BUY PROJECT PDF Click Here!

‘पर्जन्य जल संचयन आणि त्याचे फायदे’ प्रकल्प | Parjanyajal sanchayan aani tyache fayade project

paryavarn prakalp 11vi 12vi prakalp prstavana ‘पर्जन्य जल संचयन आणि त्याचे फायदे’ प्रकल्प ‘पर्जन्य जल संचयन आणि त्याचे फायदे’ प्रकल्प pdf पर्यावरण
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

‘पर्जन्य जल संचयन आणि त्याचे फायदे’

        नमस्कार मित्रांनो Educationalमराठी या शैक्षणिक  माहितीच्या वेबसाईटवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो आज आपण ‘पर्जन्य जल संचयन आणि त्याचे फायदे’ या विषयावरील प्रकल्पाची माहिती घेणार आहोत. प्रकल्पाची प्रस्तावना , विषयाचे महत्व, निरीक्षणे, विश्लेषण, निष्कर्ष, संदर्भ या सर्व मुद्द्यांचा समावेश असलेल्या प्रकल्पाची माहिती आम्ही उपलब्ध करून दिली आहे.


११ वी १२वी पर्यावरण विषयाच्या प्रकल्पासाठी तसेच इतर इयत्तांचा प्रकल्प करताना देखील या माहितीचा विद्यार्थी उपयोग करू शकतात.

११वी,१२वी प्रकल्प ‘पर्जन्य जल संचयन आणि त्याचे फायदे’


[आम्ही देलेल्या प्रकल्प तुम्हाला आवडल्यास आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्स द्वारे आपल्या पतिक्रिया नक्की आम्हाला कळवा.]


प्रकल्प विषय:  तुमच्या भागातील पर्जन्यजल संचयनासाठी असलेल्या प्रणालीचे सर्वेक्षण करा. यामुळे त्या भागात झालेल्या फायद्यांची यादी करा.


चला तर मग 'पर्जन्य जल संचयनप्रणाली आणि त्याचे फायदे' या प्रकल्पाला सुरुवात करूया.




paryavarn prakalp 11vi 12vi  prakalp prstavana  ‘पर्जन्य जल संचयन आणि त्याचे फायदे’ प्रकल्प  ‘पर्जन्य जल संचयन आणि त्याचे फायदे’ प्रकल्प pdf  पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी  प्रकल्प प्रस्तावना  Parjanyajal sanchayan aani tyache fayade project  प्रकल्प pdf फाईल downlod  प्रकल्प pdf file free project file download


‘पर्जन्य जल संचयन आणि त्याचे फायदे’ प्रकल्प | Parjanyajal sanchayan aani tyache fayade project 



 प्रकल्प    प्रस्तावना

 

            पाऊस पडतो तेव्हा पाणी जमिनीत मुरणार की वाहून जाणार हे  पृष्ठभाग कोणता आहे यावर ठरते. पाणी किती प्रमाणात जिरेल आणि किती प्रमाणात वाहणार हेठरते. जर एखादे मोकळे मैदान किंवा मातीची जागा असेल तर पडणाऱ्या पाण्याच्या 50% एवढेच पाणी जमिनीत मुरते. पण जर जमिनीवर कॉंक्रीट असेल तर जेमतेम 10% इतके ही पाणी मुरत नाही, सगळे पाणी वाहून जाते. पूर्वी इमारतीच्या आवारात असणाऱ्या मातीमुळे आणि आजूबाजूला विस्तीर्ण मैदाने असल्याने पावसाचे पडणारे पाणी आधी जमिनीत मुरले जायचे आणि नंतर हळूहळू नाल्यांद्वारे वाहून जात असते. आत्ता मातीचे प्रमाण कमी झाल्याने पाणी लगेच वाहून जाते. परिणामी नाल्यांतील पाणी आपले पात्र सोडून बाहेर येते. आणि पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते.


