माझा आवडता पक्षी : पोपट
माझा आवडता पक्षी : पोपट | Maza aavdata pakshi popat essay in marathi |
आपल्या देशामध्ये विविध प्रकारचे पक्षी आढळतात.
प्रत्येक पक्षाचे स्वतःचे असे खास वैशिष्ट असते. मोराकडे त्याचा रंगीबेरंगी पिसारा
आहे. कोकिळेचा आवाजाला गोडवा आणि एक छान सूर आहे. कावळ्याचा आपण विचार केला तर
त्याच्याकडे चतुराई हा एक गुण आहे. गरुड आणि नीलकंठ पक्षांकडे स्वतःची अशी काही न
काही खास वैशिष्ट्ये आहेत. सुंदर आणि पांढऱ्या रंगाचा दिसणारा हंस हा पक्षी बुद्धी
आणि विवेक या गुणांचे प्रतिक आहे. परंतु या सर्व पक्षांमध्ये मला पोपट हा पक्षी
खूप आवडतो.
पोपटाचा हिरवा रंग, लाल रंगाची चोच आणि कंठाजवळ काळ्या
रंगाची पट्टी आणि सुंदर कोमल पंख माझ्या मनाला मोहून टाकतात. असेही जगात कितीतरी
प्रकारचे पोपट आपल्याला पाहायला मिळतात. काही पोपट खूप सुंदर असतात त्यांच्या
सौंदर्याने ते मनाला मोहून टाकतात. पक्षीसंग्रहालयात तर पोपटांच्या विविध जाती
आपल्याला पाहायला मिळतात.
पोपटाला पाळणे खूप सोपे आहे. पोपट पेरू, मिरची
आणि इतर फळे खूप आवडीने खातो. पोपट हा असा पक्षी आहे कि तो आपल्या परिवारात
सहजतेने मिसळून जातो. आणि आपल्याला परिवाराचा एक भाग बनून जातो.
पोपट हा खुप समजूतदार पक्षी आहे. त्याला जर आपण
कोणती गोष्ट शिकवली तर तो ती लगेच शिकतो. आजीसोबत तो ‘राम राम’ बोलतो. लहान मुले
त्याला ‘मिठ्ठू’ म्हणून हाक मारून बोलवतात, त्या लहान मुलांचे ऐकून तो सुद्धा
मिठ्ठू मिठ्ठू म्हणू लागतो. तो आपला एक पाय वर उचलून नमस्कार सुद्धा करतो.
पोपट हा आपल्या देशामध्ये अगदी प्राचीन काळापासूनच
एक लोकप्रिय पक्षी आहे. पूर्वी पोपटाला हृषी
मुनींच्या आश्रमांमध्ये आणि तपोवनामध्ये सुद्धा पाळले जात असे. राजे - महाराजांच्या
राज दरबारामध्ये पोपटाला सोन्याच्या
पिंजऱ्या मध्ये ठेवले जात असे.
पोपट हा मोकळ्या आकाशामध्ये फिरणारा पक्षी आहे.
पोपटाला आपण एका बंद पिंजऱ्या मध्ये ठेवतो हे त्याला फारसे आवडत नाही. हीच गोष्ट
अनेक कवी आणि लेखकांनी सांगितली आहे. पण पोपटाची सुंदरता आणि त्याच्या
बुद्धिमत्तेमुळे लोक त्याला पाळतात आणि एका पिंजऱ्यात बंद करून ठेवतात.
असा सुंदर, समजूतदार आणि गोड गोड बोलणारा पोपट हा
म्हणूनच माझा आवडता पक्षी आहे.
निबंध लिहित असताना खाली दिलेल्या मुद्यांचा
अवश्य वापर करा.
[मुद्दे:
आवडत्या पक्षाचा उल्लेख
त्या पक्षाचा रंग, रूप आणि स्वभाव
समजूतदार पणा
विशेष गुण / त्या पक्षाची वैशिष्ट्ये
पुरातन काळातील त्या पक्षाचे महत्व
शेवट. ]
मित्रांनो तुम्ही हा निबंध खालीलप्रमाणे देखील
शोधू शकता.
माझा आवडता पक्षी पोपट
पोपट माझा आवडता पक्षी निबंध
माझा प्रिय पक्षी निबंध
मराठी निबंध
पोपट पक्षी मराठी निबंध
माझा आवडता पक्षी पोपट वर मराठी निबंध
My favourite bird parrot essay in Marathi
My favourite bird parrot
Maza aavadata pakshi nibadh
Maza aavdata pakshi popat Marathi nibandh
Maza aavdata pakshi popat nibandh in Marathi
Marathi nibandh
Nibandh pdf download
Free pdf download
धन्यवाद