथा नक्कीच माणसांसमोर मांडतील.


        खरे तर, हे जग, हा निसर्ग विधात्याने सर्वांसाठी निर्मिला आहे; परंतु माणूस आज स्वतःलाच या सृष्टीचा राजा समजायला लागलाय. जणू हे सारी सृष्टी ईश्वराने त्याच्यासाठीच निर्माण केली आहे. मग तो या पशु पक्षांच्या जीवावर उठतो. त्यांची शिकार करतो. सुंदर सुंदर, पक्षांना  पकडून पिंजऱ्यात बंद करून ठेवतो. मोरांच्या सुंदर पिसांसाठी त्यांची हत्या करतो, खरे तर मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी ! पक्षांसाठी निर्माण केलेली अभयारण्ये माणसांचे पिकनिक ची ठिकाणे बनून जातात. मग तेथील शांतात, त्यांचे वास्तव्य ही धोक्यात येते. पक्षी जर बोलू लागले, तर हे सर्व ते मानवाला ऐकवल्याशिवाय राहणार नाहीत.


        माणसाच्या बालपणापासूनचे चिऊ-काऊ हे सवंगडी, पण आज ‘इलेक्ट्रॉनिक’ मोबाईलच्या रुबाबात वावरणारा माणूस हे विसरतो की, आपण आपल्या या सख्या-सोबत्यांचे जीवन धोक्यात आणले आहे. पक्षांच्या कित्येक जाती या आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे मला तर असे वाटते की हे पक्षी लवकरच संघटीत होऊन या दृष्ट माणसाविरुद्ध आवाज उठवतील यात काही शंका नाही.


 

मित्रांनो निबंध लिहिताना खाली दिलेल्या मुद्यांचा अवश्य समावेश करा.


[मुद्दे:

निसर्गाच्या सानिध्यात पहाटेच्या वेळी पक्षांचे अस्तित्व जाणवते.

माणसांना अनेक भाषा समजतात

पण पक्षांची भाषा माणसाला अजूनही अवगत करून घेता आली नाही

पक्षी वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळे आवाज काढतात

कदाचित ती त्यांची भाषा असावी

पक्षांच्या तक्रारी

पक्ष्यांचे जगणे माणसांमुळे अवघड

वृक्षतोड

घरटी उध्वस्त करणे

मांस व अंडी यांवर डल्ला

पिसांसाठी हत्या

शिकारीचा शौक

प्रदूषण

पक्ष्यांच्या अभयारण्यात सहली काढून तेथील शांतात भंग करणे

समारोप]

 

मित्रांनो हा निबंध तुम्ही या प्रकारे सुद्धा शोधू शकता.


  • पक्षी बोलू लागले तर...
  • कल्पनात्मक निबंध
  • जेव्हा पक्षी बोलतील
  • Pkshi bolu lagale tar…
  • Kalpanatmak nibandh
  • Jevha pakshi boltil.
  • Marathi nibadha.

 

 

धन्यवाद.



Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.