आज सर्वच ठिकाणी जास्तीत जास्त भागाचे कॉंक्रीटीकरण केल्यामुळे त्याचा उपयोग पाणी जमिनीत मुरवण्यासाठी करता येत नाही. त्यातच,पावसाचे पडलेले पाणी लवकरात लवकर समुद्राच्या दिशेने कसे जाईल यावर उपाययोजना केल्या जातात. त्यामुळे, पूर्वी जमिनीत पाणी जिरायचेते खूप कमी झाले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी  टंचाईला तोंड द्यावे लागते.


या पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी पावसाचे जमिनीवर पडणारे पाणी जास्तीत जास्त प्रमाणवर जमिनीत कसे जिरवता येईल यावर भर देणे गरजेचे आहे. जर पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्याचे जलसंचयन केले तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भासणारा पाण्याच्या तुटवडा काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.


आज आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून ‘पर्जन्य जल संचयन आणि त्याचे फायदे’ याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत.  


 

 प्रकल्प    अनुक्रमणिका

 


अ.क्र.

घटक

पान नं.

१)

प्रकल्पाची उद्दिष्टे

२)

विषयाचे महत्व

३)

पर्जन्य जल संचयन संकल्पना

 

४)

पर्जन्य जल संचयनासाठीच्या प्रणाली

६)

पर्जन्यजल संचयनाचे फायदे

७)

निरीक्षण

८)

निष्कर्ष

९)

संदर्भ

१०)

प्रकल्पाचा अहवाल





















प्रकल्पाची उद्दिष्टे

 

Ø पर्जन्य जलसंचयन संकल्पना समजावून घेणे.

Ø परिसरात वापरल्या जाणाऱ्या पर्जन्यजलसंचयनाच्या प्रणालींचा अभ्यास करणे.

Ø पर्जन्य जलसंचयन प्रणालींमुळे परिसरातील भागात झालेल्या फायद्यांची माहिती मिळविणे.

Ø पर्जन्य जलसंचायानाच्या विविध पद्धतींची माहिती घेणे.

Ø पर्जन्य जलसंचयनाचे महत्व समजावून घेणे.

Ø जलसंचयनाबाबत अधिक माहिती इतरांना करून देणे.




विषयाचे महत्व

 

            गेल्या काही वर्षांत पडलेल्या पावसाच्या कालावधीचे निरीक्षण केले तर पावसाच्या कालावधीमध्ये वर्षानुवर्ष बदल होत गेलेले आपल्याला दिसून येतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पडणाऱ्या पावसाचे प्रमाण देखील अनियमित स्वरूपाचे आहे. पावसाला ऋतुमध्ये चार महिने सातत्यपूर्ण व जास्त प्रमाणात पडणारा पाऊस हा आत्ता वातावरणात होत चाललेल्या बदलामुळे अनियमित स्वरूपाचा झाला आहे. पावसाचा लहरीपणा वाढत चालला आहे. काही वेळेला तो कमी कालावधीमध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडतो तर कधी कधी दुष्काळ पडण्याइतपत कमी पाऊस पडतो. अशी उदाहरणे वारंवार दिसत आहेत. यामुळे  पावसाचे पाणी जमिनीवरून वेगाने वाहून ते जमिनीमध्ये मुरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होत आहे.

 

            शहरामध्ये किंवा गावांत रस्ते, घर या प्रकारचे बांधकाम केल्यानंतर या ठिकाणी सिमेंट वाळूचा थर जमिनीवर पसरला जातो. यामुळे पावसाचे पडणारे पाणी जमिनीमध्ये झिरपण्यास अडथळा निर्माण होतो. परिणामी नैसर्गिक भूजल पातळी पुनर्भरण होण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. या आधी जितके पाणी उपलब्ध होते तितकेचे पाणी आजही उपलब्ध होते परंतु मोठ्या प्रमाणावर वाढत जाणारी लोकसंख्या आणि पाण्याचा अपव्यय यामुळे पाण्याचा तुटवडा जाणवतो.


                एकूण उपलब्ध असलेल्या पाण्याचे प्रमाण आणि प्रत्यक्षात वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण पहिले तर पर्जन्यजल संचय करणे आणि पाण्याच्या व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पर्यायाने पर्जन्यजल संचयनाच्या प्रणालींचा अभ्यास करणे महत्वाचे आहे.

