आकाश बोलू लागले तर...
![]() |
आकाश बोलू लागले तर.... | Aakash bolu lagale tr nibandh marathi |
पावसाला सुरुवात झाली होती. विजा चमकायला लागल्या
आणि धगसुद्धा गडगडू लागले होते. बाजूच्या घरातली एक लहान मुलगा आईला बिलगला आणि
प्रश्न विचारायला लागला, “अग
आई आज आकाश का एवढ्या जोरात ओरडत आहे?”
त्याचे ते बोलणे ऐकून माझ्या डोक्यात कल्पनाचक्रे जोरात फिरू लागली. खरंच जर आकाश
बोलायला लागले तर... , तर ते काय बोलेल बर?
आणि काय योगायोग बघा! या कल्पनाविश्वातून बाहेर
पडलो ही नव्हतो तोच आकाश माझ्याशी संवाद साधू लागले मला म्हणाले फक्त तू एकटाच
नाहीस. तर सर्वांनाच लहानपणापासून माझे आकर्षण असते. कारण आईने सांगितलेल्या
गोष्टींतले चिऊ-काऊ पाहण्यासाठी ते वर पाहतात, तेव्हा त्यांची नजर माझ्यावर पडते
आणि असे खूप वेळा होत असल्याने त्यांची आणि माझी घट्ट मैत्री होते. रात्रीच्या
वेळी माझ्याकडे पाहतात तेव्हा त्यांना सर्वांचाच लाडका चांदोमामा आणि लुकलुकणाऱ्या
चांदण्या दिसतात. तेव्हा तर ते लहान बाळ आनंदाने खेळू बागडू लागते. थोडेसे मोठे
झाल्यावर त्याची ओळख. सूर्यनारायणाशी होते. मग त्याला वाटू लागते की सूर्याचे,
चंद्राचे आई चांदण्यांचे घर म्हणजे आकाश .
“या
पृथ्वीवरची माणसे मला खूपच आवडतात,”
आकाश पुढे बोलत होते, “माझी
निर्मिती कशी झाली? मी कशाचा बनलेला आहे याबाबत जाणून घेण्याची माणसाला मोठी इच्छा
असते. मी धारण केलेली वेगवेगळी रूपे माणसाला आवडतात. कधी मी पांढराशुभ्र असतो तर
कधी काळा आणि निळा असतो. कधी कधी मी ढगांनी व्यापलेला असतो तर कधी अगदी निरभ्र
असतो. मला तर तुम्हा माणसांची फारच गंमत वाटते.
शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक यांनी माझ्या रूपाबाबत विविध वर्णने केली आहेत; तरीही
सामान्य माणूस मला देवबाप्पा चे घरच संबोधतात. जेव्हा ते परमेश्वराची प्रार्थना
करतात, तेव्हा ते माझ्याकडेच बघतात.
सामान्य माणसाला माझी विशालता मोहून
टाकते. एखादा माणूस मोठ्या मनाचा आहे हे सांगत असताना ते , त्याचे मन आकाशासारखे विशाल आहे असे वर्णन करतो. जर कोणावर
खूप मोठे संकट आले तर लोक म्हणतात की त्याच्यावर आभाळच कोसळले आहे. माझी विशाल
व्यापकता पाहून लोकांना विश्वकुटुंबाची कल्पना सुचते. माणूस हा फारच बुद्धिमान
माणूस आहे. आजकाल त्याने लावलेल्या विविध उपकरणांच्या शोधामुळे तो माझ्याजवळ येतो.
अंतराळात स्वतःचे वास्तव्य कसे निर्माण करता येईल याचे मनसुबे रचतो. हे सर्व पृथ्वी वासी मला खूप आवडतात , म्हणून जे काही वाफेच्या रूपाने माझ्याकडे येते ते मी
पाण्याच्या रूपामध्ये त्यांना परत करतो.
सूर्यापासून येणाऱ्या अतिनील हानिकारक किरणांपासून मी माणसाचे रक्षण करतो. पण आत्ता यापुढे हे काम करणे मला कठीण होऊन बसले आहे. पृथ्वीवरच्या प्रदूषणामुळे आज मला छिद्र पडू लागली आहेत. त्यांतून सूर्याची हानिकारक किरणे पृथ्वीवर पोहचणार नाहीत ना याची मला काळजी वाटते. खरे तर हे संकट निसर्गाने आणले नाही तर माणसाने स्वतःच्या वाईट कृत्यातूनच हे संकट स्वतःवर ओढवून घेतले आहे.
या संकटाचा परिणाम माणसालाच नव्हे तर
साऱ्या सजीवसृष्टीला भोगावे लागणार आहेत. या पृथ्वीवर येणाऱ्या नव्या संकटांपासून
तुम्हाला सावध करण्यासाठी मी आज तुझ्याशी बोलत आहे.... एवढेच सांगून आकाश गप्प
झाले.
खलील मुद्यांचा निबंध लिहिताना वापर
करा.
[मुद्दे:
आकाशातील गडगडाट
लहान मुले घाबरतात
परंतु चांदण्या, सूर्य , चंद्र , पाखरे यांचे आकर्षण
आंबर, गगन , नभ
पंचमभूतांपैकी एक
आकाशात देवाचे घर
आकाश विशाल आणि विश्वव्यापक
आकाशाकडून पावसाचे दान
ओझोन वायूचे संरक्षक कवच भंग
पावण्याचे भय
संदेश
शेवट]
हा निबंध तुम्ही खलीलप्रमाणे देखील
शोधू शकता.