BUY PROJECT PDF Click Here!

जल प्रदूषण समस्येचे गांभीर्य अभ्यासणे व जलसुरक्षा '| jalpradushan samsyeche gambhirya abhasane v jalsuraksha project

पर्यावरण प्रकल्प ११ वी १२वी पर्यावरण प्रकल्प जलप्रदूषण प्रकल्प शालेय प्रकल्प जल प्रदूषण समस्येचे गांभीर्य अभ्यासाने व जलसुरक्षा paryavaran prakalp
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

जल प्रदूषण समस्येचे गांभीर्य अभ्यासणे 

व  जलसुरक्षा 

 

 मित्रांनो 'आज आपण जल प्रदूषण समस्येचे गांभीर्य अभ्यासाने व जलसुरक्षा ' या विषयावरील सविस्तर माहिती पाहणार आहोत. याचा उपयोग शालेय तसेच  महाविद्यालयीन विद्यार्थांना पर्यावरण विषयाचा प्रकल्प करताना होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प कसा केला आहे हे समजून घेऊन त्या प्रकारे प्रकल्प कार्य पूर्ण करायचे आहे. वरील प्रकल्प विषयाची माहिती प्रकल्पाच्या स्वरूपात आपल्यासमोर दिली आहे.

(पर्यावरण प्रकल्प  ११वी व १२वी)


जल प्रदूषण समस्येचे गांभीर्य अभ्यासाने व जलसुरक्षा

जल प्रदूषण समस्येचे गांभीर्य अभ्यासाने व जलसुरक्षा 



प्रस्तावना


        आज आपण २१ व्या शतकात जगत आहोत.आज आपल्यासमोर अनेक मोठ मोठ्या समस्या आहेत, त्यापैकी एक समस्या म्हणजे दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत जाणाऱ्या लोकसंख्येला पिण्यासाठी स्वच्छ आणि सुरक्षित पाणी उपलब्ध करून देणे. आज विकसनशील देशातील देशांतील लोकांना पाण्याच्या समस्येला मोठ्या प्राणावर सामोरे जावे लगत आहे. हवामानात झालेले बदल आणि लोकसंख्या वाढीपासून ते अगदी शहरांतील बिघडलेल्या अत्यावश्यक सुविधांपर्यंत अशा अनेक समस्यांचा जगातील अनेक शहरांना सामना करावा लागत आहे.


        भविष्यात सर्वांना त्यांच्या गरजांनुसार पायाभूत सुविधा पुरविणे तसेच पाण्याचे योग ते व्यवस्थापन करणे हे कठीण होत जाणार आहे. आज पाण्याच्या व्यवस्थापनाच्या नवनवीन पद्धतींचा अवलंब करणे गरजेचे आहे. विकसनशील देशांमधील वाढत जाणारी शहरे तसेच खेडेगावातील वस्त्या यांकडे पाण्याच्या व्यवस्थापनावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.


        दिवसेंदिवस वाढत जाणारे औद्योगिकीकरण , शहरीकरण तसेच अनेक शेतीची कामे या सर्व प्रक्रियांमुळे आज मोठ्या प्रमाणवर कळत नकळत आपल्याकडून नद्या , तळी तसेच समुद्र मोठ्या प्रदूषित होताना आपल्याला दिसत आहेत. जर हे असेच सुरु राहिले तर या सृष्टीचा अंत होण्यास जास्त काळ लागणार नाही. याचाच एक परिणाम आपल्याला दिसू लागला आहे. पृथ्वी वरील अनेक प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या जाती वेगाने लुप्त होत चालल्या आहेत.


        आज आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून जल प्रदूषण समस्सेचे गांभीर्य अभ्यासणे व जलसुरक्षा या विषयाबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत.

 

अनुक्रमणिका 

अ.क्र.

घटक

पान नं.