 

 

पर्जन्य जलसंचयन संकल्पना.

 

            पावसाळ्याच्या दिवसांत जमिनीवर पडलेले, स्रोतांमधून वाहून आलेले पावसाचे पाणी मानवनिर्मित उपाययोजना करून, विविध प्रकारच्या संरचना बांधून त्यात अडवणे, साठवणे आणि भूगर्भात जिरवणे आणि त्या पाण्याचा वापर पावसाळा संपल्यावर पुढचा पावसाळा येईपर्यंत माणसाला वापरासाठी, उद्योगासाठी, पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापर करता येईल या प्रकारची व्यवस्था करणे म्हणजेच जलसंधारण / पर्जन्यजल संचयन  होय

 

 

परिसरात असलेल्या
पर्जन्य जल संचयनासाठीच्या प्रणाली.



1. शेतजमिनीतील बांधबंदिस्ती:

        पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शेतात पडणारे पाणी वाहून जाऊ नये म्हणून शेतीच्या पेरणी आधी शेतामध्ये उतार असणाऱ्या भागामध्ये बंध घातला जातो. जे बांध उतारावर आडवे घातले जातात त्यांना मुख्य बांध असे म्हणतात आणि उभ्या बांधास बाजू बांध असे म्हटले जाते. पावसाचे पाणी भरून बांध फुटून जमिनीची धूप होऊ नये म्हणून हे बांध घातले जातात. या बांधांमुळे पावसाचे पाण्याचे संचयन होण्यास मदत होते. हे पाणी तिथेच जमिनीत मुरते आणि त्यामुळे त्या परिसरातील भूजलामध्ये वाढ होते.

 

‘पर्जन्य जल संचयन आणि त्याचे फायदे’ प्रकल्प | Parjanyajal sanchayan aani tyache fayade project
image credit: paryavarn book

2. ढाळीचे किंवा समपातळीचे बांध:

        ढाळीचे शेतातील वाफ्यांच्या बाजूने बांधले जातात. त्यानुसार समपातळी जैविक बांध , मातीचे बांध किंवा ढाळीचे मातीचे बांध यांच्या एकत्रित करणाणे समपातळी बंध बांधला जातो. पावसामुळे वाफ्यामध्ये येणारे पाणी हे वाफ्याच्या एका बाजूने जाण्यास याचा उपयोग होतो . तर या बांधांमुळे वेगाने वाहून जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह हळू केला जातो परिणामी पाणी जमिनीमध्ये जीरण्यास मदत होते. आणि परिसरातील विहिरी तलाव यांची भूजल पातळी वाढण्यास मदत होते. पावसाच्या पाण्याचे एक प्रकारे संचयनच होते.

 

3. मजगी:

        तीव्र डोंगरउतार असलेल्या जमिनीवर पाणी अतिशय वेगाने धावते. अशा ठिकाणी जमिनीत पाणी मुरवण्यासाठी जमिनीच्या उतारास आडव्या टप्प्याटप्प्यांची किंवा पायऱ्यांसारखी अर्धा भाग खोदून व अर्धा भाग भरुन तयार केलेली शेते म्हणजे मजगी. या डोंगर उतारावरील मजगी लांब अंतरावरून पाहिल्यास जणू काही डोंगरावरील

        पायऱ्या असल्याचा भास होतो. ज्या ठिकाणी मातीची खोली पुरेशी आहे व पाण्याची सोय उपलब्ध आहे अशा उताराचे मजगीत रूपांतर केले जाते. महाराष्ट्रात अतिपावसाच्या प्रदेशात डोंगरउतारावर जमिनीचे मजगीत रुपांतर केले जाते व भात खाचरे तयार करुन भात पिकाखाली जमीन आणण्यात येते. या पायऱ्यांच्या मजगीचे सपाट

        खाचरांची मजगी, आतील बाजूस उतार असलेली मजगी आणि बाहेरील बाजूस उतार असलेली मजगी असे प्रकार असतात.

