BUY PROJECT PDF Click Here!

ऐतिहासिक स्थळाला (किल्ला) भेट आणि तेथील पर्यावरणाचा अभ्यास प्रकल्प | Aitihasik sthala ( killa) bhet aani tethil paryavarnacha abhyas prakalp 11vi12vi

पर्यावरण प्रकल्प १२वी मराठी pdf पर्यावरण प्रकल्प मराठी Paryavarn prakalp Marathi 12thऐतिहासिक स्थळाला (किल्ला) भेट आणि तेथील पर्यावरणाचा अभ्यास प्रकल्
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

ऐतिहासिक स्थळाला (किल्ला) भेट आणि तेथील पर्यावरणाचा अभ्यास प्रकल्प


ऐतिहासिक स्थळाला भेट प्रकल्प pdf ११वी १२वी | किल्ल्याला भेट प्रकल्प माहिती | ऐतिहासिक स्थळाला किल्ल्याला भेट प्रकल्प कार्यपद्धती | ऐतिहासिक स्थळाला भेट प्रकल्प प्रस्तावना, विषयाची निवड, प्रकल्पाचे महत्व, प्रकल्प अहवाल लेखन 


Educationalमराठी या वेबसाईटवर ११वी,१२ वी पर्यावरण विषयक प्रकल्पांची पुढील मुद्यांच्या आधारे सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रकल्प प्रस्तावना, प्रकल्पाची उद्दिष्ट्ये, प्रकल्प विषयाचे महत्व, प्रकल्प कार्यपद्धती, विश्लेषण, निरीक्षणे, निष्कर्ष, अहवाल लेखन, इत्यादी मुद्द्यांच्या आधारे सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.



        प्रश्न: जवळच्या ऐतिहासिक ठिकाणाला भेट द्या (किल्ला) व खालील माहिती लिहा. किती लोक रोज भेट देतात , त्यांचा भेटीचा हेतू , त्या ठिकाणचे ऐतिहासिक महत्व,आणि तेथील पर्यावरणाचे मुद्दे.

ऐतिहासिक स्थळाला भेट प्रकल्प pdf ११वी १२वी | किल्ल्याला भेट प्रकल्प माहिती | ऐतिहासिक स्थळाला किल्ल्याला भेट प्रकल्प कार्यपद्धती | ऐतिहासिक स्थळाला भेट प्रकल्प प्रस्तावना, विषयाची निवड, प्रकल्पाचे महत्व, प्रकल्प अहवाल लेखन


प्रस्तावना

आपल्या भारत देशाला अनेक ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभला आहे. आपल्या महाराष्ट्रातील असणारे किल्ले आणि ऐतिहासिकठिकाणे आपल्याला  इतिहासातल्या त्या पराक्रमांची , शौर्यगाथेची ओळख करूनदेत असतात. लोक एखादा किल्ला पाहण्यासाठी त्याबाबत माहिती घेण्यासाठी तर काही जण सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी या किल्ल्यांवर जातात मात्र ते या ऐतिहासिक ठिकाणांचे असलेले पावित्र्य जपायला विसरतात. या ऐतिहासिक ठिकाणांच्या पावित्र्याची जपणूक करणे अतिशय महत्वाचे आहे.

पर्यटनासोबतच सर्वांनी ऐतिहासिक ठिकाणी असलेल्या नैसर्गिक संपत्तीचे, अधिवासाचे रक्षण कसे होईल, तेथील पर्यावरण शुद्ध कसे ठेवता येईल याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आज निर्माण झाली आहे. वाढत्या पर्यटनामुळे अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण होत आहेत. त्या निर्माण होऊ नयेत म्हणून योग्य ती काळजी घेऊन , योग्य नियमावली तयार करून त्यानुसार ऐतिहासिक ठिकाणी किंवा इतर पर्यटनाच्या ठिकाणी भेट देताना पर्यावरणीय नियमावलीचा अवलंब करणे करणे गरजेचे आहे. जेणेकरून त्या ठिकाणाचा ऐतिहासिक वारसा तसाच टिकून राहील.

