मी शिक्षणमंत्री झालो तर...
उत्तम शिक्षण व्यवस्था ही समाजाची तसेच राष्ट्राच्या विकासाचा पाया आहे. देशातील शिक्षण विभागाची जबाबदारी ही प्रत्येक राज्याच्या शिक्षणमंत्र्यावर असते. चालू शिक्षण व्यवस्थेमध्ये आवश्यक ते बदल करणे, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या हिताचे शैक्षणिक निर्णय घेणे. हे सर्व अधिकार शिक्षणमंत्र्यांना असतात. वर्तमान पत्रातील विद्यार्थांच्या हिताचे निर्णय न घेतल्याने झालेल्या परिणामांची बातम्या वाचल्या की माझ्या मनात विचार येतो की, मीच शिक्षणमंत्री झालो तर..., तर मी स्वताला खूपच भाग्यवान समजेन, कारण या माध्यमातून का होईना मला एक प्रकारची देशसेवा करण्याची संधी मिळेल.
![]() |
मी शिक्षणमंत्री झालो तर... | Mi shikshanmantri zalo tr.. |
मी शिक्षणमंत्री झालो तर, तर मी देशाची शिक्षण
व्यवस्था सर्वश्रेष्ठ कशी होईल आणि विद्यार्थांना कमीत कमी शैक्षणिक खर्चामध्ये शिक्षण
कसे घेता येईल. या दृष्टीने योजना तयार करेन. आपल्या समाजात तसेच आपल्या देशातील
विविध भागांचे सर्वेक्षण केले तर भयानक वास्तव आपल्या समोर येते. एम.एस.सी आणि एम.ए.
यांसारख्या पदव्या मिळवलेले युवक त्यांच्याकडे पदवी उत्तीर्ण चे प्रमाणपत्र असून
सुद्धा नोकरी मिळावी यासाठी मुलाखती देत वणवण फिरताना दिसत आहेत. आज समाजात अनेक
पदवीप्राप्त विद्यार्थ्यांवर बेकार म्हणून राहण्याची वेळ आली आहे. स्वतःच्या
पोटाची खळगी भरण्यासाठी काही वेळेला त्यांना अशीही कामे करावी लागतात की त्या
कामांचा आणि त्यांनी प्राप्त केलेल्या पदवीचा काडीमात्र संबंध नसतो. अशाप्रकारे
पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी घेलेली मेहनत पाण्यात जाते. मी शिक्षणमंत्री
झालो तर अशी परिस्थिती उद्भवू देणार नाही. डिजिटल आणि तंत्रशिक्षण यावर अधिक भर
देईन. ज्या विद्यार्थ्यांकडे चित्रकला, हस्तकला, संगीत आणि फोटोग्राफी यांसारख्या
कला आहेत त्या कलांचे त्यांना शिक्षण देऊन त्यांच्या कलाच त्यांच्या उदरनिर्वाहाचे
साधन कशा प्रकारे बनतील याचा विचार करेन. ज्या मुलांची उच्चशिक्षण घेण्याची
परिस्थिती नाही पण ते खूप हुशार आहेत अशा मुलांना विविध शिष्यवृत्ती योजना राबवण्यावर
भर देईन.
कोणतीही कला अवगत करायची असल्यास अथवा शिक्षण
घ्यायचे असल्यास ते जर आपल्या मातृभाषेतून आपण घेतले तर ते लगेच आत्मसात होते.
शिक्षणमंत्री झाल्यानंतर मी प्रयत्न करेन की शिक्षण क्षेत्रातील शैक्षणिक साहित्य
ही मातृभासेत रुपांतर करून विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक सुलभ करेन. शिक्षण
क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींना सोबत घेऊन इंजिनिअर आणि विज्ञान तंत्रज्ञानाचे
अभ्यासक्रम मातृभाषेत कसे उपलब्ध करून दिले जातील यावर लक्षण दिन. मातृभाषांबरोबरच
राष्ट्रभाषा हिंदी आणि आंतरराष्ट्रीय भाषा इंग्रजी यांनाही शिक्षणव्यवस्थेत योग्य
ते स्थान देईन.
ज्ञानप्रद, राष्ट्रीय भावनांचा विकास करणाऱ्या आणि
रोचक अशा विषयांचा समावेश मी पाठ्यपुस्तकांमध्ये घडवून आणेन. पाठ्यपुस्तकांचे
मूल्य कमीत कमी ठेवण्याचा मी प्रयत्न करेन, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ई-बुक्स
उपलब्ध करून देईन जेणेकरून विद्यार्थ्यांना डिजिटली केव्हाही कुठेही अभ्यास करणे
शक्य होईल. विद्यार्थ्यांचे गुण हे त्यांच्या वर्षभराच्या प्रगतीवरून, तसेच
त्याच्या सामान्यज्ञान आणि चरित्र इत्यादी निकषांच्या आधारे देण्याची व्यवस्था
करेन.
प्राथमिक शाळा तसेच इतर शिक्षणसंस्थांमध्ये
विद्यार्थ्यांनी गणवेश परिधान करणे बंधनकारक करेन यामुळे वाढत चाललेले फशन चे वेड
काही प्रमाणात तरी कमी होईल. याशिवाय खाजगी शिक्षण संस्थांमध्ये आकारल्या जाणाऱ्या
भरमसाठ फी वर अंकुश ठेवणारी यंत्रणा उभी करेन.
आज विद्यार्थ्यांना विविद समस्यांना सामोरे जावे
लागत आहे. अचानक ओढवणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे शिक्षणव्यवस्थेमध्ये अचानक बदल
केले जातात मात्र हे बदल करत असताना विद्यार्थ्यांचे मत विचारात घेतले जात नाही.
मी शिक्षणमंत्री झालो तर विद्यार्थ्यांशी संवाद साधेन आणि नंतरच योग्य तो निर्णय
घेईन. विज्ञानतंत्रज्ञान आणि डिजिटल शिक्षणाच्या युगात विद्यार्थ्यांच्या
शिक्षणासाठी अशी वेबसाईट निर्मितीवर भर देईन की विद्यार्थ्यांचे सर्व निकाल आणि
अभ्यासक्रमाबाबत नवी माहिती थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहचू शकेल.
मला शिक्षण मंत्री होण्याची संधी मिळाली तर मी या
प्रकारे भविष्यामध्ये शिक्षणव्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणेन की त्यामुळे
समाजाला पर्यायाने राष्ट्राला चांगले नागरिक, प्रभावशाली नेते, उत्कृष्ट शिक्षक,
कुशल डॉक्टर आणि सत्याच्या मार्गावर चालणारे नागरिक तयार होती. यामुळे आपला भारत
देश विकसनशीलतेकडून विकसित होण्याच्या दिशेने मार्गक्रम करेल.
मी शिक्षणमंत्री झालो तर, ही कल्पना खरचं सत्यात
उतरली तर किती बरे होईल!
निबंध लिहित असताना खालील मुद्यांचा अवश्य वापर
करा.
[मुद्दे:
शिक्षणमंत्री होण्याची कल्पना
शिक्षणमंत्री होणे सौभाग्याची गोष्ट
स्वस्त आणि दर्जेदार शिक्षण
शिक्षणाचे माध्यम
पाठ्यपुस्तके आणि इतर शिक्षण व्यवस्थेमध्ये
सुधारणा
इतर बदल
देशाचे भविष्य उज्वल करण्याचे स्वप्न.]
निबंध याप्रकारे देखील शोधू शकता.