 

‘पर्जन्य जल संचयन आणि त्याचे फायदे’ प्रकल्प | Parjanyajal sanchayan aani tyache fayade project
image credit: paryavarn book 


4. माती नाला बांध:

        माती नाला बांध हा पूर नियंत्रण तसेच घळ  यावर नियंत्रण मिळवण्यासाठी बांधला जातो. नाल्याच्या आजूबाजूच्या मातीची धूप होऊ नये आणि नाल्याचे पात्र विस्तारू नये यासाठी या प्रकारचा बांध घातला जातो. परिणामी पाण्याचे संचयन होते आणि हा तयार झालेला पाण्याचा साठ पिकांना पाणी देण्यासाठी वापरला जातो. परिणामी आजूबाजूच्या परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत होते.

 

‘पर्जन्य जल संचयन आणि त्याचे फायदे’ प्रकल्प | Parjanyajal sanchayan aani tyache fayade project
image credit: paryavran book 

5. सिमेंट कॉंक्रीट नालाबांधणी:

            पावसाचे पाण्याचे संचयन व्हावे दृष्टीनेआणि बंधाऱ्यामधून पाण्याची होणारी गळती रोखण्यासाठी सिमेंट कॉक्रीट नालाबांधणी या प्रणालीचा वापर केला जातो. सिमेंट नालाबांधामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात साठा वाढलेला असून त्यामुळे अनेक विहिरींतील आणि तलावांतील पाण्याची पातळी तसेच भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. सिमेंट बंधाऱ्याची  कामे दगडी बांधकामाऐवजी सिमेंट कॉंक्रीटचा वापर केल्यामुळे बांधाची गुणवत्ता वाढणार असून बांधाचे आर्युमानही वाढणार आहे.

 

‘पर्जन्य जल संचयन आणि त्याचे फायदे’ प्रकल्प | Parjanyajal sanchayan aani tyache fayade project
image credit: paryavarn book

6. नालाखोलीकरण

            सिमेंट कॉंक्रीट तसेच इतर प्रकारच्या नालाबांधणी बांधणीमध्ये जमा झालेले दगड, माती तसेच जमा होणारे इतर घटक पदार्थ यामुळे ते ते पूर्ण भरले जातात अशावेळी पावसाळ्यात पडणारे जास्तीच्या पाण्याचे नाल्यात संचयन न होता ते नाल्यावरून वेगानेजात राहते. अशा भरलेल्या बंधाऱ्यांचे पावसाला सुरुवात करण्याआधी गाळ उपसा केला जातो. आणि त्याची खोली वाढवली जाते. जेणेकरून पाण्याचे संचयन अधिक प्रमाणात व्हावे.

 

7.कुपनलिकेचे पुनर्भरण

            शेतातील तसेच गावामध्ये असणाऱ्या कुपनलीकेची पाणी पातळी वाढवण्यासाठी व तिचे पुनर्भरण करण्यासाठी घराच्या छपरावर पडणारे पाणी हे एका शोष खड्ड्यात सोडले जाते. यासाठी कुपनलीकेच्या सभोवती दोन मीटर रुंद आणि दोन मीटर खोल असा खड्डा खोदला जातो. कुपनलीकेच्या केसिंग पाईप ला बारीक छिद्रे पाडली जातात आणि या छीद्रांवर गाळणी बसवली जाते. आणि खड्डा दगड , गोटे आणि वाळूने काही प्रमाणात भरला जातो. या खड्ड्यात सोडलेले पाणी गाळले जाऊन ते पाईप मधून खाली जाऊन कुपनलीकेमध्ये या पाण्याचे संचयन होते.

 


पर्जन्यजल संचयनाचे फायदे


  •  शाश्वतता :

            पाण्याच्या स्त्रोतातील पाण्याच्या उपशापेक्षा पावसाळ्याच्या दिवसांत पाण्याचे संचयन करून पुनर्भरण केल्यास तसेच दरडोई पाणीवापरात कपात केली तर पाण्याचा शाश्वत पुरवठा होऊ शकेल.


  • ऊर्जा संधारण:

            पाण्याच्या व्यवस्थापनासाठी विजेचा वापर होतो. त्यासाठी 15 % वीज वापरली जाते. पर्जन्य जल संचयन केल्याने ऊर्जेचीही बचत होईल व ऊर्जासंधारण साधता येईल.