१)

विषयाचे महत्व

 

२)

प्रकल्पाची उद्दिष्टे

 

३)

पाणी टंचाई

 

४)

पाण्याचे प्रदूषण

 

५)

पाण्याच्या प्रदूषणास कारणीभूत ठरणारे घटक

 

६)

 जलप्रदूषणामुळे होणारे परिणाम

 

७)

जलप्रदूष थांबवण्यासाठी उपाय-योजना  

 

८)

जलसुरक्षा अभियान

 

९)

निरीक्षण

 

१०)

निष्कर्ष

 

११)

संदर्भ

 

 


विषयाचे महत्व


            पृथ्वीवरील सर्वात महत्वाचे आणि मौल्यवान संसाधन कोणते असेल तर ते पाणी आहे. आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्येक कामात पाण्याची गरज भासते . एवढेच नाही तर शेतीसाठी ,सिंचनासाठी, उत्पादन करणाऱ्या मोठ मोठ्या कारखान्यांमध्ये, वीजनिर्मिती केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. ही गरज भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भूजलाचा उपसा केला जातो. त्यामुळे आज भूजलाची पातळी घटत चालली आहे. आज विविध प्रक्रिया केलेले दुषित पाणी आपण जसेच्या तसे चांगल्या जलस्त्रोतांमध्ये सोडत आहोत त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे प्रदूषण होत आहे. पाण्याच्या प्रदूषणाची ही समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत चालली आहे. जर हे असेच चालत राहिले तर येणाऱ्या भविष्यात मानवाला मोठ्या प्रमावर पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागणार आहे. जर हे सारे थांबवायचे असेल तर आत्ताच योग्य त्या उपाययोजना करून पाण्याचे प्रदूषण कमी करणे गरजेचे आहे. त्यासाठी जल प्रदूषण समस्येचे गांभीर्य अभ्यासणे गरजेचे आहे.

 


प्रकल्पाची उद्दिष्टे


  • पाण्याच्या प्रदूषिकारणाबाबत अधिक माहिती जाणून घेणे.
  • पाण्याचे महत्व समजून घेणे.
  • पाण्याचे प्रदूषणास कारणीभूत स्त्रोतांचा अभ्यास करणे.
  • पाण्याच्या प्रदूषणाने होणाऱ्या घातक परिणामांचा अभ्यास करणे.
  • जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापन पद्धतींचा अभ्यास करणे.
  • जलसुरक्षा अभियानाबाबत माहिती मिळविणे.
  • जलस्त्रोतांच्या प्रदूषणाबाबत इतरांना अधिक माहिती मिळवून देणे आणि योग्य ती काळजी घेण्यास भाग पाडणे. 



पाणी टंचाई


        सर्व सजीवांना आपले जीवन जगण्यासाठी पाणी हे अतिशय महत्वाचे आहे. आजची परिस्थिती पहिली तर कित्येक राज्यांमध्ये जानेवारी महिना सुरु झाला न झाला तोच पाण्याच्या टंकर नी पाणी पुरवावे लागते. एका सर्वेक्षाणा नुसार असे लक्षात आले की २०२५ पर्यंत भारतासह जगातील ५० पेक्षा जास्त देशांना या पाणी टंचाई च्या संकटाला सामोरे जावे लागेल.


        भारतामध्ये मान्सून च्या पावसाद्वारे पाणी उपलब्ध होत असते. भारतातील पावसाची सरासरी ही ११७ सेमी आहे तर महाराष्ट्रातील पावसाची सरासरी ही १०१ सेमी इतकी आहे. कोंकण भागात पाण्याची उपलब्धता हिये ३०० सेमी पेक्षाही जास्त आढळते, तर दुसरीकडे सांगली, सातारा, सोलापूर, मराठवाडा इ. पूर्वेला असणाऱ्या भागांत पावसाची सरासरी खूप कमी म्हणजे ५० सेमी इतकी आहे. अंबोली आणि गडचिरोली या भागांत पावसाच्या दिवसांत सर्वात जास्त प्रमाणात पाऊस पडत असला तरीही तेथे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असते. पर्वतांच्या तीव्र उतारामुळे व पाणी साठवून ठेवण्यासाठी पुरेशा सोई- सुविधा नसल्या कारणाने भूपृष्ठावरून पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जाते. त्यामुळे या भागांत उन्हाळ्याच्या दिवसात  पण्याची मोठ्या प्रमाणवर टंचाई जाणवते.

