संगणक साक्षरता : काळाची गरज
संगणक साक्षरता : काळाची गरज | Sanganak saksharata kalachi garaj |
आजच्या
विज्ञान- तंत्रज्ञानाच्या युगात संगणक हा काळजी गरज बनला आहे. आता हे सर्वसामान्य
झाले आहे. काही वर्षांपूर्वी भीती व्यक्त केली जात होती की संगणक हा भारतीयांसाठी
मोठा शाप ठरेल. बेकारीची समस्या अधिक उग्र रूप धारण करेल ही भीती खोटी होती हे
आत्ता सिद्ध झाले आहे. आज असे एकही क्षेत्र नाही की जिथे संगणकाचा वापर होत नाही.
आजच्या काळात संगणकाला आपल्यापासून दूर ठेवणे शक्य आहे का?
संगणकाबाबत
अनेक तक्रारी आहेत. एकटा संगणक २५ ते ३० माणसांचे काम जलद गतीने करतो, ते सुद्धा
कोणतीही चूक न करत. त्यामुळे बेकारीच्या समस्येत भर पडेल. एवढेच नाही तर लहान मुले
संगणकावर खेळ खेळत बसतात आणि अभ्यासाचा अनमोल वेळ वाया घालवतात. संगणकाच्या
वेडापायी लोक घरात अडकून पडतात. बाहेर फिरायला, खेळायला जात नाहीत. पुस्तकांचे
वाचन होत नाही. तसेच संगणकाच्या अतिवापरामुळे दृष्टीवर वाईट परिणाम होतो.
छायाचित्रांची अदलाबदल करून एखाद्याची बदनामी करणे, अश्लील मजकूर एखाद्याला पाठवणे
यांसारख्या विकृतीही वाढीला लागतात. संगणकाच्या सहाय्याने गुन्हेगारांनी तर
गुन्ह्यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानच विकसित केले आहे. या प्रराचे खूप आक्षेप
संगणकाबाबत घेतले जातात.
संगणकावर
आपण कितीही आक्षेप घेतले तरी आज संगणक हा माणसाच्या दैनंदिन जीवनातील एक
अत्यावश्यक घटक झाला आहे. संगणकाला ज्ञानाचे भांडार म्हटले जाते करण आपल्याला हवी
असलेली माहिती त्वरित उपलब्ध होते मग ती कोणत्याही क्षेत्रातली असुदे. इंटरनेटच्या
सहाय्याने लॉक एकमेकांशी संवाद साधू शकतात. संगणकामुळे जग अगदी जवळ आले आहे. आपण
घरबसल्या दुसऱ्या देशात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांशी व्हिडीओ कॉलिंग च्या
माध्यमातून अगदी समोरासमोर भेटून बोलल्याप्रमाणे गप्पा मारू शकतो. अंतराळातील
घडामोडी तसेच बातम्या संगणकाच्या माध्यमातून समजून घेता येतात.
आज
संगणकाने माणसाचे सारे जीवनच व्यापून टाकले आहे. पोस्ट सेवा, बँका, आणि विविध
कार्यालयांतील सर्व कामे आत्ता संगणकाद्वारेच केली जातात. ग्राहकांच्या
खात्यामध्ये किती ठेव शिल्लक आहे हे आत्ता एका क्लिकवर समजते. रेल्वे, विमाने,
चित्रपट यांसारख्या तिकिटांचे आरक्षण संगणकाद्वारेच घरबसल्या करता येते. आजकाल
सर्व महत्वाच्या परीक्षा या संगणकाद्वारेच घेतल्या जातात त्यामुळे निकाल जलद आणि
अचूक लावणे शक्य होते. संगणकाद्वारे नोकरीसाठी, तसेच इतर कामासाठी, मुलाखती एवढेच
नाही तर आत्ता आयुष्याचा जीवनसाथी देखील या संगणकाच्या सहाय्याने शोधू शकतो. इतकेच
नाही तर, आत्ता कार्यालयातील कामे सुद्धा काही जन घरीच बसून करतात आणि इंटरनेट
च्या मदतीने कार्यालयात पाठवतात.
अशा
रीतीने दैनंदिन जीवनात पदोपदी संगणक आपल्याला उपयोगी पडत असल्याने प्रत्येकाने
संगणकाबाबत शिक्षण घेणे गरजेचे आहे , नव्हे ही तर काळाची गरज आहे. संगणकाची साथ
असेल तर कोणालाही कोणतेही काम अवघड होणार नाही. एकविसाव्या शतकात जगणाऱ्या
प्रत्येकाला संगणक विषयक माहिती असणे गरजेचे आहे करण संगणक साक्षरता नसेल, तर
पदवीधर सुशिक्षित देखील निरक्षर ठरेल. काळाची गरज ओळखूनच शिक्षण व्यवस्थेने आज
शालेय शिक्षणात संगणकीय शिक्षण समाविष्ट केले आहे.
मित्रांनो
निबंध लिहिताना खालील मुद्द्यांचा अवश्य वापर करा.
[मुद्दे:
संगणक
शिक्षण आजच्या काळाची गरज
संगणकाबाबत
गैरसमजुती
ज्ञानाचा
खजिना
इंटरनेट
, वेबसाईट आवश्यक
संगणकाचे
दैनंदिन जीवनातील स्थान
बँका,
कचेऱ्या सर्व व्यवहार संगणकाद्वारेच
आरक्षण,
परीक्षा आणि परीक्षांचे निकाल
मुलाखती,
महत्वाचे निकाल, आयुष्यातील जोडीदाराची निवड संगणकाद्वारेच
संगणक
साक्षरता नसेल तर शिक्षित माणूसही अशिक्षित.]
निबंध pdf फाईल downlod करण्यासाठी GO TO DOWNLOD PAGE बटन वर क्लिक करा.👇
हा
निबंध खालील प्रकारे देखील शोधू शकता.
संगणक
साक्षरता काळाची गरज निबंध
संगणक
साक्षरता निबंध
मराठी
निबंध
Sanganak
saksharata kalachi garaj nibandh
Sanganak
saksharata kalachi garj nibandh
Sanganak
saksharata nibandh
Marathi
nibandh
धन्यवाद