माझे आवडते पुस्तक
![]() |
माझे आवडते पुस्तक निबंध | Maze aavadate pustak marathi nibandh |
मला वाचनाचा खूप छंद आहे. पाठ्यपुस्तकांसोबतच
इतरही अनेक पुस्तके वाचण्याची मला आवड आहे. मी माझ्या शाळेच्या ग्रंथालयातून खूप
चांगली चांगली पुस्तके आणून वाचली आहेत. या सर्व पुस्तकांमध्ये मला आवडलेले पुस्तक
म्हणजे गांधीजींची आत्मकथा. ‘सत्याचे प्रयोग’ असे या पुस्तकाचे नाव आहे. या पुस्तकाने
माझ्यावर खूप प्रभाव पाडला आहे.
गांधीजींनी हे पुस्तक त्यांच्या मातृभाषेमध्ये
म्हणजेच गुजराती भाषेमध्ये लिहिले आहे. त्याचे नाव आहे ‘ सत्य ना प्रायोगो’. हिंदी
आणि इंग्रजी भाषांबरोबरच मराठी भाषेमध्ये सुद्धा या पुस्तकाचा अनुवाद केलेला आहे.
हिंदी मध्ये या पुस्तकाचे नाव ‘सत्य के प्रयोग’ , मराठी मध्ये ‘सत्याचे प्रयोग’
आणि इंग्रजीमध्ये या पुस्तकाचे नाव ‘एकस्परीमेंट ऑफ ट्रुथ’ असे आहे. भारतातील इतर अनेक
भाषांमध्ये सुद्धा या पुस्तकाचा अनुवाद झाला आहे. महात्मा गांधी आपल्या जीवनामध्ये
सत्याला सर्वात जास्त महत्व द्यायचे. याच कारणामुळे त्यांनी आपल्या आत्मकथेला हेच नाव
दिले.
‘सत्याचे प्रयोग’ या पुस्तकामध्ये महात्मा
गांधीजींनी आपल्या चुकांचे आणि वाईट गुणांचे अगदी मन मोकळेपणाने वर्णन केले आहे. त्यांनी
त्यांच्या धुम्रपानाबाबत, मांसाहार आणि चोरी करणे या विषयी देखील त्यांनी कोणतीही
गोष्ट लपवली नाही. स्वतःकडून झालेली प्रत्येक चूक त्यांनी स्वीकार केली आहे. त्यांनी
हे सुद्धा सांगितले आहे की कशा प्रकारे ते या वाईट गोष्टींच्या मार्गाला लागले आणि
कशी त्यांनी या सर्वातून स्वतःची सुटका करून घेतली याबाबत सविस्तर या पुस्तकामध्ये
सांगितले आहे. याशिवाय गांधीजींनी आपल्याला झालेल्या शिक्षा, विलायत यात्रा,
दक्षिण आफ्रिकेमधील सत्याग्रह आणि भारतामध्ये झालेल्या आंदोलनांची या पुस्तकामध्ये
सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
गांधीजींचे हे पुस्तक आपल्याला खूप प्रेरणा देऊन
जाते. एक सामान्य माणूस कशा प्रकारे महान बनला ही शिकवण या पुस्तकातून आपल्याला
मिळते. महात्मा गांधीजी सत्य, कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि आत्मशक्ती यांच्या
जोरावरच ते आपल्या देशातील एक महान नेता आणि युगपुरुष बनले. त्यांच्या याच
गुणांमुळे आज आपण महात्मा गांधीजींना ‘राष्ट्रपिता’ या रुपामध्ये स्मरण करतो.
या पुस्तकाची भाषा खूप सोपी आणि हृदयस्पर्शी आहे.
या पुस्तकाच्या लेखनाची शैलीसुद्धा खूपच रोचक आहे. या पुस्काचे वाचन केल्याने
वाचणाऱ्याच्या मनामध्ये सत्य, अहिंसा, प्रेम, आत्मविश्वास आणि मानव-सेवा या भावना
जागृत होतात.
गांधीजींची ही आत्मकथा वाचून मला खूप फायदा झाला
आहे. या पुस्तकाच्या प्रभावाने मी माझ्या खूपअशा वाईट सवयींपासून सुटका मिळवली
आहे.
माझ्याप्रमाणे इतर अनेक लोकांनी सुद्धा
गांधीजींची आत्मकथा वाचून आपल्या जीवनाचा योग्य मार्ग निवडला आहे. आपल्या
देशामध्ये समाज सुधारणा, दलितांचा उद्धार तसेच शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी हे
पुस्तक खूप उपयोगी असल्याचे सिद्ध झाले आहे. आत्ता तर हे पुस्तक माझे एक चांगले
मित्र, गुरु आणि मार्गदर्शक बनले आहे. ज्या प्रमाणे महात्मा गांधीजी माझे आवडते
नेता आहेत, त्याच प्रमाणे त्यांचे हे आत्मकथेचे पुस्तक सुद्धा माझे आवडते पुस्तक
आहे. प्रत्येक भारतीयाने गांधीजींची आत्मकथा हे पुस्तक एकदातरी अवश्य वाचले
पाहिजे.
हा निबंध लिहित असताना खाली दिलेल्या मुद्द्यांचा
अवश्य वापर करा.
[मुद्दे:
आवडत्या पुस्तकाचा उल्लेख
पुस्तकाचा विषय
पुस्तकाची विशेषता
पुस्तकाचे महत्व
संदेश
शेवट.]
हा निबंध खालील प्रमाणे देखील शोधू शकता.
माझे आवडते पुस्तक
माझे आवडते पुस्तक निबंध
माझे आवडते पुस्तक मराठी निबंध
माझे आवडते पुस्तक या विषयावर निबंध
माझे आवडते पुस्तक निबंध मराठीत
माझे आवडते पुस्तक भाषण
माझे आवडते पुस्तक निबंध दाखवा
Maze aavdate pustak nibandh
Maze aavadate pustak nibandh in Marathi
My favourite book essay in Marathi.
My favorite book essay in Marathi
My favorite book is speech
धन्यवाद