 


पाण्याचे प्रदूषण

 

·  पाण्याची गुणवत्ता:

        पाण्याची शुद्धता म्हणजेच पाण्याची गुणवत्ता किंवा अनावश्यक घटकांशिवाय असलेले पाणी. पाणी हे अनावश्यक घटत पाण्यात मिसळल्याने दुषित होते. जसे की सुक्षजीव, औद्योगिक कचरा, रसायने यांसारख्या घटकांमुळे पाण्याची गुणवत्ता खालावते आणि हे पाणी पिण्यासाठी अयोग्य बनते. ज्या वेळी कारखान्यातून बाहेर पडणारे दुषित पाणी, किंवा गटाराचे दुषित पाणी चांगल्या पाण्याच्या स्त्रोतामध्ये सोडले जाते तेव्हा अनावश्यक असणारे घटक पाण्यात विरघळतात, तर काही पदार्थ पाण्यावर तसेच तरंगत राहतात. तेव्हा पाण्याचे दुषीती करण होऊन त्याचा जलसंस्थेवर वाईट परिणाम होतो.

        जलप्रदूषणाची व्याख्या खालील प्रमाणे केली जाऊ शकते:

पाण्याचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म कोणत्याही प्रकारे बदलणे ज्यायोगे त्याच्या वापरास अडथळा निर्माण होईल’

 

        सर्वसाधारणपणे पाण्यात वायू क्षार व इतर घटत हे आधीपासूनच काही प्रमाणात मिसळलेले असतात. परंतु ते अल्प प्रमाणत असल्याने पाणी पिण्यायोग्य असते. पण जेव्हा हे अनावश्यक असणारे घटकांचे प्रमाण अतिशय वाढते तेव्हा, पाण्याला दुर्गंधी येऊ लागते, पाणी गढूळ होऊ लागते, पाण्यात विविध प्रकारच्या जलचर वनस्पती वाढून पाण्याची गुणवत्ता खालावते. आणि त्या स्त्रोतातील ते पाणी मानवाच्या दैनंदिन उपयोगासाठी अयोग्य ठरते.

 

पाण्याच्या प्रदूषणास कारणीभूत ठरणारे घटक

 

  • शेतीतून बाहेर पडणारा कचरा:

                            आज कमी जागेत मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी सर्रास विविध प्रकारची रासायनिक खते वापरतात. या विषारी खतांचा आणि कीटकनाशकांचा मानव, प्राणी आणि त्याचबरोबर पर्यावरणावरदेखील मोठ्या प्रमाणवर हानिकारक परिणाम होतो. मोठ्या प्रमाणात वापरलेली खते ही पावसाच्या पाण्याद्वारे भूगर्भात झिरपतात आणि परिणामी भूजल स्त्रोत दुषित होतात. आजच्या आधुनिक शेतीमध्ये कीडनाशके, कीटक नाशके तसेच तण नाशके यांचा अतिवापर शेतीसाठी केला जातो, परंतु हे सर्व पाण्याबरोबर वाहत जाऊन आसपासच्या जाल्स्त्रोतांत मिसळले जातात. आणि ते पाण्याच्या स्त्रोताचे प्रदूषण करण्यास कारणीभूत ठरतात.

 

पर्यावरण प्रकल्प ११ वी १२वी  पर्यावरण प्रकल्प  जलप्रदूषण प्रकल्प  शालेय प्रकल्प  जल प्रदूषण समस्येचे गांभीर्य अभ्यासाने व जलसुरक्षा paryavaran prakalp 1vi 12vi  paryavarn prakalp  jalpradushan prakal
photo credit: paryavarn shikshan v jalsuraksha book 12th 

  • घरगुती कचरा ( सांडपाणी) :

                                घरगुती कचरा या प्रकारामध्ये मलमूत्र , अन्न कचरा, कागद, कपडे धुण्याच्या विविध पावडरी यांसारख्या घटकांचा समावेश होतो. टाकावू पदार्थांची योग्य ती विल्हेवाट न लावल्याने ती सामग्री शेवटी तलाव, ओढे, नद्या यांसारख्या जलस्त्रोतांमध्ये मिसळली जाते. आणि त्यामुळे जलप्रदूषण होते.

