मी पाहिलेला अपघात
मार्च महिन्यातील एका दिवसाची
घटना आहे. सकाळची वेळ होती. सगळे लोक आपापल्या कामांमध्ये व्यस्त होते. मी
परीक्षेचा अभ्यस करण्यात मग्न होतो.
मी पाहिलेला अपघात प्रसंग लेखन मराठी निबंध / मी पाहिलेला अपघात निबंध इन मराठी / Mi pahilela apghat Marathi essay / Mi pahilela apghat
इतक्यातच अचानक ‘आग...आग... वाचवा ... वाचवा...., असा जोर जोरात ओरडण्याचा आवाज माझ्या कानावर आला. मी घराच्या खिडकीतून बाहेर डोकावून पाहीलेतर, समोरच्या घरामध्ये आग लागली होती.उंचच उंच आगीचे लोट उठत होते. आगीचा तो भडका बघून काळजात धस्स होत होत. धुराचे ढग आकाशात जात होते. सकाळी हवेचा जोर जरा जास्तच असल्याने आग अधिकच भडकत चालली होती. आगीची बातमी कळताच आसपासच्या परिसरातील लॉक आग विझवण्यासाठी धावून आले. कोणी बादलीने आगीवर पाणी फेकत होते तर कोणी वाळू टाकून आग विझवण्याचा प्रयत्न करत होता. आत्ता पोलिस सुद्धा घटनासाठली दाखल झाले होते, पोलिसांनी लोकांच्या गर्दीला तेथून बाजूला केले.
तेवढ्यातच सायरन चा आवाज करत
अग्निशमन दलाची आग विझावणारी गाडी आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी लागेचः आपले काम
सूरु केले. त्यांनी भडकत्या आगीवर आपणयाचा जोराचा फवारा मारायला सुरुवात केली.
अग्निशमन दलाचे दोन जवान अग्निशमन गाडीच्या शिडीच्या सहय्याने आग लागलेल्या
घरामध्ये कसेबसे आत गेले आणि लगेच दोन मुल आणि एका बेशुद्ध महिलेला बाहेर घेऊन
आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीमध्ये अडकलेल्या घरातील इतरही लोकांचे जीव
वाचवले.
काही लोक आगीमध्ये जास्त
प्रमाणात भाजले गेले होत. त्यांना लगेच दवाखान्यात घेऊन जाणे गरजेचे होते.
रुग्णवाहिकेद्वारे त्यांना दवाखान्यात पोहोचवले गेले.
इतक्यातच ‘धडाम’ असा मोठा आवाज
करत आग लागलेल्या घराचा एक भाग कोसळला. घरातील माणसांचे नशीब बलवत्तर की अग्निशमन
दलाच्या जवनंनी सगळ्या लोकांना घराबाहेर काढले होते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी
झाली नाही. परंतु लाखोंची संपत्त्ती जळून खाक झाली.
अपघातग्रस्त घरात राहणारे लोक
जड अंतकरणाने जळत असलेल्या आपल्या घराकडे पाहत होते. ते आपल्या नशिबाला दोष देत
होते. ते विचार करत होते की आत्ता त्यांचे काय होईल? ते पुन्हा कशी काय गृहस्थी
उभी करणार?
हा अपघात पाहून माझे मन भयभीत
झाले होते. हा अपघात होऊन दोन महिन्र होऊन गेले आहेत, पण आगीचे लोट आणि काळ्याकुट्ट
धुराचे लोट ते भयानक दृश्य आजही माझ्या डोळ्यांसमोर दिसते.
हा तुमच्या मित्र मैत्रीणींसोबत
देखील हा निबंध शेअर करा.
विद्यार्थी मित्रांनो हा निबंध
लिहिती असताना खालील मुद्यांना अनुसरून निबंधाचे लेखन करा.
[मुद्दे:
परीक्षेची तयारी
आगीचे दृश्य
आग नियंत्रणात येणे
आगीचे कारण
अपघाताचा मनावर पडलेला प्रभाव
शेवट.]