आज आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून ‘ऐतिहासिक स्थळाला (किल्ला) भेट आणि तेथील पर्यावरणाचा अभ्यास’ याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत.



अनुक्रमणिका

 

 

अ.क्र.

घटक

१)

विषयाचे महत्व

२)

प्रकल्पाची उद्दिष्टे

३)

प्रकल्प कार्यपद्धती

४)

ऐतिहासिक महत्व

५)

ऐतिहासिक स्थळाच्या भेटीचा हेतू

६)

पर्यावरणीय मुद्दे

७)

निरीक्षणे

८)

विश्लेषण

९)

निष्कर्ष

१०)

संदर्भ

११)

प्रकल्पाचा अहवाल


विषयाचे महत्व

 

पर्यटन विकासात ऐतिहासिक स्थान महत्वाची आहेत . ऐतिहासिक घटक , घटना , याबद्दल लोकांना कुतुहल व आस्था असते . अशा स्थळांना भेटी देण्याची इच्छा पर्यटकांना तेथील इतिहास माहित असेल तर होणे सहाजिकच आहे . म्हणुन महाराष्ट्रातील रोड , कोट व किल्ले यांना प्रत्येक महाराष्ट्रीयन न चुकता भेट देतो . कारण मराठ्यांचा इतिहास हा या किल्यांचा इतिहास आहे . भौगोलिक पर्यटन स्थळे ज्याप्रमाणे विशिष्ट भौगोलिक महत्वामुळे विकसित होतात . ऐतिहासिक स्थाने त्याच्या ऐतिहासिक महत्वामुळे विकसित होतात . महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत . आज ही स्थळे पर्यटकाचे आकर्षण बनलेली असून पर्यटन स्थळे म्हणून प्रसिध्दीस आलेली आहेत.

                वाढते पर्यटन आणि पर्यटकांची पर्यावरण पूरक नसलेली वागणूक यांमुळे ऐतिहासिक पर्यटन स्थळांच्या नैसर्गिक वारशाचा ऱ्हास होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य आढळून येते , त्याच बरोबर ध्वनी प्रदुषणा सारख्या समस्यांमध्ये वाढ होते. हे सर्व कमी करण्यासाठी प्रत्येकाने पर्यावरणाबाबत जागरूक होणे गरजेचे आहे  . जेणेकरून आपल्या पर्यटना बरोबरच तेथील असणाऱ्या नैसर्गिक अधिवासाचे , सौंदर्याचे देखील रक्षण होईल. म्हणून या प्रकल्प विषयाचा अभ्यास करणे खूप महत्वाचे आहे.

 


प्रकल्पाची उद्दिष्टे

 

·       एका ऐतिहासिक स्थळाला भेट देऊन त्याची माहिती एकत्र करणे.

·       ऐतिहासिक ठिकाणी रोज किती लोक भेट द्यायला येतात याची माहिती मिळवणे.

·       किल्ल्याला भेट देण्यामागचा पर्यटकांचा हेतू काय असतो याबाबत माहिती मिळवणे.

·        ऐतिहासिक ठीकाणाच्या परिसरातील पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक अशा मुद्यांचा अभ्यास करणे.

·       तेथील पर्यावरणाबात अधिक माहिती जाणून घेणे.

·       त्या स्थळाचे ऐतिहासिक महत्व जाणून घेणे.

·       ऐतिहासिक स्थानाबाबत अधिक माहिती इतरांना देखील करून देणे.