 

पर्यावरण प्रकल्प ११ वी १२वी  पर्यावरण प्रकल्प  जलप्रदूषण प्रकल्प  शालेय प्रकल्प  जल प्रदूषण समस्येचे गांभीर्य अभ्यासाने व जलसुरक्षा paryavaran prakalp 1vi 12vi  paryavarn prakalp  jalpradushan prakal
photo credit: paryavarn shikshan v jalsuraksha book 12th 



  • औष्णिक प्रदूषण:

                            अणुउर्जा प्रकल्प तसेच औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये तापमान कमी करण्याच्या उद्देशाने थंड पाण्याचा वापर केला जातो. परतू हे थंड पाणी विविध प्रक्रियांतून जात असल्याने त्याचेही तापमान मोठ्या प्रमाणवर वाढते. असे हे उष्ण पाणी प्रकल्पाच्या जवळ असणाऱ्या तलावात किंवा इतर जल्स्त्रोतात सोडले जाते. तेव्हा औष्णिक प्रदूषण होते. अशा या औष्णिक प्रदूषणाचा जलचरांवर फार हानिकारक परिणाम होतो.

 

पर्यावरण प्रकल्प ११ वी १२वी  पर्यावरण प्रकल्प  जलप्रदूषण प्रकल्प  शालेय प्रकल्प  जल प्रदूषण समस्येचे गांभीर्य अभ्यासाने व जलसुरक्षा paryavaran prakalp 1vi 12vi  paryavarn prakalp  jalpradushan prakal
photo credit: paryavarn shikshan v jalsuraksha book 12th


  • औद्योगिक कचरा:

                            कागद उद्योग, पोलाद उद्योग यांसारख्या उद्योगांमध्ये उत्पादन प्रक्रियांसाठी मोठ्या प्रमाणवर पाण्याची गरज भासते. म्हणूनच असे मोठ मोठे उद्योग हे नद्यांच्या काठावर असलेले आपल्याला पाहायला मिळतात.  वस्त्रोद्योग असो वा चामडे, औषधे निर्मा करणारा उद्योग असो असे अनेक विविध प्रकारचे उद्योग ज्यांमध्ये पाण्याची प्रचंड गरज भासते असे उद्योग नद्यांच्या काठावर वसवले जातात आणि या कारखान्यातून बाहेर पडणारे प्रक्रिया न केलेले प्रदूषित पाणी हे जवळच्या जलस्त्रोतात सोडले जाते आणि या प्रदूषित पाण्यात असणाऱ्या हानिकारक घटकांमुळे पाण्याचे प्रदूषण होते.

 

पर्यावरण प्रकल्प ११ वी १२वी  पर्यावरण प्रकल्प  जलप्रदूषण प्रकल्प  शालेय प्रकल्प  जल प्रदूषण समस्येचे गांभीर्य अभ्यासाने व जलसुरक्षा paryavaran prakalp 1vi 12vi  paryavarn prakalp  jalpradushan prakal
photo credit: paryavarn shikshan v jalsuraksha book 12th


जलप्रदूषणामुळे होणारे परिणाम


  1. घरगुती सांडपाण्यामुळे होणारे हानिकारक परिणाम:

  •  घरातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यामध्ये अनेक प्रकारची पोषक द्रव्ये मिसळलेली असतात. त्यामुळे त्या पाण्यात ऑक्सिजन विरघळण्याचे प्रमाण वाढते परिणामी त्या पाण्याच्या रंग बदलतो आणि पाण्याला दुर्गंध यायला सुरुवात होते.

