धर्म आणि राजकारण
![]() |
धर्म आणि राजकारण | Dharm aani rajkaran |
धर्म आणि राजकारण या दोनही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. धर्म या गोष्टीचा विचार केला तर ती पूर्णतः वैयक्तिक आहे. एखाद्या व्यक्तीचा आत्मिक आणि मानसिक विकास घडवून आणणे हे धर्माचे काम आहे. धर्माचे काम हे अध्यात्मिक स्वरूपाचे आहे . 'यत् धारयति तत् धर्म ' धर्म म्हणजे काय तर जो समाजाची धारणा करतो तो धर्म या प्रकारे धर्माची व्याख्या केली जाते. राजकारणाचा संबंध येतो तो माणसे आणि भूगोला शी .एखाद्या विशिष्ट ठिकाणी राहणाऱ्या माणसांची भाषा, आर्तव्यवस्था , उत्पादन व्यवस्था, संस्कृती संरक्षण व्यवस्था आणि न्यायव्यवस्था या साऱ्यांचाच राजकारणामध्ये समावेश होतो.
गतकाळात धर्म आणि राजकारण हे एकच होते. धर्मानेच माणसाचे सारे जीवन व्यापले होते. त्यामुळे धर्म आणि राजकारण यांमध्ये संघर्ष होण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. औद्योगिक क्रांती झाली आणि सारे चित्र पालटले, विज्ञानाचा वेगाने प्रसार होऊ लागला . यातूनच विविध मूल्यांचा उदय झाला जसे की, 'स्वातंत्र्य' , 'समता' आणि 'बंधुत्व' . कालांतराने लोकशाही शासन व्यवस्था ही कल्पना पुढे आली .व्यक्तीस्वातंत्र्य हा मूलभूत हक्क आहे हे तत्व रूढ व्हायला लागले .या साऱ्यांमुळे धर्म आणि राजकारण हे वेगवेगळे बनले.
जगातील बहुतांश देशांमध्ये लोकशाही राज्यपद्धती अस्तित्वात आली. अर्थातच लोकशाही राज्यपद्धती मध्ये कायदे करणे ही गोष्ट लोकांच्या हाती आली. लोकशाहीमुळे नागरिकांना विविध प्रकारचे स्वातंत्र्य प्राप्त झाले. त्यामध्ये धर्मस्वातंत्र्याचा देखील समावेश होता . प्रत्येक माणसाला स्वतःच्या इच्छेनुसार धर्म निवडण्याचा हक्क आहे. आणि लोकशाही व्यवस्थेतील या तत्वाचे सर्वानीच पालन केले पाहिजे हा विचार प्रस्थापित केला गेला.
या साऱ्या संकल्पना रूढ झाल्या असल्या तरीही प्रत्यक्ष व्यवहार करताना ,यात मात्र हा समजूतदार पणा आढळतोच असा नाही. दैनंदिन जीवनात सुद्धा खूप वेळ धर्माच्या नावाखाली राजकीय दाबावाचे गट तयार करून लोकांना एकमेकांविरुद्ध भडकावले जाते. यातूनच मग जातीय दंगलीचा उदय होतो. अपरिमित जीवित व वित्तहानी होते. या प्रकारे धर्मामुळे दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण होत राहतात.
राजकारण हे प्रत्यक्ष जीवनाशी संबंधित आहे तर धर्म ही भावनिक गोष्ट आहे . राजकारणा मध्ये ऐहिक जीवनातील सुखसोई कश्या निर्मा केल्या जातील याचा विचार केला जातो. तर काही महत्त्वाचे निर्णय गुंतागुंतीचे प्रश्न सोडवणे, हे काम धर्माचा पडगा असलेला एखादा व्यक्ती काटेकोरपणे पार पाडू शकेल असे नाही. एखाद्या व्यक्तीला अधिकार देत असताना किंवा एखाद्या व्यक्तीला न्याय देत असताना , त्या व्यक्तीच्या धर्माचा नाही तर तिच्या नागरिकत्वाचा विचार करावा लागतो. राजकारणामध्ये मुत्सद्देगिरी मागत्वाची आहे आणि ती धर्मनिष्ठ माणसाला जमणे कठीणच आहे.
धर्माच्या शिकवणुकीमुळे व्यक्तीच्या अंगात बाणलेले नैतिक गुण चांगल्या राजकारणाला पोषक ठरतीलही ; परंतु 'धर्मकारण' आणि 'राजकारण' या गोष्टी स्वतंत्र असणेच इष्ट होईल. धर्म आणि राजकारण यांच्यात सुयोग्य असा समनव्यय साधायला हवा . पण धर्माची आणि राजकारणाची सांगड घालणे हे केव्हाही अयोग्य आहे.
मित्रांनो हा निबंध लिहिताना खाली दिलेल्या मुद्यांचा अवश्य वापर करा.
[मुद्दे:
धर्म व राजकारण भिन्न
व्यक्तीचा आत्मिक विकास घडवून आणणे हे धर्माचे कार्य
ऐहीक उन्नती साधणे हे राजकारणाचे क्षेत्र
पूर्वी धर्म व राजकारण एकच
विज्ञानामुळे ऐहीक जीवन धर्मापासून वेगळे
म्हणूनच धर्म आणि राजकारण भिन्न
स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वांचा प्रसार
राजकीय स्वार्थ साधण्यासाठी धर्माच्या नावाने हिंसाचार
धर्मनिष्ठ माणूस सामाजिक प्रश्नांची सोडवणूक नीट करू शकणार नाही
धर्माच्या शिकवणूकीमुळे प्राप्त झालेले नैतिक गुण चांगल्या राजकारणाला पोषक
पण राजकारणात धर्म कधीही नको]
हा निबंध खलील प्रमाणे देखील शोधू शकता
धर्म आणि राजकारण मराठी निबंध
धर्म आणि राजकारण वैचारिक निबंध
वैचारिक निबंध
मराठी निबंध pdf
11वी 12 वी निबंध
Dharm aani rajkarn marathi nibandh
Dharm aani rajkarn vaicharik nibandh
Vaicharik nibandh
Marathi nibandh
11vi 12 vi niandh
धन्यवाद