 

 


प्रकल्प कार्यपद्धती


‘ऐतिहासिक स्थळाला (किल्ला) भेट आणि तेथील पर्यावरणाचा अभ्यास’ या विषयावरचा अभ्यास करत असताना मी मुलाखत आणि क्षेत्रभेट  या कार्यपद्धतीचा वापर माहिती मिळवण्यासाठी केला. प्रकल्पाबाबत माहिती मिळवत असताना या विषयावर प्रकल्प करणे का गरजेचे आह?  त्याचे महत्त्व काय आहे?  इत्यादी माहिती जाणून घेतली. या प्रकल्पाची माहिती पुढील मुद्यांच्या आधारे संकलित करण्यात आली. ऐतिहासिक स्थळाला रोज किती लोक रोज? त्यांचा भेटीचा हेतू काय  असतो , त्या ठिकाणचे ऐतिहासिक महत्व, आणि तेथील पर्यावरणाचे मुद्दे कोणते आहेत. इ. यावर आधारित मुद्द्यांचा वापर करून प्रकल्पाच्या विषयाला अनुसरून योग्य त्या मुद्द्यांच्या आधारे या प्रकल्पात माहिती समविष्ट केली आहे.

या प्रकल्पाबाबत माहिती संकलित करण्यासाठी व ऐतिहासिक ठिकाणच्या पर्यावरणीय स्थिती जाणून घेण्यासाठी मी किल्ल्याच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना एका प्रश्नावली द्वारे माहिती विचारून त्या माहितीचे संकलन करण्यात आले. त्याचबरोबर ऐतिहासिक ठिकाणी भेटी देण्यासाठी आलेल्या पर्यटकांकडून त्यांच्या भेटीचा हेतू मुलाखतीद्वारे जाणून घेण्यात आला व मिळवलेली संकलित करण्यात आली. किल्ल्याच्या परिसरात राहणाऱ्या लोकांकडून या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व काय आहे. आणि तेथील पर्यावरणाबाबत अधिक माहिती जाणून घेतली.

माहिती मिळवताना तयार झालेल्या तयार मुद्द्यांबाबत अधिक माहिती सविस्तर माहिती जाणून घेता यावी यासाठी मी आंतरजालावर (इंटरनेटवर) उपलब्ध असलेल्या संकेतस्थळांचा वेबसाईटचा वापर केला. त्यांच्या माध्यमातून प्रकल्पाबाबत अधिक माहिती मिळवणे शक्य झाले. संकलित केलेल्या माहितीची मुद्देसूद मांडणी केली व ती माहिती प्रकल्पामध्ये पुढे समाविष्ट करण्यात आली आहे. सदर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्रकल्पाचे निरीक्षणे विश्लेषण आणि निष्कर्ष यांची नोंद केली.

 

परिसरातील लोकांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावलीचा नमुना

 

सर्वेक्षण ठिकाण : रत्नदुर्ग किल्ला परिसर (रत्नागिरी)

नमुनाः परिसरातील  व्यक्तींना विचारलेली प्रश्नावली.

परिसरातील मी या प्रकल्पाची माहिती जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण या अभ्यासपद्धतीचा अवलंब केला आहे . ऐतिहासिक ठिकाणाचे महत्व , आणि तेथील पर्यावरणीय घटकांवरील परिणाम काय होत आहे. हे या सर्वेक्षणाच्या माध्यमातून स्पष्ट होईल .

सर्वेक्षणाची प्रश्नावली खालीलप्रमाणे :

 

१ )वाढत्या पर्यटनामुळे किल्याच्या परिसरातील पर्यावरणात बदल झाले आहेत का?

उत्तर: हो किंवा नाही.

२ ) या ठिकाणी कायम पर्यटकांची ये- जा असते का ?

उत्तर: हो किंवा नाही .

३ ) पर्यटकांमुळे येथील परिसर अस्वच्छ झाला आहे का ?

 उत्तर: हो किंवा नाही .

४ ) किल्ल्याला भेट देण्यासाठी येणारे पर्यटक येथील पर्यावरणाची काळजी घेतात का?

उत्तर: हो किंवा नाही .