  • अधिवास संधारण:
            शेतातील शेततळ्यांमध्ये पर्जन्यजलसंचयन केल्याने गोड्या पाण्याचे जलसाठे अबाधित राहू लागले , ते कोरडे न पडल्याने तेथील सजीवांना संरक्षण मिळते.

  • अस्तित्वात असलेल्या पाण्याच्या स्रोताचे बळकटीकरण झाले.
  • परिसरातील पाण्याचा दर्जा सुधारण्यास मदत झाली.
  • विहीर किंवा बोअरवेल यांचे आयुष्य वाढायला लागल्याचे निदर्शनास आले.
  • परिसरात पाणी तुंबणे, पूर परिस्थिती निर्माण होणे, यांसारख्या समस्या कमी झाल्या.
  • पर्जन्य जल संचयन करून बोअरवेल पुनर्भरण केल्याने बोअरवेलच्या पाण्यामधील
  •  क्षार कमी होण्यास मदत होते पिण्यायोग्य करणे शक्य होते.
  • पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल चालू राहते.
  •   पाण्यासाठी पूर्णपणे सरकारी यंत्रणेवर अवलंबून राहावे लागत नाही.

 


प्रकल्प    निरीक्षणे


परिसरात पर्जन्यजल संचयनासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजना.


·       1. शेतजमिनीतील बांधबंदिस्ती:

·       2. ढाळीचे किंवा समपातळीचे बांध:

·       3. मजगी:

·       4. माती नाला बांध:

·       5. सिमेंट कॉंक्रीट नालाबांधणी:

·       6. नालाखोलीकरण:

·       7.कुपनलिकेचे पुनर्भरण



पर्जन्य जलसंचयनाचे परिसरात झालेले फायदे


·       परिसरातील विहिरींची पाणी पातळीत वाढ झाली.

·       कुपनलिकांचे पुनर्भरण करणे शक्य झाले.

·       जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरल्याने शेतीची सुपीकता वाढली.

·       उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याच्या तुटवडा जाणवला नाही.

·       पर्जन्यजल संचयन केल्याने उन्हाळ्यातील पाण्याची चिंता कमी झाली.



प्रकल्प    विश्लेषण


पर्जन्यजल संचयनामुळे परिसरातील कमी झालेला पाण्याचा तुटवडा.

 

‘पर्जन्य जल संचयन आणि त्याचे फायदे’ प्रकल्प | Parjanyajal sanchayan aani tyache fayade project

www.educationalmarathi.com

 

निष्कर्ष


Ø पर्जन्य जलसंचयन संकल्पना समजावून घेण्यास मदत झाली.

Ø परिसरात वापरल्या जाणाऱ्या पर्जन्यजलसंचयनाच्या प्रणालींचा सविस्तर अभ्यास करून माहितीची नोंद केली.

Ø पर्जन्य जलसंचयन प्रणालींमुळे परिसरातील भागात झालेल्या फायद्यांची माहिती मिळाली.

Ø पर्जन्य जलसंचायानाच्या विविध पद्धतींची माहितीचे संकलन केले.

Ø पर्जन्य जलसंचयनाचे महत्व समजावून घेतले.

 

 

 प्रकल्प  संदर्भ

 

v www.educationalmarathi.com

 

v www.mazaabhyas.com

 

v पर्यावरण पुस्तिका

------------------------------

 

विविध विषयांवरील प्रकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा

VIEW

PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील निळ्या रंगातील बाणावर क्लिक करा.

पाण्याचे स्थानिक स्त्रोत,प्रदूषणाची कारणे व प्रतिबंधात्मक उपाय प्रकल्प प्रकल्प 4.5MB pdf

PDF Password मिळविण्यासाठी DOWNLOAD वर क्लिक करा

DOWNLOAD

नवीन प्रकल्पांच्या Notification मिळवण्यासाठी Educationalमराठी चे You Tube Channel आत्ताच Sbscribe करा.

Subscribe Now ! It's Free

PDF DOWNLOAD कशी करावी हे खालील video मध्ये पहा.

1 comment

  1. Very useful
निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.