  • घरातील सांडपाणी जलस्त्रोतांमध्ये मिसळल्याने तेथे विषाणूंची वाढ होऊन. विविध प्रकारच्या रोगाच्या साथी पसरतात.

  • विषाणू, रोगास कारणीभूत असणारे जीवाणू यांची या पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ होते परिणामी टायफॉईड, कॉलरा, हगवण, यांसारखे गंभीर आजार होतात.


2. औद्योगिक कचऱ्यामुळे होणारे हानिकारक परिणाम:

  • जलसाठ्यांचा रंग, गंध आणि पाणी गढूळ होण्यास प्रक्रिया न केलेले औद्योगिक सांडपाणी स्त्रोतात सोडल्याने या समस्या उद्भवतात.

  • अल्कलीयुक्त पदार्थ जसे की, साबण , कपडे धुण्याची पावडर यांमुळे जो फेस तयार होतो त्यामुळे पाण्याची गुणवत्ता खालावते.

  • माग्नेशिअम सारख्या घटकांचे प्रमाण पाण्यात वाढल्याने पाण्याचा कठीणपणा वाढला जातो आणि त्या जलसाठ्यातील पाणी हे घरगुती वापरासाठी अयोग्य ठरते.

 

3.शेतीतील कचऱ्यामुळे होणारे हानिकारक परिणाम :

  • आज मोठ्या प्रमाणावर रसायिक खते व कीटक नाशकांचा वापर वाढला आहे ही रासायनिक खते कीटकनाशके अतिवृष्टीमुळे तसेच सिंचनासाठी पाण्याच्या अतिवापर केल्याने ती पाण्यासोबत जमिनीत झिरपतात. ज्यामुळे भूजलस्त्रोत प्रदूषित होतात.

  • शेतीसाठी उपयुक्त असणाऱ्या सुक्ष्म वनस्पती, गांडुळे, यांसारख्या प्राण्यांवर रासायनिक खतांचा हानिकारक परिणाम होतो. परिणामी शेतीची जमीन ही नापीक बनते.

  • फवारणी साठी वापरले गेलेले डबे, तसेच इतर साहित्य पाण्याच्या स्त्रोतात धुतल्याने देखील जलप्रदूषण होते.

 

4.औष्णिक प्रदूषणाचे होणारे घातक परिणाम:

  • कारखान्यातून बाहेर पडणारे गरम पाणी जसेच्या तसे जलसाठ्यात सोडल्याने पाण्याचे रासायनिक व भौतिक गुणधर्मात बदलाव येतो.

  • पाण्यामध्ये विरघळेला प्राणवायू कमी होतो परिणामी तेथील जलचरांवर हानिकारक परिणाम होतो.

  • औष्णिक प्रदूषण हे जलचरांच्या स्थलांतरणास कारणीभूत ठरते.


जलप्रदूष थांबवण्यासाठी उपाय-योजना

 

  • जलप्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी जलप्रदूषण करण्याऱ्या स्त्रोतांवर कडक निर्बंध लागू करणे गरजेचे आहे.

  • औद्योगिक कारखान्यातून बाहेर पडणारे सांडपाणी जसेच च्या तसे जलस्त्रोतात न सोडता त्यावर आधी योग्य ती प्रक्रिया करणे आवश्यक आहे.

  • महानगर पालिका तसेच नगरपालिका यांद्वारे 

  • गोळा केला जाणारा कचरा जलस्रोतात न टाकता त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी.

  • जर कोणी जलप्रदूषणाच्या नियमाचे उल्लंघन करत असेल तर त्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

  • विविध कार्यक्रमांसाठी वापरलेली फुले, तसेच निर्माल्य जलस्त्त्रोतात टाकून दिले नाही तर जलप्रदूषण कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

  • लोकांमध्ये जलप्रदूषणा बाबत जागृती करून जलप्रदूषण कमी करण्याच्या प्रयत्न करावा.


