महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये
आपल्या महाराष्ट्रात एकूण ५८ वन्यजीव संरक्षित क्षेत्रे आहेत. त्यापैकी ६ राष्ट्रीय उद्याने, ५० अभयारण्ये, ४ संवर्धन राखीव क्षेत्र अशी त्यांची विभागणी केली आहे. ते राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या ३.२६ टक्के इतक्या क्षेत्रफळावर म्हणजेच १००५४.१३ चौ.कि.मी. इतक्या क्षेत्रफळावर विस्तारलेले आहेत.
महाराष्ट्र राज्यातील १९ संरक्षित क्षेत्रांचा समावेश केला तर (६ राष्ट्रीय उद्याने आणि १४ अभयारण्ये) यामध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प (नागपूर), मेळघाट व्याघ्र प्रकल्प (अमरावती), सह्याद्री व्याघ्र प्रकल्प नवेगाव-नागझिराचा व्याघ्र प्रकल्प (कोल्हापूर) आणि बोरचा व्याघ्र प्रकल्प इत्यादी सहा व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्र म्हणून तयार करण्यात आले आहेत. यापैकी बोर व्याघ्र प्रकल्पाचे काम सध्या सुरु आहे.
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने | Maharashtratil rashtriya udyane |
- ताडोबा राष्ट्रीय उद्यान
ठिकाण: चंद्रपूर
प्राणी/पक्षी: वाघ
क्षेत्र (चौ.कि.मी.): ११६.५५
स्थापना: १९५५
ताडोबा हे महाराष्ट्र राज्यातील प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर जिल्ह्यात स्थित आहे. या उद्यानाची स्थापना १९५५ मध्ये करण्यात आली. ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील प्रथम राष्ट्रीय उद्यान आहे. या उद्यानाचे मुख्य वैशिट्य म्हणजे येथे आढळणाऱ्या मगरी-सुसरी आणि गवा.
काही वर्षांपूर्वी या उद्यानाचे व अंधारी अभयारण्याचे संयुक्तीकरण करण्यात आले आणि या उद्याचे नाव ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असे करण्यात आले आहे. या उद्यानाच्या क्षेत्रफळात सुद्धा वाढ करण्यात आली आहे. या अभयारण्याचे क्षेत्रफळ ११६ चौ.कि.मी. असून या ठिकाणाचे जंगल ५०९ चौ.कि.मी. इतके पसरले आहे.
सप्टेंबर २०११ च्या मोजणीनुसार या अभयारण्यात रानगव्यांची संख्या १४३ इतकी आहे. मगर-सुसरी हे येथील प्रमुख वैशिष्ट्य असले तरीही व्याघ्रप्रकाल्पामुळे येथे वाघांचे आकर्षण सुद्धा वाढले आहे. या उद्यानात सध्या ५० इतकी वाघांची संख्या आहे. या ठिकाणी बिबट्या, तरस , जंगली कुत्री, अस्वल, उदरमांजर आणि विविध प्रकारच्या रानमांजरी. येथे आढळणाऱ्या हरणांच्या जातींमध्ये चितळ, भेकर, नीलगाय, सांबर, कोल्हे , ससे आणि पिसुरी ही विदर्भात आढळणारी हरणाची जात काही प्रमाणात या ठिकाणी आढळून येते.
या उद्यानात जवळपास विविध प्रकरच्या १८१ जातींच्या पक्षांचे अस्तित्व आहे. गरुड, ससाणे भृंगराज, करकोचे, मच्छिमार, घनेश, रानकोंबड्या , भारद्वाज , मोर इत्यादी.
ताडोबा, कोळसा आणि मोहर्ली या तीन वनपरिक्षेत्रात अनेक छोटे मोठे तलाव आहेत. त्यांपैकी महत्वाच्या असणाऱ्या तलावांमध्ये ताडोबा, कोळसा, कारवा, पिपरहेटी, जामणी, पांगडी, बोटझरी, पिपरी,मोहर्ली, जामून झोरा, तेलीया, महालगाव, शिवणझरी, आंभोरा, फुलझरी, इत्यादींचा समावेश होतो.
या प्रकल्पामध्ये वन्यजीवांना पाणीपुरवठा करणाऱ्या स्त्रोतांमध्ये अनेक छोटे तसेच मोठे नाले सुद्धा आहेत. यामध्ये जमून झोरा, तेलीया डॅम आणि उपाशा नाला यांचा प्रामुख्याने समावेश आहे. कोसेकणार, आंबट हिरा, चिखलवाही, सांबर डोह, काटेझरी, काळा आंबा, कासरबोडी, जांबून झोरा,आंबेगड, गिरघाट, वसंत बंधारा, आंबेडोह बंधारा, चिचघाट, यांसारखे पाण्याचे डोह ताडोबा जंगलात आहेत.
- संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
ठिकाण: मुंबई उपनगर (बोरीवली)
प्राणी/पक्षी: वाघ
क्षेत्र (चौ.कि.मी.): १०४
स्थापना: १९६९
मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर स्थित असणारे परंतु मुंबईच्या पंचक्रोशीत येणारे हे राष्ट्रीय उद्यान आहे. या उद्यानाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ १०४ चौ.कि.मी इतके आहे. या ठिकाणी असणाऱ्या कान्हेरी लेण्यांमुळे याला (कृष्णगिरी) म्हणजे ‘काळा पहाड’ असे नाव देण्यात आले. ब्रिटिश काळात वनविभागाची स्थापना झाल्यानंतर या वनविभागाचे सर्वेक्षण होऊन २०.२६चौ.कि.मी.क्षेत्रफळ असलेले "कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान" म्हणून अस्तित्वात आले. १९७४ साली या उद्यानाचे नाव बदलून ते 'बोरीवली राष्ट्रीय उद्यान' असेकरण्यात आले. १९८१ मध्ये या उद्यानाच्या नावामध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात आला आणि याचे नाव 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यान' असे ठेवण्यात आले.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विविध प्रकारच्या सुमारे ४० जातींचे सस्तन प्राणी, जमिनीवर त्याचप्रमाणे पाण्यात वास्तव्य करणारे , विविध रंग आणि आकारांचे २५० प्रकारचे पक्षी तसेच ३८ विविध जातींचे सरपटणारे प्राणी आणि ९ प्रकारच्या जातींचे उभयचर प्राणी आहेत.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर असलेला आढळतो. त्याचप्रमाणे रानमांजर, मुंगुस लंगुर, उदरमांजर , अस्वल अशा विविध जातींच्या प्राण्यांचे अस्तित्व आहे. या उद्यानामध्ये हजारो जातींचे वृक्ष आढळतात. त्यामध्ये प्रामुख्याने आढळणारे वृक्ष म्हणजे साग, बाभूळ, शिसव, निवडुंग, बांबूची बेटे, करंज इत्यादी.
वसई खाडीला लागून असलेल्या या उद्यानात २५ चौ.कि.मी. क्षेत्रावर खारफुटी जंगल पसरले आहे. या जंगलाला वेलावन किंवा मंगलवन असे म्हटले जाते. या ठिकाणी खडकामध्ये कोरलेल्या कान्हेरी लेणी पर्यटकांचे खास लक्ष वेधून घेतात. ही लेणी २००० वर्षांपूर्वी कोरलेली असून ती बौद्ध काळातील आहेत. या ठिकाणी एकूण १०९ विहार आहेत.
- नवेगाव राष्ट्रीय उद्यान
ठिकाण: गोंदिया
प्राणी/पक्षी: वाघ
क्षेत्र (चौ.कि.मी.): १३३.८८
स्थापना: १९७२
नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्र राज्यातील गोंदिया या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. या उद्यानाची स्थापन २२ नोव्हेंबर, १९५२ या दिवशी करण्यात आली.
नवेगाव राष्ट्रीय उद्यानात प्रामुख्याने मध्य भारतीय पानगळी या प्रकारात मोडते. या उद्यानात कलाम धावडा, बिजा, साग, अशा प्रकारची झाडे आढळतात.
नवेगाव उद्यानाचा मुख्य भाग हा डोंगराळ जमिनीचा आहे. या डोंगराळ भागाच्या पायथ्याशी नवेगाव नावाचे तलाव आहे. या ठिकाणी नवेगाव बांध आणि इटीडोह धरण हे दोन मोठे पाण्याचे स्त्रोत येथे उपलब्ध आहेट. हे जंगल सुर्मारे १३४ चौ.कि.मी. इतक्या क्षेत्रावर पसरले आहे. माधव झरी, टेलनझरी, अंगेझरी, राणी डोह, कामझरी, शृंगार बोडी हे झरे या ठिकाणी उपलब्ध आहेत. या उद्यानातील भाग हा पाणथळ आणि दलदल असलेला आढळतो.
विविध प्रकारच्या पक्षांसाठी न्वेगावाचे राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे. नवेगावच्या तळ्यात हिवाळी दिवसांत हजारोंच्या संख्येने स्थलांतरित पक्षी येतात. विविध प्रकारची बदके, करकोचे , बगळे, पाणकोंबडया, पाणकावळे, हंस, क्रौंच, करकोचे, इत्यादी.
