औपचारिक पत्रलेखन
(१)
- तुमच्या शाळेसमोरच्या रस्त्यावरील कचराकुंडीच्या
दुर्गंधीचा त्रास होतो; म्हणून ती हटविण्यासाठी नगरपालिकेच्या आरोग्य खात्याला
विद्यार्थीप्रमुख या नात्याने पत्र लिहा.
![]() |
औपचारिक पत्रलेखन | aupacharik patralekhan marathi. |
अ.ब.क.
विद्यार्थी प्रमुख,
आदर्श विद्यालय,
समता नगर,
रत्नागिरी – ४१५ ६१२
दि. २० सप्टेंबर
२०२०
प्रति,
मा. आरोग्य अधिकारी,
रत्नागिरी नगरपालिका,
रत्नागिरी.
विषय: शाळेसमोर
असलेली कचराकुंडी हटविण्यासंबंधी विनंती.
महोदय,
आमची शाळा समता नगर
विभागात आहे. या शाळेमध्ये दीड हजारांहून जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
शाळेच्या
प्रवेशद्वारा समोरच आपल्या आरोग्य खात्यातर्फे कचराकुंडी बसविण्यात आली आहे.
परिसरातील लॉक आपल्या घरातील कचरा या कचराकुंडीत टाकतात. खाद्यपदार्थ आणि फळे
विकणारे फेरीवाले आपल्या हातगाडीवर तयार होणारा कचरा देखील याच ठिकाणी टाकतात.
शिवाय परिसरातील उपहारगृहातील अन्नही याच ठिकाणी फेकले जाते.
बहुतांश मंडळी ही
कचरा टाकत असताना योग्य ती काळजी घेत नाहीत. त्यामुळे बराचसा कचरा हा
कचराकुंडीच्या बाहेर आजूबाजूला पडतो. कचरा उचलणारी गाडी सुद्धा वेळेवर कचरा घेऊन
जात नाही. त्यामुळे हा कचरा कुजून सगळीकडे दुर्गंधी पसरलेली आहे. या दुर्गंधीमुळे
वर्गात अभ्यास करताना लक्ष लागत नाही. शिवाय या दुर्गंधीमुळे शाळेतील
विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
तेव्हा कृपया आपण यात
विशेष लक्ष घालावे आणि कचराकुंडीतील कचरा वेळेवर साफ होईल याकडे लक्ष द्यावे. शक्य
असल्यास या कचराकुंडीची जागा बदलावी.
तसदीबद्दल क्षमस्व.
आपला विश्वासू.
अ.ब.क.
✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉
(२)
- महाविद्यालय सोडण्याचा दाखला
तुम्हाला हवा आहे, त्यासाठी तुमचा महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र लिहा.
अ.ब.क 825
शारदा सदन,
रेल्वे
स्टेशन रोड,
रत्नागिरी - 415 612
दिनांक: 3 जुलै 2020
प्रति,
माननीय प्राचार्य,
शाहू विद्या मंदिर,
रत्नागिरी.
विषय:
महाविद्यालय सोडल्या बाबतचा दाखला मिळण्याबाबत.
महोदय,
सादर
नमस्कार. मी आपल्या महाविद्यालयाचा जून 2017 पासून विद्यार्थी आहे फेब्रुवारी 2019 मध्ये मी बारावीची परीक्षा उत्तम प्रकारे उत्तीर्ण होऊन मी विज्ञान
शाखेतील माझे शिक्षण पूर्ण केले. 1 ऑगस्ट २०२० पासून रत्नागिरी मधील तंत्र विद्यालयाची पदविका अभ्यासक्रमाची
प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.
महाविद्यालयाचा
दाखला मिळाल्यावरच मी तंत्र विद्यालयात प्रवेश देऊ शकेन तरी मला महाविद्यालय
सोडल्याचा दाखला लवकर मिळावा ही विनंती.
आपला विश्वासू
अ.ब.क
✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉
हे सुद्धा वाचा.👇