५) रोजच्या वाहनाच्या आवाजामुळे येथील परिसरामध्ये ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढली आहे का ?

उत्तर: हो किंवा नाही .

६) किल्ल्याचे नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी प्रयात्न केले जातात का ?

उत्तर: हो किंवा नाही .

७) या ठिकाणी रोज पर्यटकांची येजा असते का?

 उत्तर: हो किंवा नाही .

८ ) पूर्वीपेक्षा येथील परिसर अस्वच्छ झाला आहे का?

 उत्तर: हो किंवा नाही .

९ )या ठिकाणी पर्यावरणाचे रक्षण होण्याच्या दृष्टीने नियम पाळले जातात का ?

उत्तर: हो किंवा नाही .

१०) पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून या ठिकाणी काही नियमावली तयार केली आहे  का?

   उत्तर: हो किंवा नाही.


ऐतिहासिक स्थळाला भेट प्रकल्प pdf ११वी १२वी | किल्ल्याला भेट प्रकल्प माहिती | ऐतिहासिक स्थळाला किल्ल्याला भेट प्रकल्प कार्यपद्धती | ऐतिहासिक स्थळाला भेट प्रकल्प प्रस्तावना, विषयाची निवड, प्रकल्पाचे महत्व, प्रकल्प अहवाल लेखन 


ऐतिहासिक महत्व


रत्नदुर्ग किल्ल्याची बांधणी ही बहामनी काळातील आहे. हा किल्ला इसवी सन १६६० पर्यंत आदिलशाहीच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांनी १६७० च्या सुमारास कोकणात स्थित असणारे अनेक किल्ले स्वराज्यात आणले त्याचबरोबर हा किल्ला पण स्वराज्यात सामील करून घेण्यात आला. १७५५ मधे रत्नदुर्ग हा किल्ला आंग्रें यांच्या ताब्यात होता, आणि नंतर हा किल्ला पेशव्यांच्या अंमलाखाली होता. १९५० मधे या किल्ल्यावरील भगवती देवीच्या मंदिराची दुरुस्ती केली १९८९ मधे या किल्ल्याची डागडुजी करून घेण्यात आली. कित्येक शतके रत्नागिरी परिसराचा राखणदार म्हणून आणि अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या या किल्ल्याच्या उंचीवरून दिसणाऱ्या मोहक निसर्ग सौंदर्यासाठी तेवढाच प्रसिद्ध आहे.

 


ऐतिहासिक स्थळाच्या भेटीचा हेतू


किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून  आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला समोरच सुबक बांधणीचे श्री भगवतीचे देवीचे शिवकालीन मंदिर स्तिथ आहे. भगवती देवीच्या मंदिरापासून  समोर पुढे गेल्यावर एका ठिकाणी संरक्षक भिंत असेलेली जागा आढळते ही संरक्षित जागा म्हणजे तीन तोंडाचा भुयारी मार्ग होय. हा भुयारी मार्ग सध्या चालू नसला तरीही दीपगृहाच्या बाजूने किल्ल्याकडे येत असताना या भुयाराचा शेवट ज्या समुद्राच्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी प्रचंड मोठी गुहा असेलेली पाहायला मिळते. या संरक्षित ठिकाणाच्या बाजूने पुढे गेल्यानंतर समुद्राचे विहंगम दृश्य दाखवणारा बुरुज पाहायल मिळतो या बुरुजाचे नाव रेडे बुरुज आहे.  या ठिकाणी एक स्तंभ सुद्धा उभारला गेला आहे.