प्राण्यामध्ये येथे अस्वल, तरस, वाघ, बिबट्या, सांबर, नीलगाय, माकडे , रानगवा, रानडुक्कर, व वानरे त्याचप्रमाणे विविध जातींचे साप आढळतात यामध्ये पट्टेरी मण्यार ही दुर्मिळ सापाची जात या ठिकाणी आढळते. या ठिकाणी असणाऱ्या तलावांत विशेष म्हणजे पाणमांजरींचे अस्तित्व आढळते.
- पंडित जवाहरलाला नेहरू राष्ट्रीय उद्यान
ठीकाण: नागपूर
प्राणी/पक्षी: वाघ
क्षेत्र (चौ.कि.मी.): २७५
स्थापना: १९८३
नागपूर जिल्ह्यातील पवनी गावापासून २० कि.मी अंतरावर पेंच राष्ट्रीय उद्यान स्थित आहे. पेंच नदीवर बांधलेल्या धरणाच्या परिसरात २५७.९८ चौ.कि.मी. वर पसरलेल्या क्षेत्रास १४ नोव्हेंबर १९९० साली या भागाला पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असे नामकरण करण्यात आले. तोतला डोह हे पेंच नदीवरील सर्वात मोठे धरण आहे.
या ठिकाणी खिल्लारी या ठिकाणी येथे गोंड आदिवासींची वस्ती आहे. तोतलाडोह परिसरात पाण्यावर तरंगणाऱ्या पाणकोंबड्यांचे अस्तित्व आढळते. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये युरोपातून स्थलांतरित पक्षी येथे येतात.
तोतलाडोह या धरणापर्यंत पेंच नदीची लांबी ही तिच्या उगम स्थानापासून २० किलोमीटर इतकी आहे. राणी डोह, तोतलाडोह, लामा डोह खारी तलाव इत्यादी पाण्याचे स्त्रोत या ठिकाणी आहेत. उन्हाळा हृतुत फक्त तोतलाडोह या पाण्याची ठिकाणी फक्त पाण्याचा साठा आढळतो.
- चांदोली राष्ट्रीय उद्यान
ठिकाण: सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी
प्राणी/पक्षी: वाघ
क्षेत्र (चौ.कि.मी.): ३१७.६७
स्थापना: २००४
महाराष्ट्र राज्यातील सांगली जील्यामध्ये स्थित असणाऱ्या या उद्यानाला २००४ साली राष्ट्रीय उद्यान म्हणून दर्जा मिळाला. या उद्यानाचे विशेष म्हणजे चांदोली धरणाच्या तलावात नावेतून प्रवास करून देखील हे जंगल फिरता येते.
वारणा नदीवर चांदोली हे धारण आहे या धरण आहे या वारणा नदीवरील चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांदोली अभयारण्य आहे. हे सांगली जिल्ह्यातील ३२ शिरला या तालुक्याच्या क्षेत्रात येते.
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विस्तार असलेल्या चांदोली या उद्यानाचे क्षेत्रफळ ३१७.६७ चौ.कि.मी. इतके आहे. वारणा नदीचा उगम याच ठिकाणी होतो.
सातारा, कोल्हापूर सांगली, व रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सीमाभागात ३१७.६७ चौ.कि.मी. वरचांदोली राष्ट्रीय उद्यान पसरलेले पसरलेले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये असणारे सगळ्यात मोठे राष्ट्रीय उद्यान म्हणून चांदोली आहे. या उद्यानाचा विकास व्हावा याच दृष्टीकोनातून या उद्यानाला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा प्राप्त झाला आहे. २०१० साली या उद्यानातील प्राणीगणना दोन भागांत करण्यात आली होती. या उद्यानात २५ बिबट्यांचा वावर असल्याचे त्यांच्या पायांच्या ठशांवरून निदर्शनास आले. सुमारे ३५० ते ४०० च्या दरम्यान गवे, २५० ते ३०० इतकी सांबरे, १०० अस्वले, यांच्यासह महाराष्ट्राचा राष्ट्रीय प्राणी असलेला शेखरू येथे आढळून आले आहेत त्याचबरोबर भेकर, रानडुक्कर इत्यादी सर्वत्र आढळतात.
उद्यानातील प्राण्यांची संख्या
वाघ: ३
बिबट्या: २५
गवा: ३५० ते ४००
सांबर : २५० ते ३००
अस्वल : १००
अधिक प्रकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा.👇
११ वी १२वी प्रकल्प विषय यादी 📁
📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌
पर्यावरण प्रकल्प
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानांची माहिती प्रकल्प
मराठी प्रकल्प
प्रकल्प माहिती.
धन्यवाद