जलसुरक्षा अभियान


(जलसुरक्षा अभियान ९ ऑगस्ट २०१९ )

        समग्र शिक्षा- जलसुरक्षा अभियान हे देशातील विद्यार्थ्यांमध्ये पाणी संवर्धनाबाबत जागृती निर्माण होण्याच्या उदेशाने मानव व संसाधन विकास विभागाने आयोजित केले. या अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांना पाण्यासंदर्भात एक सक्षम नागरिक बनविण्याचा प्रयत्न करीत आहे. विद्यार्थ्यांना लहान वयातच पाण्याचे महत्व समजावे यासाठी हे अभियान कार्यरत आहे. आजच्या काळात विद्यार्थ्यांना जलसंधारण सारखे उपक्रम करण्यास सक्षम करीत आहे.



निरीक्षणे


Ø जलस्त्रोतांचे प्रदूषण होण्यास कारणीभूत ठरणारे घटक


पर्यावरण प्रकल्प ११ वी १२वी  पर्यावरण प्रकल्प  जलप्रदूषण प्रकल्प  शालेय प्रकल्प  जल प्रदूषण समस्येचे गांभीर्य अभ्यासाने व जलसुरक्षा paryavaran prakalp 1vi 12vi  paryavarn prakalp  jalpradushan prakalp



विश्लेषण


Ø दैनंदिन वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यातील घटकांचे प्रमाण खालील प्रमाणे:


 {टीप : सदर तक्ता पाहण्यासाठी मोबाईल आडवा (tilt) करा }

पिण्यायोग्य पाण्यातील घटकांचे प्रमाण

अ.क्र.

घटक

प्रमाण

एकक

पीएच

७-८.५

 

कॅल्सीआम

३०-८०

मिलिग्रॅम/लि

माग्नेशियम

१०-५०

मिलिग्रॅम/लि

बायकार्बोनेट

१००-३००

मिलिग्रॅम/लि

सल्फेट

२५-१००

मिलिग्रॅम/लि

फ्लोराइड

०.५-१.०

मिलिग्रॅम/लि

क्लोराईड

२०-५०

मिलिग्रॅम/लि

टी.डी.एस.

१००-५००

मिलिग्रॅम/लि




















निष्कर्ष


·       पाण्याच्या प्रदूषिकारणाबाबत अधिक माहिती जाणून घेतली.

·       पाण्याचे महत्व समजावून घेण्यास मदत झाली.

·       पाण्याचे प्रदूषणास कारणीभूत स्त्रोतांचा अभ्यास केला.

·       पाण्याच्या प्रदूषणाने होणाऱ्या घातक परिणामांची सविस्तर माहिती घेतली.

·        जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापन पद्धतींचा अभ्यास केला.

·        जलसुरक्षा अभियानाबाबत माहिती संग्रहित केली.




संदर्भ


  • www.educationalmarathi.com
  • पर्यावरण पुस्तिका ( पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा) 




अधिक प्रकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा.👇

११ वी १२वी प्रकल्प विषय यादी 📁



मित्रांनो तुम्ही हा प्रकल्प खालील प्रकारे देखील शोधू शकता:

  • पर्यावरण प्रकल्प ११ वी १२वी 
  • पर्यावरण प्रकल्प 
  • जलप्रदूषण प्रकल्प 
  • शालेय प्रकल्प 
  • जल प्रदूषण समस्येचे गांभीर्य अभ्यासाने व जलसुरक्षा
  • paryavaran prakalp 1vi 12vi 
  • paryavarn prakalp 
  • jalpradushan prakalp 
  • shaley prakalp 
  • jal pradushan samasyeche gambhirya abhyasane v jalsuraksha.

paryavarn project in marathi 


मित्रांनो तुम्हाला हा प्रकल्प उपयोगी पडला का ते जरूर commet द्वारे कळवा. 


धन्यवाद.


7 comments

  1. Maharashtratil 5 Kunti rashtriy udyan
  2. Thank you so much 🙏🙏🙏it really help me
    1. You’re welcome.
  3. It's really helpful ❤️ thanks a lot
    1. You’re welcome.
  4. Nice👍👍👍
    1. Thank you..!
निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.