रत्नागिरी शहरातील बंदराजवळ रत्नदुर्ग हा किल्ला स्थित आहे. रत्नदुर्ग हा किल्ला किल्ला १२व्या शतकापासून कणखर पणे उभा आहे. रत्नागिरी शहराच्या पश्चिम दिशेला १ किलोमीटर अंतरावर स्थित असणारा हा किल्ला सुमारे १२११ मी. लांब आणि ९१७ मी. रुंद अशा विस्तृत जागेवर  १२० एकर इतक्या क्षेत्रावर पसरलेला आहे. या किल्ल्याच्या बालेकिल्ल्याला एकूण ९ बुरुज आहेत तर या किल्ल्याच्या संपूर्ण क्षेत्रात एकूण २८ ते २९  इतके बुरुज पाहायला मिळतात. या किल्ल्याची विभागणी  पेठ किल्ला, दीपगृह आणि बालेकिल्ला अशा तीन भागांमध्ये झाली आहे. रत्नदुर्ग किल्ला हा तीनही बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेला आहे. या किल्ल्याच्या एका बाजूला दीपगृह आहे. या किल्ल्यावरून समुद्राचे आणि आजूबाजूच्या परिसराचे सौंदर्य न्याहाळता येते. पायथ्यापासून १०० मी. इत्याक्या उंचीवर स्थित असणारा हा रत्नदुर्ग किल्ला चढून जायला अगदी सोपा असून या किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत वाहन घेऊन जाता येते.

रत्नदुर्ग किल्ल्याच्या तीन भागांपैकी दुसरा भाग  दीपगृह परिसर आहे. किल्ल्याच्या उजव्या दिशेस असलेला उताराचा भाग हा कोळी वस्तीतून रत्नागिरीच्या भगवती बंदराच्या दिशेने जातो. तर किल्ल्याच्या डाव्या दिशेस असणारा रस्ता हा दीपगृहाच्या दिशेने जातो. याच रस्त्यावर डाव्या बाजूला रतनगिरी बाबांची समाधी असलेली पाहायला मिळते  त्यांच्या नावावरूनच या किल्याला रत्नदुर्ग असे नाव पडले  असे अंदाज दर्शविला जातो. किल्ल्याच्या परिसरात असणाऱ्या दीपगृहाला भेट देण्यासाठी पूर्व परवानगी घ्यावी लागते. दीपगृहाच्या बाजूला असणाऱ्या बुरुजावर चार तोफा आढळतात त्यापैकी दोन तोफा या ४ फुट लांबीच्या आहेत तर उरलेल्या दोन तोफा या १२ फुट इतक्या लांबीच्या आहेत.

गडाचा शेवटचा आणि  तिसरा भाग म्हणजे भगवती देवीचे मंदिर हा आहे. गडाच्या या बालेकिल्ल्यामध्ये नुतानिकरण केलीली एक भक्कम तटबंदी असलेली पाहायला मिळते त्या तटबंदीला एकूण ११ बुरुज बांधलेले आढळतात. समुद्र सपाटीपासून सुमारे 200 फुट उंचीवर असणाऱ्या या किल्याचा दरवाजा सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उघडा असतो. भगवती मंदिर हा परिसर गडावरील सर्वात मोठी वास्तू आहे.



पर्यावरणीय मुद्दे

पर्यटन व पर्यावरणाचे प्रदूषण

पर्यावरणीय प्रदूषण व पर्यटन यांचा जवळचा संबंध आहे . वास्तविक पर्यावरण प्रदूषण ही एक जागतिक गंभीर समस्या बनलेली आहे . त्यामध्ये पर्यटनाच्या विकासामुळे भर पडत आहे . यामध्ये ऐतिहासिक किल्ले, वास्तू . भारतातील अनेक किनाऱ्यावरील पुळणी किंवा बिचेस प्रदूषणाच्या शिकार बनलेल्या आहेत . जंगलातील तळी , तलावे , सरोवरे , याचे प्रदूषण तेथिल पर्यटकांच्यामुळे होते . पर्यटकांच्या मोटारी , दुचाकी , तीनचाकी वाहने , विमाने , रेल्वे यामुळे ध्वनीचे व हवेचे प्रदूषण ही वाढत आहे .

 

ध्वनी प्रदूषण

 

वास्तविक नागरी वस्तीपासून दूर शांत वनाच्या नीरव शांततेच्या सानिध्यात , पशुपक्ष्यांच्या सहवासात काही काळ आरामात घालवावा ही पर्यटनाची मूळ प्रेरणा आहे . शहरांच्या गोंधळ गोंगाटापासून दूर जावे असे प्रत्येकाला वाटले . यातूनच पर्यटन स्थळांचा विकास झाला . परंतु होय पर्यटनस्थळे आज ध्वनीप्रदूषणाची आगर बनलेली आढळतात . या गोंगाटापासून केवळ पर्यटक नव्हे तर जंगलातील पशुपक्षीही सुटलेले नाहीत . पर्यटकांच्या वाहनाचा आवाज , यांचा गोंधळ घोळक्याने मोठ्या आवाजात म्हटलेली गाणी यामुळे ही पर्यटन स्थळे ही   गोंगाट व गर्दीची ठिकाणे झालेली आहेत . जंगलव्याप्त भागात अशा आवाजाचा तेथील पशुपक्ष्यांवर विपरीत परिणाम होतो व त्यांची प्रजनन क्षमता कमी होते .

 


निरीक्षणे

सर्वेक्षणानंतर लोकांकडून मिळालेला प्रतिसाद खालील तक्त्यामध्ये दर्शविला आहे

१ )वाढत्या पर्यटनामुळे किल्याच्या परिसरातील पर्यावरणात बदल झाले आहेत का?

२ ) या ठिकाणी कायम पर्यटकांची ये- जा असते का ?

४ ) किल्ल्याला भेट देण्यासाठी येणारे पर्यटक येथील पर्यावरणाची काळजी घेतात का?

५) रोजच्या वाहनाच्या आवाजामुळे येथील परिसरामध्ये ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढली आहे का ?

६) किल्ल्याचे नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी प्रयात्न केले जातात का ?

७) या ठिकाणी रोज पर्यटकांची येजा असते का?

८ ) पूर्वीपेक्षा येथील परिसर अस्वच्छ झाला आहे का?

९ )या ठिकाणी पर्यावरणाचे रक्षण होण्याच्या दृष्टीने नियम पाळले जातात का ?

१०) पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून या ठिकाणी काही नियमावली तयार केली आहे  का?


 सर्वेक्षणानंतर लोकांकडून मिळालेला प्रतिसाद खालील तक्त्यामध्ये दर्शविला आहे


प्रश्न क्रमांक

प्रतिसाद

हो

नाही

७०%

३०%

१००%

००%

६०%

४०%

८०%

२०%

७०%

३०%

९०%

१०%

७०%

३०%

८०%

२०%

६०%

४०%

१०

१००%

००%

















परिसरातील लोकांच्या मुलाखती आणि प्रश्न उत्तरे यांच्या माध्यमातून असे निदर्शनास आले की या ऐतिहासिक पर्यटन ठिकाणी विविध  वस्तू व खाद्य पदार्थ लोकांना उपलब्ध असतात त्यामध्ये प्लास्टिक आणि थर्माकोल चे प्रमाण जास्त असते. प्लास्टिक च्या पाण्याच्या बाटल्या ह्या सर्वत्र आढळून येतात. परिणामी शुद्ध पाण्याचे नैसर्गिक झरे, हिरव्या झाडीमध्ये , तसेच रस्त्यांवर प्लास्टिक बाटल्या पसरलेल्या दिसतात. त्याच प्रमाणे जेवणासाठी किंवा नाष्ट्यासाठी वापरल्या गेलेल्या डीश, थर्माकोल ची ताटे रस्त्यवर , जंगलात, ओढे नाल्यात विखुरलेली आढळतात. त्याचबरोबर चोकोलेट, कॅरीबग, बिस्किटांचे कागद, सिगारेट या सगळीकडेच पडलेल्या दिसतात. यावरून असे निदर्शनास येते की पर्यटनाला जाणारे लोक फक्त मौज मजा करण्यासाठी जातात आणि तेथील ठिकाणाचे नैसर्गिक सौंदर्य बिघडवून टाकतात.



विश्लेषण


‘रत्नदुर्ग’ या ऐतिहासिक किल्ल्याला वर्षभर भेट देणाऱ्या लोकांची टक्केवारी हृतुमानानुसार विभागणी


ऐतिहासिक स्थळाला (किल्ला) भेट आणि तेथील पर्यावरणाचा अभ्यास प्रकल्प | Aitihasik sthala ( killa) bhet aani tethil paryavarnacha abhyas prakalp 11vi12vi

 

 

निष्कर्ष

·       एका ऐतिहासिक स्थळाला भेट देऊन त्याची माहिती संकलित केली.

·       ऐतिहासिक ठिकाणी रोज किती लोक भेट द्यायला येतात याची माहिती मिळवली.

·       किल्ल्याला भेट देण्यामागचा पर्यटकांचा हेतू काय असतो याबाबत माहिती जाणून घेणे शक्य झाले.

·        ऐतिहासिक ठीकाणाच्या परिसरातील पर्यावरण विषयक घटकांचा अभ्यास करून त्याची माहिती संकलित केली.

·       त्या स्थळाचे ऐतिहासिक महत्व जाणून घेऊन त्या माहितीचे संकलन केले.



 

संदर्भ


Ø www.educationalmarathi.com

Ø www.mazaabhyas.com


प्रकल्प अहवाल


आपल्या महाराष्ट्रातील असणारे किल्ले आणि ऐतिहासिकठिकाणे आपल्याला  इतिहासातल्या त्या पराक्रमांची , शौर्यगाथेची ओळख करूनदेत असतात. लोक एखादा किल्ला पाहण्यासाठी त्याबाबत माहिती घेण्यासाठी तर काही जण सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी या किल्ल्यांवर जातात मात्र ते या ऐतिहासिक ठिकाणांचे असलेले पावित्र्य जपायला विसरतात. यामुळे ऐतिहासिक ठिकाणी असलेल्या पर्यावरणाचा काही प्रमाणावर ऱ्हास होतो.

मी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये पर्यावरण या विषयाचा प्रकल्प करण्यासाठी ‘‘ऐतिहासिक स्थळाला (किल्ला) भेट आणि तेथील पर्यावरणाचा अभ्यास’. या विषयाबाबत माहिती मिळवण्यासाठी मुलाखत, क्षेत्रभेट व सर्वेक्षण या कार्यपद्धतीचा अवलंब केला. हा प्रकल्प करत असताना निवडलेल्या ऐतिहासिक स्थळाचे ऐतिहासिक महत्व काय आहे, या ठिकाणाला दरवर्षी किती प्रमाणात पर्यटक भेट देतात तसेच या ठिकाणच्या पर्यावरणीय समस्या या मुद्द्यांच्या आधारे माहितीचे संकलन करण्यात आले.

प्रकल्पाच्या विषयानुसार त्या ठिकाणाला भेट देण्यासाठी येणारे वर्षभरातील पर्यटक तसेच ते कोणत्या ऋतुमध्ये किती प्रमाणात येतात याची टक्केवारी तयार करून ती प्रकल्पामध्ये समाविष्ट करण्यात आली. प्रकल्प करताना मिळवलेल्या माहितीच्या आणि कार्यपद्धतीमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नावलीतील प्रश्नाच्या उत्तरांवरून ऐतिहासिक ठिकाणी असलेल्या पर्यावरणीय समस्या तसेच इतर माहिती जाणून घेऊन त्याद्वारे योग्य त्या निरीक्षणाची नोंद करण्यात आली. हा प्रकल्प करत असताना वाढत चाललेल्या पर्यटनासोबतच वाढते प्रदूषण हा मुद्दा निदर्शनास आला. त्यामुळे पर्यटनाबरोबरच पर्यावरणाची काळजी घेणे तितकेचे महत्वाचे आहे.

मिळवलेल्या माहितीच्या आधारे प्रकल्पाच्या निरक्षणाची नोंद केली. तसेच निष्कर्ष काढण्यात आला. अशा प्रकारे पर्यावरण विषयाचा हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात आला.


११वी , १२वी पर्यावरण प्रकल्प विषयांची यादी 




प्रकल्प विषयांची यादी

आपत्ती व्यवस्थापन प्रकल्प

येथे क्लिक करा.

पाण्याचे स्थानिक स्त्रोत प्रदूषणाची करणे व प्रतिबंधात्मक उपाय प्रकल्प

येथे क्लिक करा.

टाकाउ कचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन प्रकल्प

येथे क्लिक करा.

सौरउर्जा वापर काळाची गरज प्रकल्प

येथे क्लिक करा.

पर्यावरण संरक्षण करणाऱ्या संस्था आणि त्यांच्या कामाबाबत माहिती प्रकल्प

येथे क्लिक करा.

परिसरात सापडणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पतींचे महत्व प्रकल्प

येथे क्लिक करा.

प्लास्टिक पुनर्चक्रीकर्ण प्रक्रिया प्रकल्प

येथे क्लिक करा.

सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती प्रकल्प .

येथे क्लिक करा.

क्षेत्रभेट प्रकल्प

येथे क्लिक करा.

१०

दैनंदिन जीवनातील विज्ञान प्रकल्प

येथे क्लिक करा.

११
 

स्थानिक उद्योगाचे त्याच्या भोवतालच्या पर्यावरणावर होणारे परिणाम प्रकल्प

येथे क्लिक करा.

१२

रासायनिक खतांचा वाढता वापर आणि घातक परिणाम प्रकल्प

येथे क्लिक करा.

१३

घनकचरा वर्गीकरण व व्यवस्थापन प्रकल्प

येथे क्लिक करा.

१४

लोकसंख्या वाढ ग्रामीण व शहरी प्रकल्प

येथे क्लिक करा.

१५

पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे भूजल पातळीत झालेली घट प्रकल्प

येथे क्लिक करा.

१६

जलप्रदूषण समस्येचे गांभीर्य अभ्यासणे व जलसुरक्षा  प्रकल्प

येथे क्लिक करा.

१७

औद्योगिक प्रदूषण प्रकल्प

येथे क्लिक करा.

१८

नैसर्गिक संसाधने त्यांचे व्यवस्थापन व संवर्धन प्रकल्प

येथे क्लिक करा.

१९

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने प्रकल्प

येथे क्लिक करा.


पर्यावरण प्रकल्प १२ वी विषय pdf
पर्यावरण प्रकल्प विषयाची निवड
पर्यावरण प्रकल्प कार्यपद्धती
पर्यावरण प्रकल्प १२वी मराठी pdf
पर्यावरण प्रकल्प मराठी
Paryavarn prakalp Marathi 12th
Paryavarn prakalp pdf
Paryavarn prakalp karypadhati

विविध विषयांवरील प्रकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा

VIEW

PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील निळ्या रंगातील बाणावर क्लिक करा.

ऐतिहासिक स्थळ भेट आणि तेथील पर्यावरणाचा अभ्यास.pdf प्रकल्प 5.0 MB .pdf

PDF Password मिळविण्यासाठी DOWNLOAD वर क्लिक करा

DOWNLOAD

नवीन प्रकल्पांच्या Notification मिळवण्यासाठी Educationalमराठी चे You Tube Channel आत्ताच Sbscribe करा.

Subscribe Now ! It's Free

PDF DOWNLOAD कशी करावी हे खालील video मध्ये पहा.

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.